IPL 2025 MI vs RCB : आयपीएलपूर्वी वातावरण तापलं! आरसीबीनं उडवली मुंबई इंडियन्सची खिल्ली, रजत पाटीदारची VIDEO क्लिप व्हायरल
आयपीएलचा 18 वा हंगाम आतापासून फक्त 22 तासांनी सुरू होणार आहे. पहिल्या सामन्यात गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्सचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी होईल.

IPL 2025 MI vs RCB : आयपीएलचा अठरावा हंगाम आतापासून फक्त 22 तासांनी सुरू होणार आहे. पहिल्या सामन्यात गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्सचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी होईल. पण, या सामन्यापूर्वीच आरसीबीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. जो पाहून आरसीबीचे चाहते आनंद घेत आहेत, पण मुंबई इंडियन्सचे समर्थक संतापले आहेत. रजत पाटीदार आयपीएल 2025 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे नेतृत्व करेल. या मोठ्या जबाबदारीपूर्वी त्यांची एक क्लिप चर्चेचा विषय बनली आहे.
RCB is leading by 1-0 over Mumbai Indians this season even before the start of the season! 😆 #IPL2025 pic.twitter.com/uRSrzdqKes
— Prathamesh Avachare (@onlyprathamesh) March 21, 2025
आरसीबीने मुंबई इंडियन्सची खिल्ली उडवली
आयपीएल 2025 सुरू होण्यापूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB) एक मोठा वाद निर्माण केला आहे. खरंतर, गेल्या वर्षी मुंबई इंडियन्सने रोहित शर्माच्या जागी हार्दिक पंड्याला कर्णधार म्हणून नियुक्त करून सर्वांना आश्चर्यचकित केले होते. एमआय ड्रेसिंग रूममध्येही मतभेद झाल्याच्या बातम्या आल्या. या हंगामाच्या सुरुवातीपूर्वी आरसीबीने काही जुन्या गोष्टी उकारल्या.
Wo wala clip delete kar do nhi toh bewaja panga ho jayega 👍
— Cricklover (@kumarmanoj_11) March 21, 2025
आरसीबीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये मिस्टर नॅग्स संघाचा कर्णधार रजत पाटीदार यांच्याशी बोलताना दिसत आहेत. एका मजेदार मुलाखतीत त्यांनी रजतला विचारले की, जेव्हा तू कर्णधार झालास तेव्हा विराट कोहली आणि फाफ डू प्लेसिस सारख्या आरसीबीच्या जुन्या कर्णधारांनी एक व्हिडिओ पोस्ट करून तुझे अभिनंदन केले. कर्णधारपदाची घोषणा करताना इतर संघांनीही असेच काही तरी करावे, असे तुला वाटत का?
RCB trolling MI
— SRH fan 🤫 (@GappaCricket) March 21, 2025
pic.twitter.com/Aw35RgMqEU
आरसीबीचा नवीन कर्णधार रजत पाटीदारने या प्रश्नाचे उत्तर टाळण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्या चेहऱ्यावर हास्य होते. तो म्हणाला, माफ करा, मला माहित नाही काय चाललंय. पण, यानंतर मिस्टर नॅग्स यांनी हे प्रकरण आणखी तापवले आणि म्हटले- अरे! रजत, तू किती निरागस आहेस, तुला खरंच माहित नाहीये? पण तू हसत का आहेस? तुम्हाला हेच म्हणायचे आहे ना एमआय (मला माहित नाही).
Question : How to win trophies ??
— 𝐇𝐲𝐝𝐫𝐨𝐠𝐞𝐧 𝕏 (@ImHydro45) March 21, 2025
RCB : "Mi nahii samjhaa" 🤡🤡 pic.twitter.com/lWIJ0zBvIt
मुंबई इंडियन्सचे चाहते संतापले?
आरसीबीचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मुंबई इंडियन्सचे चाहते संतापले आहेत. खरंतर, त्याला हे देखील माहित आहे की रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने गेल्या हंगामात घडलेल्या घटनांची खिल्ली उडवली आहे. या व्हिडिओनंतर, चाहते एमआय विरुद्ध आरसीबी सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. दोन्ही संघांमधील सामना 7 एप्रिल रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळला जाईल.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

