
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Yavatmal News : लग्नाचा स्वागत समारंभ आटोपून परतताना बस-ट्रकचा भीषण अपघात; चार ठार, सहा जखमी
Yavatmal News : खैरी येथून लग्नाचा स्वागत समारंभ आटपून परत यवतमाळ येथे जाणाऱ्या पाहुण्यांच्या उभ्या स्कूल बसला ट्रकने जबर धडक दिली. या अपघातात 4 जण ठार झाले आहेत. तर 6 जण जखमी झाले आहेत.

Yavatmal Accident News : यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातील (Ralegaon Taluka) खैरी येथून लग्नाचा स्वागत समारंभ आटपून परत यवतमाळ येथे जाणाऱ्या पाहुण्यांच्या उभ्या स्कूल बसला (School Bus) राळेगाव-यवतमाळ रोडवरील वाटखेडजवळ ट्रकने (Truck) जबर धडक दिली. या अपघातात 4 जण ठार झाले आहेत. तर 6 जण जखमी झाले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, यवतमाळच्या (Yavatmal Accident News) लोहारा परिसरात राऊत यांच्या मुलीचे लग्न खैरी येथील अनिकेत ताजने याच्याशी पार पडले. या विवाह सोहळ्याचा स्वागत समारंभ खैरी (ता. राळेगाव) येथे आयोजित करण्यात आला होता.
पंक्चर काढण्याचे काम सुरू असतानाच ट्रकची बसला जोरदार धडक
यासाठी पाहुणे स्कूल बसने खैरी येथे गेले होते. पाहुणे रात्री उशिरा परतताना राळेगाव-कळंब मार्गावरील वाटखेड गावाजवळ स्कूल बसचे टायर पंक्चर झाले. दुरुस्तीसाठी हे वाहन थांबल्यानंतर काही पाहुणे खाली उतरले होते. तर काही पाहुणे बसमध्येच बसले होते. पंक्चर काढण्याचे काम सुरू असतानाच ट्रकची स्कूल बसला जोरदार धडक बसली.
चार जणांचा मृत्यू, सहा जखमी
अपघात घडल्यानंतर जखमींना उपचारासाठी तत्काळ यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र श्रुती गजानन भोयर (12) परी गजानन भोयर (10) या दोन सख्ख्या बहिणी, तर लिलाबाई पांढरे(55) आणि निलेश छापेकर (35) यांचा मृत्यू झाला.जखमींमध्ये माया धांदे, छकुली बंधरे, सोनू काफेकर, आर्यन काफेकर, रूणाल बुरांडे, कुणाल काफेकर, शालीनी बुरांडे, नीलेश काफेकर, अक्षय राऊत (सर्व रा. घोन्सी, ता. पांढरकवडा) यांचा समावेश आहे.
ट्रकचालक पोलिसांच्या ताब्यात
या घटनेची माहिती राळेगाव येथील प्रवीण महाजन यांनी राळेगाव पोलिसांना कळविली. सचिन दरणे, शशिकांत धुमाळ, वसीम पठाण यांनी घटनास्थळ गाठून सर्व जखमींना राळेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात आणले. याप्रकरणी ट्रकचालक गजानन नामदेव हेने (रा. आर्णी) याला राळेगाव पोलिसांनी ताब्यात घेतले. या घटनेचा पुढील तपास ठाणेदार रामकृष्ण जाधव करीत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
