एक्स्प्लोर
उन्हाळा सुरू... 2 दिवसांत 4 जिल्ह्यात वाढणार तापमान; हवामान प्रादेशिक विभागाकडून खबरदारीची सूचना
राज्यात उष्णतेची लाट पसरण्यास सुरुवात झाल्याचं पाहायला मिळत असून फेब्रुवारी महिन्यातच काही जिल्ह्यात 38 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे.

summer sunstroke in 4 district with mumbai and thane
1/7

राज्यात उष्णतेची लाट पसरण्यास सुरुवात झाल्याचं पाहायला मिळत असून फेब्रुवारी महिन्यातच काही जिल्ह्यात 38 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे.
2/7

मार्च महिना मध्यावर आला की उन्हाळ्याची चाहुल लागते, होळी सणात थंडी जळून जाते अन् उन्हाळा (Summer) सुरू होतो असे जुने-जाणते सांगत असतात. मात्र, अलिकडे तिन्ही ऋतूंमध्ये बदल झाल्याचं पाहायला मिळते. त्यामुळे, यंदाचा उन्हाळा काहीसा लवकरच सुरू झाला आहे.
3/7

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात तापमानाने फेब्रुवारी महिन्यातच पस्तीशी ओलांडली असून सोलापूर व नागपूरमध्ये तापमान 38 अंश सेल्सियसपर्यंत पोहोचलं आहे. त्याच, हवामान विभागाने पुढील दोन दिवसांत उष्णतेची लाट येणार असल्याचे म्हटलं आहे.
4/7

पुढील दोन दिवस मुंबई, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी या 4 जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राकडून देण्यात आला आहे. त्यामुळे, नागरिकांनी कडक उन्हापासून स्वत:चा बचाव करण्यासाठीचे साहित्य वापरले पाहिजे.
5/7

मुंबई आणि ठाण्यातील आजचं तापमान जवळपास 38 अशांच्या पार गलं असून कमाल तापमान सरासरीपेक्षा 5-6 अंश सेल्सिअस अधिक राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे, तापमानाचा अंदाज घेऊनच घराबाहेर पडायला हवं.
6/7

दरम्यान, 26 फेब्रुवारी रोजी पालघरमध्ये देखील उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच, सिंधुदुर्गात देखील तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे, उन्हाळा सुरुच झाला असल्याचे दिसून येते.
7/7

दरम्यान, आज सांगली जिल्ह्यात एका बर्फगोळा विक्रेत्याचा कडक उन्हामुळे उलट्या होऊन मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. त्यामुळे, उन्हाळ्यापूर्वीत ती व्यक्ती उष्माघाताचा पहिला बळी ठरली.
Published at : 24 Feb 2025 09:44 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
विश्व
क्राईम
क्रिकेट
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion