एक्स्प्लोर
भारतीय मानक ब्युरोमध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी; दरमहा 70 हजार वेतन मिळणार
Bureau of Indian Standards Jobs 2023: 'ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स'नं यंग प्रोफेशनल्सच्या पदांसाठी भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. या पदांवर निवडलेल्या उमेदवारांसाठी नोकरची चांगली संधी असणार आहे.

Bureau of Indian Standards Jobs 2023
1/8

Jobs 2023: तुम्हाला 'ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स'मध्ये नोकरी करायची असेल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी.
2/8

ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्सनं यंग प्रोफेशनल्सच्या पदांसाठी भरती जाहीर केली आहे.
3/8

उमेदवार bis.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन या पदांसाठी अर्ज करू शकतात. भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 ऑगस्ट आहे.
4/8

रिक्त पदांचा तपशील: या भर्ती मोहिमेद्वारे यंग प्रोफेशनल्सची 15 पदं भरली जातील.
5/8

पात्रता: अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे दहावी/बारावी/ग्रॅज्युएशन/BE/B.Tech पदवी/डिप्लोमा मान्यताप्राप्त बोर्ड/संस्थेतून आणि इतर विहित पात्रता आणि कामाचा अनुभव असावा.
6/8

वयोमर्यादा: अर्ज करणाऱ्या उमेदवारांचं कमाल वय 35 वर्ष निश्चित करण्यात आलं आहे.
7/8

निवड प्रक्रिया: शैक्षणिक पात्रता, अनुभव आणि अर्जात दिलेल्या माहितीच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल. शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना लेखी परीक्षा, मुलाखत इत्यादीसाठी बोलावलं जाईल. उमेदवारांना दोन वर्षांच्या कालावधीसाठी कंत्राटी पद्धतीनं नियुक्त केलं जाईल.
8/8

पगार: या पदांवर निवडलेल्या उमेदवारांना दरमहा 70,000 रुपये पगार मिळेल.
Published at : 19 Jul 2023 08:07 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
भारत
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
