Sunil Narine Out or Not Out : आयपीएलच्या पहिल्या सामन्यात चीटिंग? सुनील नरेनने स्टंपवर बॅट मारली तरी नॉट आउट; जाणून घ्या काय सांगतो नियम?
आयपीएल 2025 च्या हंगामाची सुरूवात धमाकेदार झाली आहे, कोलकाता नाईट रायडर्सने त्यांच्या घरच्या मैदानावर शानदार फलंदाजी केली.

KKR vs RCB IPL 2025 Sunil Narine Out or Not Out : आयपीएल 2025 च्या हंगामाची सुरूवात धमाकेदार झाली आहे. कोलकाता नाईट रायडर्सने त्यांच्या घरच्या मैदानावर शानदार फलंदाजी केली. पण हंगामाच्या पहिल्याच सामन्यात असे काही घडले की सर्वांनाच आश्चर्य वाटले. आणि काही चाहते पहिल्या सामन्यात चीटिंग झाल्याचा आरोप करत आहे. खरंतर, कोलकात्याचा सलामीवीर सुनील नारायणने फलंदाजी करताना एक चूक केली, ज्यामुळे तो आऊट झाला असता पण नशिबाने त्याला साथ दिली. आयपीएलच्या पहिल्या सामन्यात नरेन चांगल्या फॉममध्ये दिसत होता. या दरम्यान, नरेनने स्टंपवर बॅट मारली. पण असे असूनही, त्याला हिटविकेट देण्यात आले नाही, ज्यामुळे सर्वांनाच आश्चर्य वाटले. त्यामुळे काय सांगतो नियम हे जाणून घेऊया...
सुनील नरेन आऊट की नॉट आऊट....
शनिवारी 22 मार्च रोजी ईडन गार्डन्सवर झालेल्या आयपीएलच्या 18 व्या हंगामातील पहिल्या सामन्यात कोलकाताचा संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी आला. पण पहिल्याच षटकात त्यांना मोठा धक्का बसला, त्यानंतर कर्णधार अजिंक्य रहाणे आणि सुनील नरेन यांनी शानदार फलंदाजी करत संघाला पुनरागमन मिळवून दिले. पण याच काळात सुनील नरेनसोबत काहीतरी विचित्र घडले. हे सर्व आठव्या षटकात घडले, जेव्हा रसिक सलाम दार गोलंदाजी करत होता.
Sunil Narine 😯 #KKRvsRCB pic.twitter.com/O8oEC4KhiD
— Richard Kettleborough (@RichKettle07) March 22, 2025
रसिखच्या या षटकातील चौथा चेंडू शॉर्ट पिच होता. नरेनने तो खेळण्याचा प्रयत्न केला पण शेवटच्या क्षणी त्याने बॅट मागे घेतली.चेंडू त्याच्या डोक्यावरून यष्टीरक्षकाकडे गेला. इथे विकेटकीपरने चेंडू पकडला आणि काही सेकंदातच नरेनची बॅट स्टंपवर लागली. बॅट लागताच बेल्स खाली पडल्या आणि आरसीबीचे क्षेत्ररक्षक उत्साहित आणि थोडे गोंधळलेले दिसत होते. त्यांना वाटले की नरेन हिट-विकेट झाला. पण पंचांनी तसे केले नाही आणि यामुळे सर्वांनाच आश्चर्य वाटले.
नियम काय सांगतो ?
आता प्रश्न असा आहे की हे का घडले? यासाठी आपल्याला क्रिकेटचे नियम पहावे लागतील. क्रिकेटच्या 35.2 नियमानुसार, जर चेंडू खेळल्यानंतर फलंदाजाच्या बॅट किंवा शरीराचा कोणताही भाग लागल्यानंतर स्टंप पडला तर तो नॉट आउट मानला जाईल. कारण म्हणजे चेंडूची क्रिया पूर्ण झाली असते.
नरेनच्या बाबतीतही असेच घडले. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात गेला होता. बॅट स्टम्पला लागली तेव्हा नरेन त्याच्या जागी उभा होता आणि नंतर हात मागे हलवत होता. तसेच, बॅट स्टंपवर आदळण्यापूर्वी, पंचांनी तो वाइड बॉल घोषित केला होता, ज्यामुळे या बॉलची क्रिया पूर्ण झाली होती. क्रिकेटच्या भाषेत याला चेंडू 'डेड' होणे म्हणतात. त्यामुळे, नरेनला हिट-विकेट देण्यात आले नाही.





















