Sharad Pawar Vs Sharad Pawar | संजय राऊतांची कोणती भूमिका पवारांना अमान्य? Rajkiy Shole
Sharad Pawar Vs Sharad Pawar | संजय राऊतांची कोणती भूमिका पवारांना अमान्य? Rajkiy Shole
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केलेल्या विधानानंतर दोन्ही शिवसेनांमध्ये वाकयुद्ध रंगलंय. मात्र या वाकयुद्धाच्या आडून एक शीतयुद्धही गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात सुरु होतं. हे शीतयुद्ध होतं ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार यांच्यात. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सत्कार केल्यापासून सुरु झालेल्या या शीतयुद्धाचा एक टप्पा आज पूर्ण झाला. नेमकं काय घडलं, पाहूया या स्पेशल रिपोर्टमधून.





















