(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nalasopara Achola Vasant nagri | नालासोपाऱ्यातील आचोळा वसंत नगरीत 41 इमारतींवर पालिकेची तोडक कारवाई
Nalasopara Achola Vasant nagri | नालासोपाऱ्यातील आचोळा वसंत नगरीत 41 इमारतींवर पालिकेची तोडक कारवाई
नालासोपारा पूर्व डम्पिंग ग्राऊंड आणि सांडपाणी प्रकल्पाच्या आरक्षित जागेवर अनधिकृत उभ्या असलेल्या 41 इमारतीवर आज पासून महापालिकेची तोडक कारवाही सुरू झाली आहे. महादेव अपार्टमेंट ही चार माजल्याची इमारत जेसीबी च्या साहाय्याने भुईसपाट केली आहे. आणखीन 6 इमारती तोडण्याच काम पालिकेकडून सुरू आहे. पालिकेने सध्या 9 खाली असलेल्या इमारती तोडण्यावर लक्ष केंद्रित केलं आहे. उद्या ही कारवाई सुरू राहणार आहे.
हे ही वाचा...
एकनाथ शिंदेंचे पुत्र श्रीकांत शिंदेंच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार?
राष्ट्रवादी कडून 8 कॅबिनेट आणि 3 राज्यमंत्री पदांची मागणी होते आहे. शिवसेना शिंदेकडून कॅबिनेट आणि राज्यमंत्रीपदं मिळून 12 मंत्रीपदांची मागणी केली आहे तर भाजपकडून 23 मंत्रीपदांची मागणी आहे दरम्यान सूत्रांची माहिती अशी आहे की राष्ट्रवादी आणि शिवसेनेला केंद्रात 1-1 कॅबिनेट मंत्रीपद दिलं जाण्याची शक्यता आहे - राष्ट्रवादीकडून सुनिल तटकरे किंवा प्रफुल पटेल यांच्यापैकी एकाची कॅबिनेटमध्ये वर्णी लागण्याची शक्यता आहे.. तर शिवसेनेकडून मुख्यमंत्री पुत्र श्रीकांत शिंदे यांना कॅबिनेटमध्ये स्थान मिळण्ाची शक्यता आहे.
हे ही वाचा..
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024) महायुतीला (Mahayuti) मोठं यश मिळालं तर महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) मोठा फटका बसला. यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी निवडणूक आयोगावर निशाणा साधला. सायंकाळी साडेपाच वाजेनंतर जे मतदान झालं आहे, त्याचे फोटो दाखवा. हे मतदान कुठल्या सेंटरवर झालं? साडेसात टक्क्यांनी मतदान कसं वाढलं? या सर्वाचं उत्तर निवडणूक आयोगाने (Election Commission) दिलं पाहिजे. जनतेची मतं चोरण्याचं आणि डाका टाकण्याचं काम निवडणूक आयोग करत असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला. आता यावर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी नाना पटोले यांना प्रत्युत्तर दिले आहे.