देवेंद्र फडणवीस की एकनाथ शिंदे? तुमच्या जवळचे कोण? अजित पवारांनी झटक्यात सांगितलं नाव
सर्वात उत्तम मुख्यमंत्री विलासराव देशमुख (Vilsarao Deshmukh) होते, असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी व्यक्त केले.

Ajit Pawar : सर्वात उत्तम मुख्यमंत्री विलासराव देशमुख (Vilsarao Deshmukh) होते, असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी व्यक्त केले. दिल्लीसोबत मी माझ्या पद्धतीने चांगले संबंध ठेवले आहेत. एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) त्यांच्या पद्धतीने संबंध ठेवले आहेत असे अजित पवार म्हणाले. तुमच्या जवळचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (cm devendra fadnavis) आहेत की एकनाथ शिंदे असा प्रश्न देखील अजित पवार यांना विचारण्यात आला. यावर बोलताना अजित पवार म्हणाले की, सध्या देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळं तेच जवळचे. मी सध्या कोणालाही नाराज करणार नाही असे अजित पवार म्हणाले. एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र माझा व्हिजन या कार्यक्रमात अजित पवार बोलत होते.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात एसआयटी, सीआयडी नेमली आहे. आत्तापर्यंत या चौकशीत धनंजय मुंडे यांचे नाव कुठेही आले नसल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. ज्यावेळी संतोष देशमुखांना मारहाणीचे फोटो व्हायरल झाले आम्हालाही त्याच्या वेदना झाल्या. त्यानंतर आम्ही सगळे बसलो, त्यानंतर धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्याचे अजित पवार म्हणाले. या प्रकरणामध्ये कोणालाही पाठिशी घातलं जाणार नाही. कोणाचंही चुकीचं कृत्य खपवून घेतलं जाणार नाही असे अजित पवार म्हणाले. धनंजय मुंडेंबाबत विचारलेल्या प्रश्नावर अजित पवार बोलत होते.
कायद्याचे पालन सगळ्यांनी करावं अशी माझी भूमिका
माझं काम स्टेट फॉरवर्ड असते. बीड असो किंवा पुणे असो चुकीचं वागणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचे अजित पवार म्हणाले. कायद्याचे पालन सगळ्यांनी करावं अशी माझी भूमिका असल्याचे अजित पवार म्हणाले. छगन भुजबळ यांनी अनेक ठिकाणी काम केलं. विधानसभा, विधानपरिषदेवर काम केलं आहे. त्यांनी राज्यसभेवर जावं असं मला वाटत होतं. छगन भुजबळांना नाराज करण्याचा माझा किंवा पक्षाचा हेतू नव्हता असेही अजित पवार म्हणाले.
जल, हवाई याचबरोबर रस्ते वाहतूक देखील महत्वाची
कोणताही प्रकल्प हाती घेतल्यावर विरोध होतो, पण मार्ग निघतात असे अजित पवार म्हणाले. दळणवळण होणं महत्वाचं आहे. जल, हवाई याचबरोबर रस्ते वाहतूक देखील महत्वाची असल्याचे अजित पवार म्हणाले. पुणे विद्येचं माहेरघर आहे. सोयी सुविधा चांगल्या आहेत, त्यामुळं लोक मोठ्या प्रमाणात येत आहेत. पिंपची चिंचवडमध्ये कामाच्या निमित्ताने महाराष्ट्रभरातून लोक तिथं येत आहेत. पुण्यात अनेक ठिकाणी रस्त्यांची काम सुरु करणार आहोत. रिंग रोड करणार आहोत असे अजित पवार म्हणाले. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था भक्कम करण्यावर आमचा भर असणार आहे, असंही अजित पवार म्हणाले.
मंत्री म्हणून काम करतना तारतम्य ठेवून बोललं पाहिजे
औरंगजेबच्या कबरीच्या मुद्यावर देखील अजित पवार यांनी वक्तव्य केलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वांना बरोबर घेऊन राज्य केलं. तिच गोष्टी छत्रपती शाहू महाराजांनी, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केल्याचे अजित पवार म्हणाले. या सर्वांनी जातीय सलोखा राखण्याचे काम केले. कारण नसताना ऐकमेकांच्याबद्दल गैरसमज निर्माण करणे मला पटत नाही. त्या कबरीचे प्रकरण आत्ताच कशाला उकरुन काढायचे असे अजित पवार म्हणाले. ज्यावेळेस मंत्री म्हणून आपण काम करतो तेव्हा तारतम्य ठेवून बोललं पाहिजे असे अजित पवार म्हणाले.
देवेंद्र फडणवीस हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या किती जवळ हे मला माहित
मी व्यवहारी माणूस आहे. आमचे 41 आमदार होते. भाजपचे 127 आमदार आले होते, त्यामुळं भाजपचा मुख्यमंत्री होणार हे त्रिवार सत्य आहे. देवेंद्र फडणवीस हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या किती जवळ हे मला माहित असल्याचे अजित पवार म्हणाले. त्यामुळं आपण वेळ न घालवता उपमुख्यमंत्री व्हावं असे मला वाटल्याचे अजित पवार म्हणाले.
प्रत्येक पक्ष निर्विवाद सरकार कसं येईल याचा प्रयत्न करणारच आहे असे अजित पवार म्हणाले. मी पण उद्या म्हणेन की सगळ्या जागा लढवायच्या आहेत. पण मला माहित आहेत की किती जागा लढवायच्या आहेत असे अजित पवार म्हणाले. 1985 नंतर राज्यात कधीही एका पक्षाचं सरकार आलं नाही असे अजित पवार म्हणाले. सगळीकडील लोक वेगळा विचार करतात असे अजित पवार म्हणाले. मला वाटत नाही राज्यात कोणाचे एकाचे सरकार येईल, कोणाची ना कोणाची मदत घ्यावीच लागते असे अजित पवार म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
अजित पवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र; MPSC च्या तीन रिक्त पदांवरील सदस्यांची नियुक्ती तातडीने करा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

