एक्स्प्लोर
Heavy Rain : पूर्व विदर्भात पावसाचे थैमान! अनेक गावांचा संपर्क तुटला, जनजीवन विस्कळीत
Heavy Rain : गेल्या काही दिवसापासून उपराजधानी नागपूरसह (Nagpur News) पूर्व विदर्भात सुरू असलेल्या धुव्वाधार पावसाने (Heavy Rain) सर्वत्र एकाच दाणादाण उडवली आहे.

( Image Source : ABP Majha Reporter)
1/11

गेल्या काही दिवसापासून उपराजधानी नागपूरसह (Nagpur News) विदर्भात सुरू असलेल्या धुव्वाधार पावसाने (Heavy Rain सर्वत्र एकाच दाणादाण उडवली आहे.
2/11

तर पूर्व विदर्भात अतिवृष्टी सदृश्य पावसामुळं (Heavy Rain) जनजीवन विस्कळीत झालं असून शहरातील रस्त्यांना नदी नाल्याचे स्वरूप प्राप्त झालं आहे.
3/11

दरम्यान, काही काळ विश्रांती घेतलेल्या पावसाने आता पुन्हा एकदा दमदार हजेरी लावली आहे. भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा नागपूरसह विदर्भातील बहुतांश ठिकाणी पावसाची जोरदार रिपरिप सुरू आहे.
4/11

परिणामी अनेक नदी नाले ओसंडून वाहू लागल्याने अनेक नदीनाल्याच्या काढच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सोबत अनेक गावांची मुख्य शहरांशी संपर्क तुटल्याची माहिती आता समोर येऊ लागली आहे.
5/11

महाराष्ट्र मध्यप्रदेशच्या सीमेवरून वाहणाऱ्या वैनगंगा नदीचे विहंगम दृश्य
6/11

गोंदिया जिल्ह्यात सलग सहा दिवसापासून सुरु असलेल्या पावसामुळे महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमेवरून वाहणारी वैनगंगा नदी दुथडी भरून वाहत आहे.
7/11

सततच्या पावसामुळे वैनगंगेने रौद्ररूप धारण केले असुन तिरोडा तालुक्यातील शेकडो हेक्टर शेतजमीन वैनगंगेच्या पाण्याखाली आली आहे.
8/11

मध्यप्रदेश राज्यातील संजय सरोवर तसेच महाराष्ट्रातील पुजारीटोला धरणांमधून पाणी नदीपात्रात सोडल्यामुळे वैनगंगा नदीचे सौंदर्य अधिकच खुलले आहे. ही दृश्य नीरज सोनवाणे आणि सोनु भगत तीरोडा यांनी आपल्या ड्रोन कॅमेरात कैद केले आहे.
9/11

मध्यप्रदेश आणि गोसीखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस होत आहे. त्यामुळं मध्यप्रदेशातील पुजारी टोला, संजय सरोवर या धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. आणि त्याचं पाणी महाराष्ट्राच्या सीमेतील भंडारा जिल्ह्यातील बावनथडी प्रकल्पाच्या माध्यमातून वैनगंगा नदीत प्रवाहित होत आहे.
10/11

परिणामी, तुमसर तालुक्यातील बपेरा येथील बावनथडी नदीवरून तीन फूट पाणी वाहत असल्यानं महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश या दोन राज्यांना जोडणारा मार्ग हा वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे.
11/11

सध्या गोसीखुर्द धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. अनेक गावांचा अजूनही संपर्क तुटला असून प्रशासन आणि स्वयंसेवी संस्थेच्या वतीनं मदत दिली जात आहे. प्रशासनानं नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
Published at : 24 Jul 2024 06:07 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
बीड
राजकारण
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion