आमची परिस्थिती सुधारली की आम्ही लाडक्या बहिणींना 2100 देऊ; अजित पवारांचं मोठं वक्तव्य
लाडकी बहिण योजना (Ladki Bahin Yojana) ही महायुती सरकारची महत्वकांक्षी योजना आहे. या योजनेबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

Ajit Pawar on Ladki Bahin Yojana : लाडकी बहिण योजना (Ladki Bahin Yojana) ही महायुती सरकारची महत्वकांक्षी योजना आहे. विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) आधी या योजनेची घोषणा करण्यात आली होती. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. मात्र, विधानसभा निवडणुकीवेळी महिलांना 2100 रुपये देण्याचे आश्वासनं महायुतीनं दिले होते. ते 2100 रुपये कधी मिळणार? असा सवाल उपस्थित केला जात आहे. याबाबत आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
नेमकं काय म्हणाले अजित पवार?
लाडकी बहिण योजनेबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. लाडक्या बहिणीला 2100 रुपये देण्यासाठी आम्ही नाही म्हटलं नाही. पण राज्याची आर्थिक परिस्थिती पाहून आम्ही घोषणा करु असे वक्तव्य अजित पवार यांनी केलं आहे.सगळी सोंग करता येतात मात्र पैशांचं सोंग करता येत नाही. आमची परिस्थिती सुधारली की आम्ही लाडक्या बहिणींनी 2100 रुपये देऊ असे अजित पवार म्हणाले. शेतकरी कर्जमाफी संदर्भात माहिती गोळा करायचं काम सुरु असल्याचेही अजित पवार म्हणाले.
अर्थसंकल्पीय अधिवेशनात लाडकी बहिण योजनेबाबत निर्णय नाही
अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये लाडकी बहिण योजनेबाबत काहीतरी घोषणा होऊ शकते असा सगळ्यांचा अंदाज होता. महायुतीच्या मंत्र्यांनी देखील तसे संकेत दिले होते. मात्र अजूनही याबाबत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाहीये. त्यामुळे लाभार्थी महिलांना आता 2100 रुपये कधीपासून मिळणार असा सवाल उपस्थित केला जात आहे. यावर आता अर्थमंत्री अजित पवार यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. आमची परिस्थिती सुधारली की आम्ही लाडक्या बहिणींनी 2100 रुपये देऊ असे अजित पवार म्हणाले आहेत. ज्या कुटुंबातील महिलांचं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाख रुपयांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील महिलांसाठी राज्या सरकारनं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये दर महिन्याला दीड हजार रुपये जमा होतात. गेल्या वर्षी जुलैपासून या योजनेच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली. आतापर्यंत एकूण 9 हाफ्ते महिलांच्या खात्यामध्ये जमा झाले आहेत. पण महिलांना 2100 रुपयांचा हप्ता कधी मिळणार असा सवाल उपस्थित केला जात आहे.
महत्वाच्या बातम्या:
Sanjay Shirsat : लाडकी बहिणसाठी 4000 कोटी, एकूण 7 हजार कोटींचा फटका माझ्या विभागाला बसला; मंत्री संजय शिरसाट स्पष्टच बोलले
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

