एक्स्प्लोर

मोहोळमध्ये बेकायदा वाळू उपसा बंद होते, मग पंढरपुरात का नाही? आमसभेत 2 आमदारांमध्ये खडाजंगी 

पंढरपूरची आमसभा बेकायदा वाळू उपश्याच्या मुद्यावरुन चांगलीच गाजवल्याचं पाहायला मिळालं. मोहोळचे आमदार राजू खरे यांनी भाजप आमदार समाधान आवताडे यांना सवाल करत सभागृह दणाणून सोडलं.

MLA Raju Khare : पंढरपूर (Pandharpur)  तालुक्यात आज आमसभा पार पडली. हा तालुका सांगोला, मोहोळ, पंढरपूर-मंगळवेढा व माढा या चार विधानसभा मतदारसंघात विभागलेला आहे. त्यामुळं या चारही मतदारसंघाच्या उपस्थितीत आज आमसभा आयोजीत करण्यात आली आहे. ही आमसभा मोहोळचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार राजू खरे (MLA Raju Khare) यांनी बेकायदा वाळू उपश्याच्या मुद्यावरुन चांगलीच गाजवल्याचं पाहायला मिळालं. मी जर माझ्या मोहोळ तालुक्यातील बेकायदा वाळू बंद करु शकतो तर तुम्ही भाजपचे आमदार असून येथील वाळू का बंद होत नाही? असा सवाल राजू खरे यांनी पंढरपूरचे भाजप आमदार समाधान आवताडे (Samadhan Autade)  यांना केल्याचं पाहायला मिळालं.  

पंढरपूरच्या वाळू आणि मुरुम उपसाबाबत नागरिक संतप्त

आज पंढरपूरच्या आमसभेत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे मोहोळचे आमदार राजू खरे यांनी बेकायदा वाळू उपशावर जोरदार निशाणा साधला. जर मी माझ्या तालुक्यातील बेकायदा वाळू उपसा बंद करू शकतो तर सत्ताधारी आमदाराला हे का शक्य होत नाही? असा सवाल करत खरेंनी आमसभा गाजवून सोडली. पंढरपूर तालुका हा सांगोला मोहोळ पंढरपूर मंगळवेढा व माढा या चार विधानसभा मतदारसंघात विभागलेला आहे. त्यामुळे आजच्या आमसभेत पंढरपूरचे भाजप आमदार समाधान आवताडे, माढ्याचे शरद पवार गटाचे आमदार अभिजीत पाटील, मोहोळचे शरद पवार गटाचे आमदार राजू खरे आणि सांगोल्याचे शेकापचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख उपस्थित होते. या आमसभेत पंढरपूरच्या वाळू आणि मुरुम उपसाबाबत नागरिक टोकाचे संतप्त होते. यावर सामाजिक कार्यकर्ते अरुण कोळी यांनी आम सभेत पंढरपूरच्या बेकायदा वाळू उपसा बाबत विचारले असता मोहोळचे आमदार राजू खरे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं.

विरोधी पक्षाचा आमदार असून वाळू उपसा बंद करु शकतो, तुम्ही तर सत्ताधारी पक्षाचे आमदार

जर मी विरोधी पक्षाचा आमदार असूनही माझ्या मतदारसंघातील बेकायदा वाळू आणि मुरूम उपसा 100 टक्के बंद करू शकत असेल तर पंढरपूरचे आमदार हे सत्ताधारी भाजपचे आहेत, मग त्यांना का शक्य होत नाही? असा सवाल राजू खरे यांनी केला. माझ्या मोहोळमध्येही मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरू होता. याबाबत मी तहसीलदार आणि पोलिसांना तक्रारी करुनही हा बेकायदा वाळू उपसा बंद झाला नाही. यानंतर आपण या वाळू उपशाचे शूटिंग काढून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना दाखवल्यावर तातडीने जिल्हाधिकाऱ्यांच्या पथकाने कारवाई करत मोहोळ तालुक्यातील सर्व बेकायदा वाळू व मुरूम उपसा बंद करुन दाखवला. जर मी विरोधी पक्षाचा आमदार असून हे करु शकतो तर सत्ताधारी पंढरपूरचे आमदार समाधान आवताडे यांना काय अवघड आहे? असा सवाल खरेंनी केला.

वाळू उपसा होणाऱ्या ठिकाणी तहसील आणि पोलिसांचा एक एक कर्मचारी ठेवावा, समाधान आवताडेंची मागणी

दरम्यान, यानंतर आमदार समाधान आवताडे यांनी आक्रमक होत वाळू उपसा होणाऱ्या ठिकाणी तहसील आणि पोलिसांचा एक एक कर्मचारी ठेवावा अशी मागणी केली. तसेच वारंवार अशा गुन्ह्यात सापडणाऱ्यांवर तातडीने मकोका कायदा लावावा असे आदेश देकील त्यांनी प्रशासनाला दिले आहेत.

महत्वाच्या बातम्या:

Beed: वाळू तस्करांची साटे - लोटे, निलंबनाच्या कारवाईनंतर गेवराईत पोलीस कर्मचारी 3 दिवसांपासून बेपत्ता, ठाणे प्रमुखाचाही बदली अर्ज

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

UPI अन् ATM वरुन पीएफचे पैसे काढता येणार, केव्हापासून  नवे बदल लागू होणार? अपडेट समोर
UPI अन् ATM वरुन पीएफचे पैसे काढता येणार, केव्हापासून नवे बदल लागू होणार? अपडेट समोर
Ajit Pawar : दुधात भेसळ करणाऱ्यांना मकोका लावणार, कायद्यात दुरुस्ती करणार; अजित पवारांची मोठी घोषणा
दुधात भेसळ करणाऱ्यांना मकोका लावणार, कायद्यात दुरुस्ती करणार; अजित पवारांची मोठी घोषणा
Nitesh Rane : मुंबई कोस्टल रोडलगतच्या विकसित जागा महाराष्ट्र सागरी मंडळाकडे हस्तांतरित करा; मंत्री नितेश राणे यांची मागणी
मुंबई कोस्टल रोडलगतच्या विकसित जागा महाराष्ट्र सागरी मंडळाकडे हस्तांतरित करा; मंत्री नितेश राणे यांची मागणी
Panhala Fort : पन्हाळा किल्ल्यावरील शिवस्मारकाला 10 कोटींचा निधी मंजूर, कोल्हापूरमधील आमदारांच्या पाठपुराव्याला यश 
पन्हाळा किल्ल्यावरील शिवस्मारकाला 10 कोटींचा निधी मंजूर, कोल्हापूरमधील आमदारांच्या पाठपुराव्याला यश 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Shole | Jaykumar Gore | कचाट्यात गोरे, पवारेंचे मोहरे? गोरेंच्या बचावासाठी फडणवीस मैदानातSpecial Report | Kunal Kamra Video | कुणाल कामराचा नवा व्हिडीओ, शिवसेनेला पुन्हा डिवचलंDmart Marathi Language Issue News | 'नाही येत मराठी..', परप्रांतीयांकडून माज, मनसैनिकांनी दाखवला 'मराठी' इंगाSpecial Report | Waghya Dog Statue Issue | 'वाघ्या'चं कारण, जातीवरुन राजकारण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
UPI अन् ATM वरुन पीएफचे पैसे काढता येणार, केव्हापासून  नवे बदल लागू होणार? अपडेट समोर
UPI अन् ATM वरुन पीएफचे पैसे काढता येणार, केव्हापासून नवे बदल लागू होणार? अपडेट समोर
Ajit Pawar : दुधात भेसळ करणाऱ्यांना मकोका लावणार, कायद्यात दुरुस्ती करणार; अजित पवारांची मोठी घोषणा
दुधात भेसळ करणाऱ्यांना मकोका लावणार, कायद्यात दुरुस्ती करणार; अजित पवारांची मोठी घोषणा
Nitesh Rane : मुंबई कोस्टल रोडलगतच्या विकसित जागा महाराष्ट्र सागरी मंडळाकडे हस्तांतरित करा; मंत्री नितेश राणे यांची मागणी
मुंबई कोस्टल रोडलगतच्या विकसित जागा महाराष्ट्र सागरी मंडळाकडे हस्तांतरित करा; मंत्री नितेश राणे यांची मागणी
Panhala Fort : पन्हाळा किल्ल्यावरील शिवस्मारकाला 10 कोटींचा निधी मंजूर, कोल्हापूरमधील आमदारांच्या पाठपुराव्याला यश 
पन्हाळा किल्ल्यावरील शिवस्मारकाला 10 कोटींचा निधी मंजूर, कोल्हापूरमधील आमदारांच्या पाठपुराव्याला यश 
Maharashtra Budget Session: अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा दिवस, 23 दिवसांत कोणत्या महत्त्वाच्या घोषणा झाल्या, सर्वसामान्यांना नेमकं काय मिळालं?
अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा दिवस, 23 दिवसांत कोणत्या महत्त्वाच्या घोषणा झाल्या, सर्वसामान्यांना नेमकं काय मिळालं?
कुणाल कामराने अजित पवारांना वादात ओढलं; जुन्या व्हिडिओवर उपमुख्यमंत्र्यांची नवी प्रतिक्रिया
कुणाल कामराने अजित पवारांना वादात ओढलं; जुन्या व्हिडिओवर उपमुख्यमंत्र्यांची नवी प्रतिक्रिया
Maharashtra Live: सोलापूरमध्ये शाळेत लहानग्या मुलीवर शिपायाकडून लैंगिक अत्याचार
Maharashtra Live: सोलापूरमध्ये शाळेत लहानग्या मुलीवर शिपायाकडून लैंगिक अत्याचार
विठ्ठल रुक्मिणीची ऑनलाईन पूजा काही तासांतच फुल्ल, पहिल्याच दिवशी पंढरपूर मंदिराला मिळाले 75 लाख रुपये
विठ्ठल रुक्मिणीची ऑनलाईन पूजा काही तासांतच फुल्ल, पहिल्याच दिवशी पंढरपूर मंदिराला मिळाले 75 लाख रुपये
Embed widget