Solapur News: सोलापूरच्या अक्कलकोट रोड एमआयडीसीतील रबर कारखान्याला भीषण आग; आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू, आगीचं कारण अस्पष्ट
Solapur News: गुजरात रबर फॅक्टरी असे या आग लागलेल्या फॅक्टरीचे नाव आहे. आसपासचे दोन ते तीन कारखाने जळून खाक झाले आहे

सोलापूर: सोलापुरातल्या (Solapur News) अक्कलकोटमधील एमआयडीसीतल्या (Akkalkoat MIDC) गुजरात रबर कारखान्याला भीषण आग लागली आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी 50 हून अधिक अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. दरम्यान ही आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.. या आगीमध्ये संपूर्ण सामान जळून खाक झालमध्यरात्री 3 वाजताच्या सुमारास ही आग लागल्याची माहिती मिळत आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, गुजरात रबर फॅक्टरी असे या आग लागलेल्या फॅक्टरीचे नाव आहे. आसपासचे दोन ते तीन कारखाने जळून खाक झाले आहे. मध्यरात्री दोनच्या सुमारस आग लागल्याची माहिती मिळाली आहे. रबर फॅक्टरीला आग लागल्याने आग वेगाने पसरली. आगीची झळ आसपासच्या दोन तीन कारखान्याला आग लाागली आहे. आगीमध्ये संपूर्ण माल जळून खाक झाली आहे. मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नसल्याची प्राथमिक माहिती आहे.
अग्निशमन दलाचे प्रमुख केदारनाथ आवटे म्हणाले, घटनेची माहिती मिळताच सोलापुरातील सर्व फायर स्टेशनवरून घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या पाठवण्यात आल्या. मात्र आगीचे स्वरूप मोठे असल्याने जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाशी संपर्क करून चिंचोळी एमआयडीसी, अक्कलकोट, पंढरपूर या ठिकाणाहून देखील अग्निशमन यंत्रणा बोलवण्यात आली. मोठ्या प्रमाणात फोमचा वापर केल्याने आग नियंत्रणात आहे. मात्र अजून पूर्ण विझलेली नाही. फॅक्टरी जवळपास 5000 स्क्वेअर फुट परिसरामध्ये पसरलेली आहे. नियमानुसार साईड मार्जिन सोडणे गरजेचे आहे मात्र या ठिकाणी तसे केलेले नाही. साईड मार्जिनच्या जागेत साहित्य ठेवण्यात आले आहे. यामुळे अग्निशमन दलाला काम करण्यात अडथळा येत आहे. जेसीबीच्या साह्याने हे अडथळे दूर करून आतमध्ये पोहोचून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
