एक्स्प्लोर
CISF Constable Recruitment 2024 : तरुणांसाठी सुवर्णसंधी, सीआयएसएफमध्ये 1130 पदांची भरती, 21 ते 69 हजार रुपये पगार मिळणार
CISF Constable Recruitment 2024 केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल म्हणजेच सीआयएसएफमध्ये 1130 पदांची भरती होणार आहे. यासाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर आहे.

सीआयएसएफमध्ये 1130 पदांची भरती
1/5

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल म्हणजेच सीआयएसएफमध्ये लवकरच कॉन्स्टेबल फायरमन पदासाठी 1130 जागांवर भरती होणार आहे. यासाठी अर्ज दाखल करण्यास 30 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे.
2/5

पात्र उमेदवार 30 ऑगस्टपासून 30 सप्टेंबरपर्यंत अर्ज दाखल करु शकतात. कॉन्स्टेबल फायरमन पदासाठी अर्ज दाखल करण्यासाठी पात्रता बारावी उत्तीर्ण इतकी आहे. संबंधित उमेदवरांनी विज्ञान शाखेतून बारावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.
3/5

सीआयएसएफमधील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचं वय 18 ते 23 वर्षांदरम्यान असणं आवश्यक आहे. यासाठीच्या अर्जाचं शुल्क 100 रुपये आहे. एससी, एसटी आणि दिव्यांग विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क द्यावं लागणार नाही.
4/5

सीआयएसएफमध्ये निवड होण्यासाठी उमेदवारांना मैदानी चाचणीत उत्तीर्ण व्हावं लागेल. यानंतर कागदपत्रं तपासणी, लेखी परीक्षा आणि वैद्यकीय चाचणी द्यावी लागेल.
5/5

जे उमेदवार सर्व चाचण्या उत्तीर्ण होऊन सीआयएसएफमध्ये रुजू होतील त्यांना 21 ते 69 हजार रुपयांपर्यंत पगार मिळेल.
Published at : 25 Aug 2024 05:32 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
शेत-शिवार
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion