Sangli Crime : जन्मदाता बाप की नराधम! पोटच्या अल्पवयीन मुलीसोबत काही महिन्यापासून नको ते कृत्य, वैतागलेल्या आईची पोलिसांकडे धाव, सांगलीतील घटनेने संताप
Sangli Crime : सांगलीतील जत तालुक्यात बाप आणि मुलीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडलीय.

Sangli Crime : सांगलीतील (Sangli) जत (Jat) तालुक्यात बाप आणि मुलीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडलीय. जत तालुक्यात बापाकडूनच 13 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या निर्दयी बापास पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून त्याच्याविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सांगलीतील जत तालुक्यातील पूर्व भागांमध्ये तेरा वर्षाची पीडित अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबासमवेत राहण्यास आहे. गेल्या चार महिन्यापासून तिच्या बापाकडून तिच्यावरती लैंगिक अत्याचार केले जात होते. ही बाब आईच्या लक्षात आल्यानंतर पीडितेच्या आईने पतीला याबाबत समज देखील दिली होती.
वैतागलेल्या आईची पोलीस ठाण्यात धाव
परंतु निर्दयी बापाकडून मुलीवर वाढत असणाऱ्या लैंगिक अत्याचारास अखेर पीडितेच्या आईनेच वाचा फोडली. बापाकडून वारंवार होत असलेल्या अत्याचारास वैतागलेल्या पीडितेने पोलिसात धाव घेत लैंगिक अत्याचाराची तक्रार दाखल केली आहे. याबाबत उमदी पोलिसांनी तातडीने नराधम बापास अटक केली असून त्याच्या विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु, मुलीवरच बापाकडून गेल्या चार महिन्यापासून वारंवार लैंगिक अत्याचार होत असल्याची घटना घडल्यामुळे या घटनेबाबत संताप व्यक्त केला जात आहे.
रोह्यात अल्पवयीन मुलीचा विनयभंग
दरम्यान, रायगडच्या रोह्यात अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्यात आला आहे. आरोपी सुलतान पानसरे याला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. पीडित मुलीला रेशनिंग दुकानात आधार कार्ड लिंक करण्याच्या बहाण्यावरून बोलावून घेत आरोपीने अश्लील चाळे केले. यानंतर पीडित मुलीच्या आईने पोलिस ठाणे गाठत याबाबत तक्रार दाखल केली आहे. पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीनुसार आरोपीवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

