(Source: ECI/ABP News/ABP Majha)
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
परभणी (Parbhani) जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. शिक्षकाने आपल्या पत्नी आणि मुलीसह आत्महत्या (Teacher commits suicide with his wife and daughter) केल्याची खळबळजणक घटना घडली आहे.
Parbhani News : परभणी (Parbhani) जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. शिक्षकाने आपल्या पत्नी आणि मुलीसह आत्महत्या (Teacher commits suicide with his wife and daughter) केल्याची खळबळजणक घटना घडली आहे. परभणीच्या गंगाखेडमध्ये (Gangakhed) ही घटना घडलीय. या तिघांनी रेल्वेखाली येत आत्महत्या केली आहे. तिघांनी आत्महत्या का केली? याचं कारण मात्र अद्यापही अपष्ट आहे. या घटनेनं परभणी जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
परभणीच्या गंगाखेड शहरात अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. शिक्षकाने आपल्या पत्नी आणि मुलीसह रेल्वेखाली येत आत्महत्या केली आहे. या घटनेने गंगाखेडसह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. नेमकी ही आत्महत्या का केली? हे मात्र अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांनी तपास सुरु केला आहे. गंगाखेड शहरातील ममता विद्यालयामध्ये शिक्षक असलेल्या 45 वर्षीय मसनाजी तुडमे यांनी 40 वर्षीय पत्नी रंजना आणि 21 वर्षीय मुलगी अंजली यांच्यासह गंगाखेड मधील रेल्वे उड्डाणपुलाजवळील रेल्वे ट्रॅकवर जाऊन मालगाडी खाली येत आपली जीवनयात्रा संपवली आहे.
पोलिसांकडून तपास सुरु
कुटुंबाला घेवून एवढे मोठे पाऊल शिक्षक असणाऱ्या तुडमे यांनी का घेतले? हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. दरम्यान घटना कळताच गंगाखेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपरसे आणि गंगाखेड पोलिसांनी घटनास्थळावर पोहोचले असून मृतदेह ताब्यात घेण्यासह पंचनाम केला जात आहे. दरम्यान, या शिक्षकाने एवढे टोकाचे पाऊल का उचलले असेल याचीच सर्व परिसरात चर्चा सुरु आहे. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जातेय. दरम्यान, पोलीस पुढील तपास करत आहेत.
महत्वाच्या बातम्या: