एक्स्प्लोर
'लापता लेडीज' ऑस्करच्या शर्यतीतून बाहेर, पण UK चा हिंदी चित्रपट 'संतोष' शॉर्टलिस्ट; काय आहे कथा?
Oscar 2025: यावेळी ऑस्कर 2025 मध्ये एका हिंदी चित्रपटाची निवड करण्यात आली आहे. ही आमीर खान प्रोडक्शनच्या लापता लेडीज नसून यूकेमधल्या प्रोडक्शन हाऊसनं बनवलेला चित्रपट आहे.

Oscar 2025 UK Film Santosh Shortlisted
1/8

Oscar 2025: लापता लेडीज ऑस्कर 2025 च्या शर्यतीतून बाहेर पडली आहे, पण या यादीत ब्रिटनचा हिंदी चित्रपट 'संतोष'नं स्थान मिळवलं आहे. जाणून घेऊयात, काय आहे संतोषची कहाणी?
2/8

संतोष हा ब्रिटननं बनवलेला हिंदी भाषेतील चित्रपट आहे. या चित्रपटाला ऑस्कर 2025 मध्ये सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर चित्रपट कॅटेगरीत स्थान मिळालं आहे.
3/8

संतोष हा ब्रिटीश भारतीय चित्रपट निर्मात्या संध्या सुरी यांनी बनवला आहे. हा चित्रपट यूके, भारत, जर्मनी आणि फ्रान्स यांच्यात इंटरनेशल को-प्रोडक्शन आहे.
4/8

संतोषचा मे 2024 मध्ये 77व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये वर्ल्ड प्रीमियर झाला होता, जिथे या चित्रपटाला खूपच दादा मिळाली आणि सकारात्मक प्रतिसादही मिळाला होता.
5/8

संध्या सुरी दिग्दर्शित, या चित्रपटाची पटकथा एका तरुण हिंदू विधवेभोवती फिरते, या विधवेची भूमिका शहाना गोस्वामीनं साकारली आहे, जिला तिच्या पतीच्या मृत्यूनंतर त्याच्या जागी पोलीस हवालदार म्हणून नोकरी मिळाली आहे.
6/8

पण, नोकरी करताना तिला संस्थात्मक भ्रष्टाचाराशी झुंजावं लागत असल्यानं तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. एका दलित मुलीच्या निर्घृण हत्येचा तपास करण्याची जबाबदारी ती कशी पार पाडते? हे चित्रपट पाहिल्यानंतरच कळेल.
7/8

संतोष फिल्म फेस्टिवलमध्ये प्रीमियर करण्यात आला. हा चित्रपट अद्याप OTT वर प्रदर्शित झालेला नाही.
8/8

संतोष अभिनेत्री शहाना गोस्वामीनं तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर अकादमीच्या शॉर्टलिस्टची झलक शेअर केली आहे. तिनं लिहिलं आहे की, "आमच्या संतोष चित्रपटाला मिळालेल्या या लहानशा सन्मानासाठी मी टीमसाठी, विशेषत: आमच्या लेखिका-दिग्दर्शिका संध्या सुरी यांच्यासाठी खूप आनंदी आहे. 85 चित्रपटांमधून शॉर्टलिस्ट होणं किती अविश्वसनीय आहे. ज्यांना ते आवडलं, समर्थन दिलं आणि मतदान केलं त्या प्रत्येकाचे आभार."
Published at : 18 Dec 2024 11:18 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बॉलीवूड
नाशिक
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion