एक्स्प्लोर
EPFO 31 मार्च पर्यंत महत्त्वाचं एक काम पूर्ण करणार, जूनपासून बँकिंग प्रमाणं सेवा मिळणार, पैसे काढणं सोपं होणार
EPFO : ईपीएफओच्या तंत्रज्ञानासंदर्भातील अपग्रेडेशनचं काम येत्या 31 मार्चपर्यंत पूर्ण होईल. ईपीएफओ सध्या 2.0 प्रणालीचा वापर करतेय.
ईपीएफओ
1/5

कर्मचारी भविष्य निर्वाह संघटना केंद्रीकृत आयटी-सक्षम प्रणाली (CIETES 2.01) आणि ईपीएफओ 3.0 या प्रणालीचं काम 31 मार्च पर्यंत पूर्ण करणार आहे.
2/5

ईपीएफओशी संबंधित अधिकाऱ्यांच्या मतानुसार आटी सिस्टीमचं काम पूर्ण झाल्यानंतर त्याची चाचणी केली जाईल. या वर्षी जूनपासून ईपीएफओ सदस्यांना बँकिंग सारख्या सेवा ईपीएफओ खात्यातून मिळतील.
3/5

ईपीएफओच्या केंद्रीय न्यासी बोर्डाशी संबंधीत ईपीएफच्या कार्यकारी समितीची 112 वी बैठक मंगळवारी पार पडली. यामध्ये नव्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलेली ईपीएफओ 3.0 प्रणाली विकसित केली जाणार असल्याचं म्हटलंय.
4/5

पीएफ खातेदारांना पैशांची गरज लागल्यास त्यांना नवी प्रणाली लागू झाल्यानंतर बँकिंग व्यवस्थेप्रमाणं खात्यातून पैसे काढण्याची परवानगी असेल. याशिवाय कर्मचाऱ्यांना योगदान वाढवण्यासंदर्भात देखील सुविधा ऑनलाईन पद्धतीनं उपलब्ध करुन दिले जातील.
5/5

दरम्यान, ईपीएफओच्या सेंट्रल बोर्ड ऑफ ट्र्स्टीजची बैठक 28 फेब्रुवारीला होणार आहे. या बैठकीत व्याजदरासंदर्भात घोषणा केली जाईल.
Published at : 27 Feb 2025 02:58 PM (IST)
आणखी पाहा























