काहींच्या तोंडाची गटारंगगा उघडली की घाणच बाहेर निघते, तसंच या लाचखोर नवऱ्याच्या सुपारीबाज बाईचं तेच आहे, माझ्यावेळी 1760 चा आकडा सांगितला, मेहबुब शेख याची चित्रा वाघांवर बोचरी टीका
Mehboob Sheikh on Chitra Wagh : चांगल्या घरातील महिला कमरेखालची भाषा बोलू शकते का? अशी विचारणा मेहबूब शेख यांनी केली. ऐकायला तरी चांगलं वाटेल का? असे ते म्हणाले.

Mehboob Sheikh on Chitra Wagh : भाजप आमदार चित्रा वाघ यांनी सभागृहात अनिल परब यांना उद्देशून केलेल्या वक्तव्यानंतर जोरदार टीका होऊ लागली आहे. चित्रा वाघ यांनी परब यांच्यावर केलेल्या टीकेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी सुद्धा बोचरी टीका केली आहे. मेहबूब शेखसारख्यांना 1760 तंगड्याला बांधून फिरते, असे म्हणाल्या होत्या. आता हा आकडा कमी सांगितल्याचा टोला त्यांनी लगावला.
काहींच्या तोंडाची गटारंगगा उघडली की घाणच बाहेर निघते
मेहबुब शेख म्हणाले की, काही लोकांच्या तोंडाची गटारंगगा उघडली की घाणच बाहेर निघते. तसंच या लाचखोर नवऱ्याच्या सुपारीबाज बाईचं तेच आहे. माझ्यावेळी 1760 चा आकडा सांगितला होता. मेहबूब शेख सारखे 1760 तंगड्याला बांधून फिरते असे म्हणाल्या होत्या. आता अनिल परब आहेत. चांगल्या घरातील महिला कमरेखालची भाषा बोलू शकते का? अशी विचारणा मेहबूब शेख यांनी केली. ऐकायला तरी चांगलं वाटेल का? असे ते म्हणाले. भाजपला लाचखोर नवऱ्याच्या सुपारीबाज बाईला आमदार करायला लागलं, तर दुर्दैव असल्याचे ते म्हणाले. अशा लोकाना आमदार केल्यास तर सभागृहाचं पावित्र्य राहणार नाही, आता आणि बढतीसाठी प्रयत्न करतील, अशी टीका त्यांनी केली.
आमदार आदित्य ठाकरे निशाण्यावर
दुसरीकडे, महाराष्ट्रात औरंगजेबाच्या थडग्यावरून राजकारण तापल्यानंतर आता आमदार आदित्य ठाकरे निशाण्यावर आले आहेत. दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतची व्यवस्थापक असलेल्या दिशा सालियनच्या आत्महत्येचा मुद्दा गुरुवारी राज्य विधिमंडळाच्या चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनात पुन्हा एकदा गाजला. दिशाचे वडील सतीश सालियन यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून आपल्या मुलीच्या आत्महत्येच्या प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्याची मागणी करत आदित्य यांच्या चौकशीची मागणी केली आहे. त्यांनी या प्रकरणात आदित्य यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले असून सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. दिशाच्या वडिलांनीही आपल्या मुलीच्या हत्येपूर्वी तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा संशय व्यक्त केला आहे.
या मोठ्या मागणीनंतर गुरुवारी सत्ताधारी पक्षांच्या आमदारांनी आदित्य यांच्याविरोधात आघाडी उघडली. सुरुवातीला त्यांनी बॅनर, पोस्टर घेऊन विधानसभेच्या पायऱ्यांवर मूक निदर्शने केली. त्यानंतर सभागृहात हा मुद्दा जोरात मांडण्यात आला. दिशाच्या वडिलांच्या आरोपानंतर आदित्य यांनी सांगितले की, गेल्या पाच वर्षांपासून त्यांची प्रतिमा खराब करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हे प्रकरण न्यायालयात असून माझ्यावरील सर्व आरोपांची उत्तरे मी न्यायालयातच देईन. मूळ मुद्द्यांवरून लोकांचे लक्ष वळविण्याचा हा डाव आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

