कोणत्या देशातून भारतात येतो सर्वाधिक पैसा? RBI ने सादर केलेल्या अहवाल सविस्तर माहिती
दरवर्षी परदेशातून किती पैसा भारतात येतो आणि कोणत्या देशातून येतो यावर अनेकदा चर्चा होते. वास्तविक, हा पैसा किती भारतीय प्रवासी परदेशात राहतात हे दर्शविते.
RBI Report : दरवर्षी परदेशातून किती पैसा भारतात (India) येतो आणि कोणत्या देशातून येतो यावर अनेकदा चर्चा होते. वास्तविक, हा पैसा (Money) किती भारतीय प्रवासी परदेशात राहतात हे दर्शविते. RBI ने आपल्या अहवालात यासंबंधीचा डेटा जारी केला आहे. यावरुन असे दिसून येते की 2023-24 मध्ये एकूण 118.7 अब्ज डॉलर भारतात आले आहेत. दरम्यान, कोणत्या देशातून सर्वाधिक जास्त पैसा भारतात येतो, याबाबतची माहिती पाहुयात.
कोणत्या आखाती देशातून भारतात येतो पैसा?
RBI 2025 च्या अहवालानुसार, 2023-24 मध्ये भारतात पाठवलेल्या एकूण रेमिटन्समध्ये संयुक्त अरब अमिराती, सौदी अरेबिया, कतार, ओमान आणि बहरीन यांचा समावेश असलेल्या गल्फ कोऑपरेशन कौन्सिलचा वाटा सुमारे 38 टक्के होता. म्हणजेच 118.7 अब्ज डॉलर्सच्या भारतात येणाऱ्या एकूण विदेशी पैशापैकी 38 टक्के रक्कम या आखाती देशांमधून आली आहे. आता आपण $118.7 बिलियन डॉलरपैकी 38 टक्के काढले तर ते 45.10 बिलियन डॉलर होईल. आता जेव्हा आपण त्याचे भारतीय रुपयात रूपांतर करतो तेव्हा ते 3,896.3 अब्ज भारतीय रुपये होईल.
बहुतांश स्थलांतरित बांधकाम उद्योग, आरोग्यसेवा, आदरातिथ्य आणि पर्यटन क्षेत्रात काम करतात
आखाती देशांमध्ये, संयुक्त अरब अमिराती, सौदी अरेबिया, कतार, ओमान आणि बहरीन, संयुक्त अरब अमिराती (UAE) भारताला पैसे पाठवण्याच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर आहे. याचा अर्थ UAE मध्ये राहणारे प्रवासी इतर आखाती देशांमध्ये राहणाऱ्या प्रवासी लोकांपेक्षा जास्त पैसे त्यांच्या देशात पाठवतात. 2020-21 मध्ये भारतात पाठवलेल्या एकूण रेमिटन्समध्ये UAE चा वाटा 18 टक्के होता, जो 2023-24 मध्ये वाढून 19.2 टक्के झाला. वास्तविक, UAE हे भारतीय स्थलांतरित कामगारांचे सर्वात मोठे केंद्र आहे. याशिवाय, येथील बहुतांश स्थलांतरित बांधकाम उद्योग, आरोग्यसेवा, आदरातिथ्य आणि पर्यटन क्षेत्रात काम करतात.
सर्वाधिक पैसा अमेरिकेतून भारतात येतो
मात्र, आखाती देशांच्या बाबतीत UAE पहिल्या क्रमांकावर आहे. पण, जेव्हा तुम्ही जगभरातील देशांची यादी पाहाल, तेव्हा तुम्हाला कळेल की, पैसे पाठवण्याच्या बाबतीत अमेरिका पहिल्या क्रमांकावर आहे. म्हणजे सर्वाधिक पैसा अमेरिकेतून भारतात येतो. RBI चे मार्च 2025 च्या अहवालात दिलेल्या माहितीनुसार, भारतात पाठवल्या जाणाऱ्या रेमिटन्सची गतिशीलता बदलत आहे. 2023-24 मध्ये भारतात पाठवलेल्या एकूण रेमिटन्समध्ये अमेरिकेचा वाटा सर्वाधिक 27.7 टक्के होता.
महत्वाच्या बातम्या:
Fact Check: दोन बँक खाती असल्यास दंड भरावा लागणार? आरबीआयच्या नावानं अनेक दावे,नेमकं सत्य काय?
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

