(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सरकारी नोकरीची संधी, विविध 234 जागांसाठी भरती; आजच करा अर्ज, पगार 40 ते 65 हजारांपर्यंत
25 नोव्हेंबर 2024 पासून येथील जागेसाठी उमेदवारांना अर्ज करता येईल. अर्ज करण्याची प्रक्रिया ऑफिशियल वेबसाइट mazagondock.in वरुन सुरू करण्यात आली आहे.
मुंबई : पदवीचं शिक्षण पूर्ण झालं की विद्यार्थ्यांना वेध लागतात ते नोकरीचे, त्यात सरकारी नोकरी मिळवून आयुष्य सेटल व्हावं अशीही अनेकांची इच्छा व अपेक्षा असते. त्यासाठी, सर्वोतोपरी प्रयत्न करत सरकारी नोकरीच्या (JOB) जागा निघाल्या की अर्ज भरणे,परीक्षेची तयारी करणे आणि परिक्षेत मेरीट लिस्टमध्ये आपलं नाव लागावं यासाठी पूर्ण क्षमेतनं प्रयत्न करण्याचं काम विद्यार्थ्याचं दिसून येतं. मात्र, गेल्या काही वर्षांपासून सरकारी नोकरीतील स्पर्धा ही उमेदवारांसाठी मोठं आव्हान ठरत आहे. त्यामुळे, सरकारी नोकरीच्या 1 जागेसाठी कधी कधी 1 हजार अर्ज आल्याचे पाहायला मिळते. मात्र, आपण स्पर्धेत असायलाच हवं. त्यामुळे, आता माझगाव डॉकमध्ये (mazagaon dock) उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी मिळणार आहे. माझगाव डॉक शिपबिल्डर्स (MDL) ने नॉन एक्झिक्युटीव्हच्या विविध पदांवर भरती काढण्यात आली असून त्याचे नोटिफिकेशन जारी झाले आहे.
25 नोव्हेंबर 2024 पासून येथील जागेसाठी उमेदवारांना अर्ज करता येईल. अर्ज करण्याची प्रक्रिया ऑफिशियल वेबसाइट mazagondock.in वरुन सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार, अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 16 डिसेंबर 2024 आहे. तर, अर्ज भरण्यासाठीचे शुल्क भरण्याची तारीखही वेबसाईटवर देण्यात आली आहे.
MDL Vacancy 2024 Notification: भरतीसंदर्भात महत्त्वाचे
माझगाव डॉक शिपबिल्डर्समध्ये विविध पदांसाटी ही भरतीप्रक्रिया राबवली जात आहे. त्यामध्ये, इलेक्ट्रिशियन, फिटर, गॅस कटर, जूनियर हिंदी ट्राँसलेटर, रिगर, स्टोर कीपर सह विविध पदांसाठी ही जाहिरात निघाली आहे. माझगाव डॉकच्या जाहिरातीनुसार तब्बल 234 जागांसाठी ही भरतीप्रकिया राबवली जात आहे. MDL Non Executive Recruitment 2024 Official Notification Download PDF येथे उमेदवारांना संपूर्ण जाहिरात वाचता येईल.
शैक्षिणिक अर्हता
या भरती प्रक्रियेत अर्ज करण्यासाठी उमेदवारांना मान्यताप्राप्त कॉलेज किंवा संस्थेतून संबंधित आयटीआय ट्रेडमध्ये अप्रेंटिसशिपचे ट्रेनिंग सर्टिफिकेट/ इलेक्ट्रिकल/पावर इंजीनियरिंग/इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन आदि डिग्री/डिप्लोमा असणे आवश्यक आहे. तसेच, तुमच्या शैक्षणिक अर्हतेबाबत इतरही माहिती अर्जात भरावी लागणार आहे.
वयोमर्यादा
माझगाव डॉक शिपबिल्डर्स भरती प्रक्रियेतील उमेदवारांसाठी वयाची अट कमीत कमी 18 वर्षे आणि जास्तीत जास्त 38 वर्षांपेक्षा जास्त नसावे. त्यात, मास्टर्स 1st क्लास ट्रेड अँड लाइसेंटसाठी वयोमर्यादा 48 वर्षे निर्धारित करण्यात आली आहे. या वयोमर्यादेचं मोजमाप 1 नोव्हेंबर 2024 पर्यंतच्या तारखेनुसार ग्राह्य धरले जाईल.
पगार
स्पेशल ग्रेड (IDA-IX) च्या पदासाठी उमेदवारांना 22,000 ते 83,190 रुपये प्रति महिना वेतन दिले जाईल. तर, स्किल्ड ग्रेड-I (IDA-V) ला 17,000-64360 आणि सेमी स्किल्ड Gr-I (IDA-II) साठी 13,200-49,910 रुपये प्रति महिना वेतन देण्यात येणार आहे.
लेखी परीक्षा व ट्रेडसंदर्भातील स्किल टेस्टद्वारे उमेदवारांची निवड केली जाईल.
या परीक्षेसाठी खुला, ओबीसी, व ईडब्लूएस प्रवर्गास 354 रुपये परीक्षा शुल्क भरावे लागेल. तर, एसी व एसटी प्रवर्गातील उमेदवारांना परीक्षा शुल्क माफ करण्यात आलं आहे.
हेही वाचा
राष्ट्रवादी अन शिवसेनेला केंद्रात मंत्रिपद; शिंदेंना स्थान?; महाराष्ट्रातील विजयानंतर दिल्लीत खलबतं