एक्स्प्लोर
कुख्यात गज्या मारणेवर 5 व्यांदा मकोका अंतर्गत कारवाई, पुणे पोलिसांनी उचललं; उद्या कोर्टात हजर करणार
शहरातील कोथरुड परिसरात शिवजयंतीच्या दिवशी मुरलीधर मोहोळ यांचे निकटवर्ती असलेले देवेंद्र जोग यांना मारहाण केल्याप्रकरणी गजा मारणेला पुणे पोलिसांनी अटक केली आहे.

Pune police mcoca FIR against gajya marne
1/7

शहरातील कोथरुड परिसरात शिवजयंतीच्या दिवशी मुरलीधर मोहोळ यांचे निकटवर्ती असलेले देवेंद्र जोग यांना मारहाण केल्याप्रकरणी गजा मारणेला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. यापूर्वी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली होती, हे सर्व आरोपी गज्या मारणे गँगशी संबंधित आहेत.
2/7

पुणे पोलिसांकडून पाचव्यांदा मकोका कायद्याअंतर्गत गज्या मारणे गँगवर कारवाई सुरु करण्यात आली आहे. यापूर्वी केले्या कारवाया तोंडदेखलेपणाच्या ठरल्या आहेत. त्यामुळे, पोलीस पुन्हा कारवाई करत आहेत.
3/7

केंद्रीय नागरी उड्डयन राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या जवळच्या व्यक्तीला मारणे टोळीतील गुंडांनी मारहाण केली होती. त्यानंतर मारहाण करणाऱ्या चारपैकी तिघांना अटक करुन पोलीसांनी त्यांची धींड काढली. त्यानंतर मारणे टोळीवर मकोको कायद्याअंतर्गत कारवाई सुरु करण्यात आली.
4/7

यापूर्वी तीन आरोपींना अटक केली होती, तर आणखी दोन आरोपी फरार आहेत. फरार आरोपींचा शोध सुरू असून या प्रकरणात फरार असलेल्या गजा मारणेला आम्ही अटक केली अशी माहिती पुणे पोलीस आयुक्त संभाजी कदम यांनी दिली. याप्रकरणात गजा मारण्याची संपूर्ण चौकशी झाल्यानंतर उद्या त्याला कोर्टात हजर केलं जाईल.
5/7

पुणे शहरातील कोथरूड परिसरामध्ये बुधवारी शिवजयंती दिवशी दुचाकीस्वार अभियंता देवेंद्र जोग या तरुणाला कुख्यात गुंड गज्या मारणेच्या गुंडांनी मारहाण केल्याची घटना समोर आली होती.
6/7

मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी देवेंद्र जोग यांची भेट घेऊन विचारपूस केली होती. तसेच, पुणे पोलिसांनी आत्मपरीक्षण केले पाहिजे, पुणे पोलीस डोळे बंद करुन बसलेत का? अशा भाषेत मोहोळ यांनी पोलिसांचा समाचार घेतला होता.
7/7

मंत्री मोहोळ यांच्या इशाऱ्यानंतर पुणे पोलिसांच्या कारवाईला वेग आला. त्यानुसार, आज गज्या मारणेला अटक करण्यात आली असून मकोका अंतर्गत कारवाई सुरू आहे.
Published at : 24 Feb 2025 06:56 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
सांगली
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion