एक्स्प्लोर

काँग्रेसची सत्यशोधन समिती आज नागपुरात; दंगलीचा मुख्य आरोपी दुसऱ्या दंगलीत शांतता प्रस्थापित करणार? भाजपचा खोचक सवाल

Nagpur : नागपूर हिंसाचार प्रकरणी काँग्रेसची 'सत्यशोधन समिती' आज नागपूरला भेट देणार आहे. या भेटीमधून हिंसाचार घडला त्या भागाची पाहणी करणार आहे. मात्र या समितीच्या नियुक्तीवर भाजपने सवाल उपस्थित केलाय.

Nagpur Violance : नागपूर हिंसाचार प्रकरणी काँग्रेसची 'सत्यशोधन समिती' आज (22 मार्च) नागपूरला भेट देणार आहे. या भेटीमधून हिंसाचार घडला त्या भागाची पाहणी करणार आहे. तसेच पोलीस, प्रशासन, नागरिक यांच्याशी चर्चा करून शांतता प्रस्थापित करण्यासाठी काँग्रेसची समिती प्रयत्न करणार आहे. नागपुरात झालेल्या हिंसाचाराचे (Nagpur Violance) कारणे काय? त्या पाठीमागे कोण जबाबदार आहेत? याचा शोध घ्यायचा प्रयत्न काँग्रेसची ही सत्यशोधन समिती करणार आहे.

दरम्यान नागपूरच्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने केलेल्या या सत्यशोधन समितीच्या नियुक्तीवर भाजपने सवाल उपस्थित केलाय. तसेच अकोला पश्चिम मतदार संघाचे आमदार साजिद खान पठाण यांच्यावर निशाणा साधलाय. अकोल्याच्या दंगलीतील मुख्य आरोपी साजिद खान पठाण, आता नागपूरच्या दंगलीत शांतता प्रस्थापित करणार, असा प्रश्न सोशल मीडियाच्या माध्यमातून भाजपने उपस्थित केलाय. 

साजिद खान पठाण यांच्या नियुक्तीवरुन भाजपचा खोचक सवाल

नागपूर दंगलीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने कार्यालयीन आदेश काढत नागपूर इथे भेट देत दंगलीची स्थिती जाणून घेण्यासाठी तसेच शांतता प्रस्थापित करण्यासाठी 7 नेत्यांची निवड केली आहे. मात्र यामध्ये अकोला पश्चिमचे आमदार साजिद खान पठाण यांचे देखील नियुक्ती केलेली आहे. याच नियुक्तीवर आता भाजपने सवाल उपस्थित केलाय. 'BJP महाराष्ट्र' या फेसबुक अकाउंटवरून भाजपने थेट काँग्रेसला टार्गेट केलंय.

एका दंगलीचा मुख्य आरोपी आता दुसऱ्या दंगलीत शांतता प्रस्थापित करणार?

नागपूर हिंसाचार प्रकरणी काँग्रेसच्या वतीने 'सत्यशोधन समिती' स्थापन करण्यात आली आहे. ही समिती नागपुरातील हिंसाचार घडलेल्या भागांची पाहणी करणार आहे. तसेच या समितीचा अहवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे सुपूर्द करण्यात येणार आहे. या समितीमध्ये माणिकराव ठाकरे, यशोमती ठाकूर, नितीन राऊत, हुसेन दलवाई, साजिद पठाण, विकास ठाकरे, प्रफुल गुडधे यांचा समावेश करण्यात आला आहे. पोलिसांनी परवानगी दिल्यास हिंसाचार ग्रस्त प्रभावित भाग असलेला महाल, भालदारपुरा परिसरात समिती जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र या समितीत साजिद खान पठाण यांच्या नियुक्तीवर, 'एका दंगलीचा मुख्य आरोपी आता दुसऱ्या दंगलीत शांतता प्रस्थापित करणार' असा सवाल भाजपने उपस्थित केलाय. हा काँग्रेसचा अजब कारनामा असल्याचे या पोस्टमधून मधून म्हटले आहे. साजिद खान पठाण हे काँग्रेसच्या शांतता समितीचे सदस्य नियुक्तीवरून  भाजपने काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

हे ही वाचा 

Nagpur Violance : हिंसाचाराच्या घटनेनंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच आज नागपुरात; तर मुख्य सूत्रधार फहीम खानचा जामिनासाठी अर्ज

गेल्या सोळा वर्षांपासून पत्रकारितेत. लेखक, कवी. समाज माध्यमांद्वारे प्रभावी लेखन. 
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

खासदार, आमदार वाढतील, तर पेन्शनचा भारही वाढेल; नागरिकांच्या पैशांची नासाडी नको; माजी आमदाराची मागणी
खासदार, आमदार वाढतील, तर पेन्शनचा भारही वाढेल; नागरिकांच्या पैशांची नासाडी नको; माजी आमदाराची मागणी
पुन्हा ट्रान्सफर... IAS जी श्रीकांत यांची 15 दिवसांत दुसरी बदली; राज्यातील 4 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या
पुन्हा ट्रान्सफर... IAS जी श्रीकांत यांची 15 दिवसांत दुसरी बदली; राज्यातील 4 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या
Priyanka Gandhi : 543 मध्येच 33 टक्के आरक्षण का देत नाही, आजचं मंजूर होईल, शुभ काम होईल, काळा टिळा कामात येईल : प्रियांका गांधी
आज जर चाणक्य जिवंत असते तर तुमची राजकीय कुटिलता पाहून आश्चर्यचकित झाले असते, प्रियांका गांधींचा टोला
29 हजार ते दीड लाख, गेल्या 9 वर्षात अक्षय तृतीयेला सोन्याच्या दरात मोठी वाढ, यावर्षी किती वाढणार दर?
29 हजार ते दीड लाख, गेल्या 9 वर्षात अक्षय तृतीयेला सोन्याच्या दरात मोठी वाढ, यावर्षी किती वाढणार दर?

व्हिडीओ

Sandeep Deshpande On Pratap Sarnaik : मंत्रिपद धोक्यात, प्रताप सरनाईक सारखा कुंभकर्ण जागा झालाय
Anjali Damania On Ashok Kharat : अशोक खरातला कॉल, राजकीय बवाल Special Report
Nashik TCS Issue : 'कॉर्पोरेट जिहाद' नाशकात म्होरक्या मलेशियात? Special Report
Amravati Paratwada Case : बुलडोझर घरावर, राजकारण धर्मावर Special Report
Sunetra Pawar Prachar : काकींचा प्रचार, विलिनीकरणाची किनार? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Priyanka Gandhi : 543 मध्येच 33 टक्के आरक्षण का देत नाही, आजचं मंजूर होईल, शुभ काम होईल, काळा टिळा कामात येईल : प्रियांका गांधी
आज जर चाणक्य जिवंत असते तर तुमची राजकीय कुटिलता पाहून आश्चर्यचकित झाले असते, प्रियांका गांधींचा टोला
पुन्हा ट्रान्सफर... IAS जी श्रीकांत यांची 15 दिवसांत दुसरी बदली; राज्यातील 4 सनदी अधिकाऱ्यांच्या बदली
पुन्हा ट्रान्सफर... IAS जी श्रीकांत यांची 15 दिवसांत दुसरी बदली; राज्यातील 4 सनदी अधिकाऱ्यांच्या बदली
'मुलगा तुझ्यासारखा दिसत नाही' म्हणत गावकऱ्यांचे वारंवार टोमणे, निर्दयी जन्मदात्या बापानं पोटच्या सहा वर्षाच्या लेकराला मारलं; एक महिन्यानंतर थरकाप उघडकीस
'मुलगा तुझ्यासारखा दिसत नाही' म्हणत गावकऱ्यांचे वारंवार टोमणे, निर्दयी जन्मदात्या बापानं पोटच्या सहा वर्षाच्या लेकराला मारलं; एक महिन्यानंतर थरकाप उघडकीस
अशोक खरातच्या फरार पत्नीच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली; कोर्टाकडून नवी तारीख, नेमकं काय घडलं?
अशोक खरातच्या फरार पत्नीच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली; कोर्टाकडून नवी तारीख, नेमकं काय घडलं?
'तर आपण त्यांना काय सांगावे?' निवडणुकीत सक्तीच्या मतदानाची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
'तर आपण त्यांना काय सांगावे?' निवडणुकीत सक्तीच्या मतदानाची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
IPL 2026 : चेन्नई सुपर किंग्जला मोठा धक्का, आयपीएलमध्ये 91 विकेट घेणारा गोलंदाज दुखापतीमुळं बाहेर, ऋतुराज गायकवाडचं टेन्शन वाढलं
चेन्नईला मोठा धक्का, IPL मध्ये 91 विकेट घेणारा गोलंदाज दुखापतीमुळं बाहेर, ऋतुराज गायकवाडचं टेन्शन वाढलं
भाजप 'नारी'ला केवळ 'नारा' बनवत आहे, जातीय जनगणना टाळण्याचा डाव, यूपीत जागा वाढण्यामागे षड्यंत्र, परिसीमन म्हणजे निवडणूक नकाशा आपल्या राजकीय सोयीनुसार बदलण्याचा डाव; अखिलेश यादवांचा हल्लाबोल
भाजप 'नारी'ला केवळ 'नारा' बनवत आहे, जातीय जनगणना टाळण्याचा डाव, यूपीत जागा वाढण्यामागे षड्यंत्र, परिसीमन म्हणजे निवडणूक नकाशा आपल्या राजकीय सोयीनुसार बदलण्याचा डाव; अखिलेश यादवांचा हल्लाबोल
Video: आदित्य ठाकरेंनी महिलेला मारलं, निशिकांत दुबेंच्या आरोपाने सभागृह तापलं, अरविंद सावंत कडाडून म्हणाले, तडीपार माणसाचं नाव घेऊ का?
Video: आदित्य ठाकरेंनी महिलेला मारलं, निशिकांत दुबेंच्या आरोपाने सभागृह तापलं, अरविंद सावंत कडाडून म्हणाले, तडीपार माणसाचं नाव घेऊ का?
Embed widget