एक्स्प्लोर

Pune Crime Swargate bus depot: दत्तात्रय गाडेचं शेवटचं लोकेशन पोलिसांना सापडलं, स्वारगेटमध्ये तरुणीवर अत्याचार केल्यानंतर कुठे गेला?

Pune Crime Swargate bus depot: पुण्यातील स्वारगेट एसटी स्थानकात मंगळवारी पहाटे 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार करण्यात आला होता. नराधम दत्तात्रय गाडे तेव्हापासून फरार आहे.

पुणे: पुण्यातील स्वारगेट एसटी आगारात एका 26 वर्षांच्या तरुणीवर बलात्कार करुन पळ काढणारा नराधम दत्तात्रय गाडे याचा पोलिसांकडून कसून शोध घेतला जात आहे. दत्तात्रय गाडेला (Dattatray Gade) हुडकून काढण्यासाठी शिरुर (Shirur News) आणि आजुबाजूच्या परिसरात पोलिसांची 13 पथके तयार करण्यात आली आहेत. पोलिसांकडून पुणे जिल्ह्यातील (Pune Police) परिसर पिंजून काढला जात आहे. रेल्वे स्टेशन, बस स्टँड या ठिकाणी आरोपीचा शोध घेतला जात असल्याची माहिती  पोलीस उपायुक्त स्मर्तना पाटील यांनी दिली आहे. अशातच आता पुणे पोलिसांच्या हाती आरोपी दत्तात्रय गाडे याच्याबाबत महत्त्वाची माहिती लागली आहे. पोलिसांना दत्तात्रय गाडे याचे शेवटचे लोकेशन समजले आहे. (Pune Rape news)

स्वारगेट डेपोत शिवशाही बसमध्ये तरुणीवर अत्याचार केल्यानंतर दत्तात्रय गाडे तातडीने तिथून पसार झाला होता. त्यानंतर दत्तात्रय गाडे याने तातडीने पुणे शहर सोडले होते. तो पुण्यातून थेट शिरुर जिल्ह्यातील आपल्या गावी गुनाट येथे गेल्याची माहिती समोर आली आहे. आरोपी दत्ता गाडेचे शेवटचं लोकेशन गुनाट गावात आढळून आले. गुन्हा घडल्याच्या दिवशी आरोपी हा स्वारगेटवरून थेट गावी गेला होता. पण तिथून तो नेमका कुठे गायब झाला, याचा शोध आता पोलिसांकडून सुरू आहे.

पोलिसांच्या अंदाजानुसार दत्तात्रय गाडे हा गुनाट गावाच्या आजुबाजूला शेतांमध्ये लपलेला असावा. त्यामुळे पोलिसांच्या पथकांकडून या भागात शोध मोहीम राबवली जात आहे. दत्तात्रय गाडे याला शोधण्यासाठी पोलिसांकडून डॉग स्क्वॉडची मदत घेतली जात आहे. गुन्हे शाखेने या सगळ्या तपासाची सूत्रे हाती घेतली आहेत. पोलिसांनी आतापर्यंत दत्तात्रय गाडे याचा भाऊ आणि मित्र-मैत्रिणींची चौकशी केली आहे. या सगळ्यांचे जबाब नोंदवून घेण्यात आले आहे. दत्तात्रय गाडेच्या एका मैत्रिणीने पोलिसांनी त्याच्याबद्दल आणखी काही धक्कादायक माहिती दिली आहे. त्यामुळे आता दत्तात्रय गाडे आणखी किती तास पोलिसांना गुंगारा देणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

पोलिसांनी तरुणीवरील अत्याचाराची माहिती लगेच उघड का केली नाही? गृहराज्यमंत्री योगेश कदमांनी सांगितलं कारण

तरुणीवर अत्याचार झाल्याची बातमी पोलिसांनी बाहेर येणार नाही, याची जाणीवपूर्वक दक्षता घेतली होती. ही बातमी बाहेर आली असतील तर कदाचित आपल्याला आरोपीचे आता जे संभाव्य लोकेशन मिळाले आहे, ते मिळू शकले नसते. ही बातमी बाहेर आली असती तर आरोपी दत्तात्रय गाडे हा सावध होऊन आणखी लांब पळून गेला असता. त्यामुळे ही घटना लपवण्याचा प्रयत्न झालेला नाही. पोलिसांकडून केवळ गुप्तता बाळगण्यात आली होती, असे स्पष्टीकरण गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिले. 

आणखी वाचा

घरी आई-वडील, भाऊ अन् बायको-पोरं, आधी चारचाकीच लिफ्ट देऊन महिलांची लूट करायचा, निवडणुकही लढवली; दत्तात्रय गाडेची कुंडली आली समोर

स्वारगेट बस डेपोत तरुणीवर एकदा नव्हे दोनवेळा अत्याचार, मेडिकल रिपोर्टमध्ये धक्कादायक माहिती उघड

गेल्या दहा वर्षांपासून एबीपी माझा मध्ये कार्यरत. पुण्यासह दिल्ली पंजाब आणि गुवाहाटी मध्ये काम करण्याची संधी मिळाल्यामुळे कृतज्ञ. वार्तांकन व्यतिरिक्त पर्यटनाचा छंद...
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Vijayapura Plane Accident : कलबुर्गीहून बेळगावला जाणारं विमान विजयपूरच्या शेतात कोसळलं, तांत्रिक बिघाड झाल्याची शक्यता
कलबुर्गीहून बेळगावला जाणारं विमान विजयपूरच्या शेतात कोसळलं, तांत्रिक बिघाड झाल्याची शक्यता
ट्रम्प म्हणाले, भारत रशियन तेल खरेदी करणार नाही; मंत्री पियुष गोयल म्हणाले, मला माहीत नाही, परराष्ट्र मंत्री उत्तर देतील; जयशंकर म्हणतात, पियुष गोयल करार करत होते, त्यांनाच अधिक माहिती
ट्रम्प म्हणाले, भारत रशियन तेल खरेदी करणार नाही; मंत्री पियुष गोयल म्हणाले, मला माहीत नाही, परराष्ट्र मंत्री उत्तर देतील; जयशंकर म्हणतात, पियुष गोयल करार करत होते, त्यांनाच अधिक माहिती
T20 World Cup: न्यूझीलंडची विजयी सलामी; टी-20 वर्ल्डकपच्या इतिहासात सर्वात मोठ्या टार्गेटचा यशस्वी पाठलाग
न्यूझीलंडची विजयी सलामी; टी-20 वर्ल्डकपच्या इतिहासात सर्वात मोठ्या टार्गेटचा यशस्वी पाठलाग
Ajit Pawar: दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांच्या अस्थी घेऊन जय पवार अनवाणी पायांनी प्रयागराजच्या संगमावर; मंत्रोच्चारात अस्थींचे विसर्जन
दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांच्या अस्थी घेऊन जय पवार अनवाणी पायांनी प्रयागराजच्या संगमावर; मंत्रोच्चारात अस्थींचे विसर्जन

व्हिडीओ

Uddhav Thackeray Special Report : संजय राऊतांकडून उद्धव ठाकरेंना साकडं, ठाकरे पुन्हा विधान परिषदेवर?
Ritu Tawde Special Report : रितू तावडेंच्या 'त्या' वक्तव्यावरुन राजकीय वातावरण तापलं, राऊतांची टीका
Ajit Pawar Accident : अजितदादांच्या अपघाताबाबत डीजीसीए अहवालातून शंकांचं समाधान होणार? Special Report
Solapur Mohol EVM : सोलापुरात मोहोळमध्ये धक्कादायक प्रकार, धाब्याच्या बाहेर EVM मशीन Special Report
Sayaji Shinde On NCP Merger: दादांनी राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर चर्चा केलेली?सयाजी शिंदे म्हणाले..

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vijayapura Plane Accident : कलबुर्गीहून बेळगावला जाणारं विमान विजयपूरच्या शेतात कोसळलं, तांत्रिक बिघाड झाल्याची शक्यता
कलबुर्गीहून बेळगावला जाणारं विमान विजयपूरच्या शेतात कोसळलं, तांत्रिक बिघाड झाल्याची शक्यता
ट्रम्प म्हणाले, भारत रशियन तेल खरेदी करणार नाही; मंत्री पियुष गोयल म्हणाले, मला माहीत नाही, परराष्ट्र मंत्री उत्तर देतील; जयशंकर म्हणतात, पियुष गोयल करार करत होते, त्यांनाच अधिक माहिती
ट्रम्प म्हणाले, भारत रशियन तेल खरेदी करणार नाही; मंत्री पियुष गोयल म्हणाले, मला माहीत नाही, परराष्ट्र मंत्री उत्तर देतील; जयशंकर म्हणतात, पियुष गोयल करार करत होते, त्यांनाच अधिक माहिती
T20 World Cup: न्यूझीलंडची विजयी सलामी; टी-20 वर्ल्डकपच्या इतिहासात सर्वात मोठ्या टार्गेटचा यशस्वी पाठलाग
न्यूझीलंडची विजयी सलामी; टी-20 वर्ल्डकपच्या इतिहासात सर्वात मोठ्या टार्गेटचा यशस्वी पाठलाग
Ajit Pawar: दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांच्या अस्थी घेऊन जय पवार अनवाणी पायांनी प्रयागराजच्या संगमावर; मंत्रोच्चारात अस्थींचे विसर्जन
दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांच्या अस्थी घेऊन जय पवार अनवाणी पायांनी प्रयागराजच्या संगमावर; मंत्रोच्चारात अस्थींचे विसर्जन
Mumbai Accident News: मुंबईत अल्पवयीन धनिकपुत्राच्या अलिशान कारने स्कुटीवरुन जाणाऱ्या जोडप्याला चिरडलं, नवरा-बायको गंंभीर जखमी, विद्याविहारमध्ये नेमकं काय घडलं?
मुंबईत अल्पवयीन धनिकपुत्राच्या अलिशान कारने स्कुटीवरुन जाणाऱ्या जोडप्याला चिरडलं, नवरा-बायको गंंभीर जखमी, विद्याविहारमध्ये नेमकं काय घडलं?
Pune Mhada Lottery News : 2.15 लाख अर्जदार अन् 4186 घरं! कोणाचं नशीब उघडणार?, उद्या दुपारी 12 वाजता लागणार पुणे म्हाडाच्या घरांचा 'जॅकपॉट'
2.15 लाख अर्जदार अन् 4186 घरं! कोणाचं नशीब उघडणार?, उद्या दुपारी 12 वाजता लागणार पुणे म्हाडाच्या घरांचा 'जॅकपॉट'
Mohan Bhagwat: स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न कधी मिळणार? मोहन भागवतांनी एका वाक्यात स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न कधी मिळणार? मोहन भागवतांनी एका वाक्यात स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
'तो शब्दच येता कामा नये'! अमोल मिटकरींचे रुपाली चाकणकरांना खडे बोल! म्हणाले, सुनेत्रा वहिनीच दादांच्या खऱ्या उत्तराधिकारी, त्यांच्याच नेतृत्वात आम्ही काम करू
'तो शब्दच येता कामा नये'! अमोल मिटकरींचे रुपाली चाकणकरांना खडे बोल! म्हणाले, सुनेत्रा वहिनीच दादांच्या खऱ्या उत्तराधिकारी, त्यांच्याच नेतृत्वात आम्ही काम करू
Embed widget