Prashant Koratkar: पोलिसांच्या नाकावर टिच्चून प्रशांत कोरटकरचं देशाबाहेर पलायन? अरबांच्या दुबईत आश्रय घेतला, फोटो व्हायरल
prashant koratkar in Dubai: प्रशांत कोरटकर याने इंद्रजित सावंत यांना धमकी देताना छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते.

नागपूर: इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकी देणे आणि छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा ठपका असणारा प्रशांत कोरटकर अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. कोल्हापूर पोलीस प्रशांत कोरटकर (prashant koratkar) याचा गेल्या अनेक दिवसांपासून शोध घेत आहेत. पोलिसांनी नुकतीच कोरटकर याच्या पत्नीची चौकशी केली होती. त्यावेळी तिने प्रशांत कोरटकर हा चंद्रपूरला गेल्याचे सांगितले होते. त्यामुळे कोल्हापूर पोलिसांचे पथक तातडीने चंद्रपूरच्या दिशेने रवाना झाले होते. मात्र, आता याप्रकरणात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रशांत कोरटकर याने देशाबाहेर पलायन केल्याचे समजत आहे.
प्राथमिक माहितीनुसार, प्रशांत कोरटकर हा कोलकाता विमानतळावरुन दुबईला पळून गेल्याची शक्यता आहे. त्याचा दुबईतील एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जंगजंग पछाडणाऱ्या पोलिसांच्या नाकावर टिच्चून प्रशांत कोरटकर हा दुबईला पळून गेल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर आणि विश्वासर्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित आहे. मुंबई उच्च न्यायालयाने प्रशांत कोरटकर याला अटकपूर्व जामीन द्यायला नकार दिला होता. त्यामुळे लपतछपत फिरणाऱ्या प्रशांत कोरटकर याने अरबांची दुबई जवळ केल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत अधिकृत माहिती समोर आली नसली तरी कोरटकरचा सोशल मिडीयावर व्हायरल होणारा फोटो सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
कोल्हापूर पोलिसांनी अलीकडेच प्रशांत कोरटकर याची पत्नी, नातेवाईक आणि मित्रांकडे चौकशी केली होती. त्यावेळी प्रशांत कोरटकर याच्या पत्नीने तो चंद्रपूरला गेल्याची माहिती दिली होती. त्यामुळे जुना राजवाडा पोलीस, एलसीबी आणि सायबर शाखेचे पोलीस चंद्रपूरला रवाना झाले होते. मात्र, आता कोरटकर हा दुबईत असल्याची माहिती समोर आल्यावर त्याच्या पत्नीने पोलिसांची दिशाभूल केली का, असा प्रश्नही उपस्थित झाला आहे. प्रशांत कोरटकर हा खरोखरच दुबईत असेल तर त्याला परत आणण्यासाठी राज्य सरकार आणि पोलीस काय पावले उचलणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
कोरटकर दुबईत पळून गेल्याची माहिती समोर. पाताळात जरी गेला तरी याला शोधून आणणे सरकार समोरचे आता मोठे आव्हान ठरले आहे. नागपूर वरून थेट दुबई गाठण्याकरिता कोरटकरने दंगलीचा आधार घेऊन पळ काढल्याचे एकंदरीत दिसते. गृह खात्याने त्याला तात्काळ मुसक्या आवळुन भारतात आणावे.@CMOMaharashtra
— आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) March 22, 2025
उच्च न्यायालयाने अंतरिम जामीन फेटाळला
इतिहासकार इंद्रजित सामंत यांना शिवीगाळ करत धमकी देणाऱ्या आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द वापरणाऱ्या प्रशांत कोरटकर (Prashant Koratkar) याचा अंतरिम जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने 19 मार्चला फेटाळला आहे. अंतरिम जामिनाचा अर्ज फेटाळण्यात आल्याने त्याला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता होती. त्यामुळे प्रशांत कोरटकर याच्यासमोर कोणताही पर्याय उरला नव्हता. प्रशांत कोरटकर हा गेल्या 25 फेब्रुवारी पासून फरार असून अटकपूर्व जमीन मंजूर असतानाही प्रशांत कोरटकर आपली बाजू मांडायला व आवाजाचे नमुने द्यायला पोलिसांपुढे पुढे आला नव्हता.
आणखी वाचा
जामीन फेटाळला, सात दिवसांची मुदतवाढ सुद्धा नाकारली तरी प्रशांत कोरटकर पोलिसांना शरण नाहीच
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

