IPL 2025 Playoffs Predictions : ना धोनी ना कोहली, यंदाच्या आयपीएलमध्ये 'हे' चार संघ थेट प्लेऑफमध्ये जाणार, IPL सुरू होण्याच्या 24 तासाआधी बड्या क्रिकेट तज्ज्ञांचं भाकित!
इंडियन प्रीमियर लीग (IPL) चा 18 वा हंगाम सुरू होण्यास फक्त एक दिवस बाकी आहेत.

IPL 2025 Playoffs Predictions : इंडियन प्रीमियर लीग (IPL) चा 18 वा हंगाम सुरू होण्यास फक्त एक दिवस बाकी आहेत. आयपीएल 2025 चा पहिला सामना आरसीबी आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळला जाईल. याआधीही तज्ञांनी प्लेऑफ शर्यतीबद्दल आपले भाकित केले आहेत. वीरेंद्र सेहवाग, मायकेल वॉन, अॅडम गिलख्रिस्ट यांसारख्या माजी क्रिकेटपटूंनी क्रिकबझशी बोलताना आगामी हंगामासाठी त्यांचे टॉप-4 जाहीर केले आहेत.
पण, भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू रोहन गावसकर वगळता, कोणत्याही माजी क्रिकेटपटूने या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) ला पहिल्या चारमध्ये स्थान मिळवण्यासाठी निवडले नाही. माजी भारतीय फलंदाज वीरेंद्र सेहवागने चेन्नई सुपर किंग्ज आणि आरसीबीला प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर ठेवले.
सेहवागने सीएसके-आरसीबीला प्लेऑफच्या शर्यतीतून ठेवले बाहेर
वीरेंद्र सेहवागने सांगितले की, मुंबई इंडियन्स (MI), सनरायझर्स हैदराबाद (SRH) पंजाब किंग्ज (PBKS) आणि लखनऊ सुपर जायंट्स (LSG) या हंगामात प्लेऑफमध्ये प्रवेश करू शकतात. गेल्या हंगामात प्लेऑफसाठी पात्र ठरू न शकलेले एमआय, एलएसजी आणि पीबीकेएस सारखे संघ टॉप चारमध्ये स्थान मिळवतील, असा अंदाज सेहवागने व्यक्त केला.
अशी भाकित करणारा वीरेंद्र सेहवाग हा एकमेव नाही. अनेक माजी क्रिकेटपटूंनीही त्यांच्या प्लेऑफ निवडी शेअर केल्या आहेत. बहुतेक क्रिकेटपटूंच्या भाकित्यांमध्ये सनरायझर्स हैदराबाद, मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज यांचा समावेश आहे, तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्ज यांना अनेकांनी दुर्लक्षित केले आहे, जे आश्चर्यकारक आहे. गेल्या हंगामात आरसीबीची कामगिरी चांगली होती. सीएसके प्लेऑफमध्ये स्थान मिळवू शकले नाही, तर मुंबई संघ गेल्या हंगामात शेवटच्या स्थानावर राहिला होता.
आयपीएल 2025 च्या प्लेऑफबाबत क्रिकेट तज्ज्ञांचे भाकित!
वीरेंद्र सेहवाग : मुंबई इंडियन्स, सनरायझर्स हैदराबाद, पंजाब किंग्ज आणि लखनऊ सुपर जायंट्स.
अॅडम गिलख्रिस्ट : पंजाब किंग्ज, मुंबई इंडियन्स, सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स.
रोहन गावसकर : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, सनरायझर्स हैदराबाद, दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स.
हर्ष भोगले : सनरायझर्स हैदराबाद, मुंबई इंडियन्स, कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू.
शॉन पोलॉक : मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्ज, सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्ज.
मनोज तिवारी : सनरायझर्स हैदराबाद, पंजाब किंग्ज, गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स.
साइमन डॉल : चेन्नई सुपर किंग्ज, कोलकाता नाईट रायडर्स, सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्ज.
मायकेल वॉन : गुजरात टायटन्स, मुंबई इंडियन्स, कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्ज.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

