Wardha Crime : दुचाकीवरून खाली पडलेल्या युवकाच्या अंगावरून बस गेली, वर्ध्यात अंगावर काटा आणणारा अपघात
Wardha accident : दुचाकीवरून खाली पडलेल्या युवकाच्या अंगावरून बस गेली आहे, यात त्याचा मृत्यू झालाय.
Wardha accident : आर्वी येथील सावळापूर गावात दोन दुचाकीचा अपघात झालाय. या अपघातादरम्यान अपघातात दुचाकीवरून खाली पडलेल्या युवकाच्या अंगावरून बस गेल्याने एकाचा जागीच मृत्यू झालाय. तर दुसऱ्या दुचाकीवरील जखमी तरुणाचा रुग्णालयात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सावळापूर येथे दोन दुचाकीची समोरासमोर धडक झाली. यामध्ये एक दुचाकीस्वार खाली पडला, दरम्यान मागून येणाऱ्या बसचे चाक त्याच्या अंगावरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना प्रत्यक्ष डोळ्याने पाहणाऱ्या अपघातातील दुसऱ्या दुचाकीवरील जखमी दुचाकीस्वार रुग्णालयात दाखल झाला. पण घटना पाहूनच या दुचाकीस्वाराला धक्का बसल्याने त्याचा रुग्णालयात मृत्यू झाला आहे.
चंद्रपुरात दोन ट्रकची समोरासमोर धडक, ड्रायव्हरचा मृत्यू
चंद्रपूर जिल्ह्यात भरधाव वेगात असलेल्या दोन ट्रकची समोरासमोर धडक झाल्याने एका ड्रायव्हरचा मृत्यू झालाय तर एक जण जखमी झालाय. कोठारी-गोंडपिपरी मार्गांवरील देवई फाट्याजवळ हा अपघात झाला असून अपघातात दोन्ही ट्रकचं मोठं नुकसान झालं. या अपघातात दोन्ही ट्रकची डिझेल टँक फुटल्यामुळे रस्त्यावर सर्वत्र डिझेल पसरलं होतं, त्यामुळे दोन्ही ट्रक पेट घेण्याची शक्यता असल्याने अग्निशमन दलाचे वाहन तातडीने घटनास्थळी दाखल झाले. या अपघातामुळे अहेरी- चंद्रपूर मार्गावरील वाहतूक काही वेळ खोळंबली होती मात्र कोठारी पोलीसांनी घटनास्थळी पोहोचत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.
चंद्रपूर : दुचाकीची ट्रॅक्टरला जबर धडक, अपघातात 3 युवकांचा मृत्यू
दुचाकीने ट्रॅक्टरला दिलेल्या जबर धडकेत 3 युवकांचा मृत्यू झालाय. सावली तालुक्यातील बोथली-हिरापूर रोडवरील मार्कंडेय विद्यालयासमोर काल रात्री अपघात झाला होता. अपघातानंतर घटनास्थळी एका तरुणाचा झाला होता मृत्यू तर आज उपचारादरम्यान गडचिरोली येथे 2 युवकांचा मृत्यू झालाय. तीनही युवक हिरापूर येथे नाटक पाहण्यासाठी जात असताना रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला त्यांच्या दुचाकीने जोरदार धडक दिली होती. दरम्यान, एका 24 तासांच्या आत दोन अपघाताच्या घटना समोर आल्या आहेत. बोथली-हिरापूर रोडवरील अपघातात तीन तरुणांचा मृत्यू झाल्याने सर्व स्तरातून हळहळ व्यक्त होतं आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या