एक्स्प्लोर

Abhijeet Patil : विठ्ठल कारखान्याच्या चेअरमनपदी अभिजीत पाटील तर व्हाईस चेअरमनपदी प्रेमलताताई रोंगे 

अभिजीत पाटील यांची एकमतानं विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी निवड झाली आहे. तर व्हाइस चेअरमनपदी प्रेमलताताई रोंगे यांची निवड झाली आहे.

Vitthal Sahkari Sakhar Karkhana : अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या पंढरपूर तालुक्यातील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सत्ताधारी भालके गटाला यावर्षी धक्का बसला आहे. अभिजीत पाटील यांच्या श्री विठ्ठल परिवर्तन विकास आघाडीनं विजय मिळवला आहे. या विजयानंतर विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन पदाची धुरा कोणाकडे जाणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं होतं. मात्र, अखेर अभिजीत पाटील यांची एकमतानं कारखान्याच्या चेअरमनपदी निवड झाली आहे. तर व्हाइस चेअरमनपदी प्रेमलताताई रोंगे यांची निवड झाली आहे. दरम्यान, चेअरमनपदी निवड झाल्यानंतर निवडणूक अधिकारी नागेश पाटील  यांच्या शुभहस्ते कारखान्याचे रोलरचे पूजन करण्यात आलं.

विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या 21 जागांसाठी 5 जुलैला मतदान झालं होतं. या निवडणुकीत तिरंगी लढत झाली होती. यामध्ये सत्ताधारी असणाऱ्या भालके गटापुढं युवराज पाटील आणि अभिजीत पाटील या दोन गटांचं मोठं आव्हान होते. सर्वच राजकीय नेत्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. त्यामुळं या निवडणुकीत 'विठ्ठल' कोणाला पावणार याची उत्सुकता सर्वांना लागली होती. अखेर या निवडणुकीत अभिजीत पाटील यांनी बाजी मारली. अभिजीत पाटील यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह प्रा.बी.पी. रोंगे सर यांनी सहकार्य केलं. 

Abhijeet Patil : विठ्ठल कारखान्याच्या चेअरमनपदी अभिजीत पाटील तर व्हाईस चेअरमनपदी प्रेमलताताई रोंगे 

21 पैकी 20 जागांवर विजय

दरवर्षी 10 ते 12 लाख टन उसाचं गाळप करणारा कारखाना बंद असल्यानं पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. हा करखाना बंद असल्यामुळं सत्ताधारी भालके गटावर विविध प्रकारचे आरोप होत होते. या निवडणुकीत सत्ताधारी असणाऱ्या विठ्ठल परिवारात फूट पडली होती. विठ्ठल कारखान्याचे चेअरमन औदुंबंर पाटील यांचे नातू युवराज पाटील यांच्यासह अॅड. गणेश पाटील आणि अॅड. दीपक पवार यांनी सत्ताधारी गटातून फारकत घेत त्यांचा स्वतंत्र पॅनल उभा केला होता. तर या दोन्ही पॅनलपुढे धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांच्या पॅनलचं मोठं आव्हान होते. मात्र, अखेर अभिजीत पाटील यांनी या निवडणुकीत बाजी मारली आहे. 21 जागांपैकी 20 जागांवर जिंकत अभिजीत पाटील यांनी कारखान्यावर एकहाती सत्ता काबीज केली आहे. 

Abhijeet Patil : विठ्ठल कारखान्याच्या चेअरमनपदी अभिजीत पाटील तर व्हाईस चेअरमनपदी प्रेमलताताई रोंगे 

निकालापूर्वीच विजयाचा दावा

दरम्यान, या निवडणुकीपूर्वी एबीपी माझा डीजिटलनं धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन आणि श्री विठ्ठल शेतकरी विकास पॅनलचे प्रमुख अभिजीत पाटील यांच्याशी संपर्क साधला होता. त्यावेळीही या निवडणुकीत विजय आमच्याच पॅनेलचा विजय होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला होता. कारखान्याच्या 25 हजार 392 सभासद आहेत. यापैकी मी 16 ते 17 हजार सभासदांच्या भेटी घेतल्या होत्या. त्या सर्वांचा मला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे त्यांनी सांगितले होते. दरम्यान, सर्व शेतकऱ्यांची देणी, कामगारांच्या पगारी देऊनच कारखान्यात उसाची मोळी टाकणार असल्याचे अभिजीत पाटील यांनी स्पष्ट केले होते. त्यामुळं या हंगामात हा कारखाना सुरु होणार असल्यानं पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. 
 
महत्त्वाच्या बातम्या:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nagpur Crime: नागपूरच्या हुडकेश्वरमधील विवाहित महिलेच्या हत्याप्रकरणी धक्कादायक माहिती, प्रियकराचा मृतदेहावर बलात्कार
प्रियकराने विवाहित महिलेला गळा दाबून संपवलं, मृतदेहाशी शारीरिक संबंध; नागपूरमधील धक्कादायक घटना
दिल्लीचा निकाल धक्कादायक! शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात डोंगराएवढं काम करुनही पराभव, रोहित पवारांनी व्यक्त केली खंत  
दिल्लीचा निकाल धक्कादायक! शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात डोंगराएवढं काम करुनही पराभव, रोहित पवारांनी व्यक्त केली खंत  
Maharashtra Weather Update: फेब्रुवारीत अगदी एप्रीलसारखा उन्हाचा चटका! पुण्यात 36 अंशांपर्यंत पारा, उर्वरित राज्यात काय स्थिती?
फेब्रुवारीत अगदी एप्रीलसारखा उन्हाचा चटका! पुण्यात 36 अंशांपर्यंत पारा, उर्वरित राज्यात काय स्थिती?
हरियाणा, महाराष्ट्रानंतर दिल्लीतही अहंकाराने माती केली; दिल्लीत भाजपचा वनवास संपवण्यास काँग्रेसचा 'हात'भार; केजरीवाल, सिसोदियांसह 'आप'च्या 12 जागांवर पराभवाचे कारण काँग्रेस
हरियाणा, महाराष्ट्रानंतर दिल्लीतही अहंकाराने माती केली; दिल्लीत भाजपचा वनवास संपवण्यास काँग्रेसचा 'हात'भार; केजरीवाल, सिसोदियांसह 'आप'च्या 12 जागांवर पराभवाचे कारण काँग्रेस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Manoj Jarange Vs Devendra Fadnavis : आता रस्त्याची लढाई, 15 फेब्रुवारीपासून साखळी उपोषणABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलान्स : 7 AM : 09 Feb 2025 : ABP MajhaSpecial Report on Congress Delhi Election:दिल्लीतील पराभवामुळेRahul Gandhiयांच्या नेतृत्वावर प्रश्न?Anjali Damania On Majha Katta : माझा कट्टा : धनंजय मुंडे प्रकरणाचा 'दी एंड' काय? दमनियांचा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nagpur Crime: नागपूरच्या हुडकेश्वरमधील विवाहित महिलेच्या हत्याप्रकरणी धक्कादायक माहिती, प्रियकराचा मृतदेहावर बलात्कार
प्रियकराने विवाहित महिलेला गळा दाबून संपवलं, मृतदेहाशी शारीरिक संबंध; नागपूरमधील धक्कादायक घटना
दिल्लीचा निकाल धक्कादायक! शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात डोंगराएवढं काम करुनही पराभव, रोहित पवारांनी व्यक्त केली खंत  
दिल्लीचा निकाल धक्कादायक! शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात डोंगराएवढं काम करुनही पराभव, रोहित पवारांनी व्यक्त केली खंत  
Maharashtra Weather Update: फेब्रुवारीत अगदी एप्रीलसारखा उन्हाचा चटका! पुण्यात 36 अंशांपर्यंत पारा, उर्वरित राज्यात काय स्थिती?
फेब्रुवारीत अगदी एप्रीलसारखा उन्हाचा चटका! पुण्यात 36 अंशांपर्यंत पारा, उर्वरित राज्यात काय स्थिती?
हरियाणा, महाराष्ट्रानंतर दिल्लीतही अहंकाराने माती केली; दिल्लीत भाजपचा वनवास संपवण्यास काँग्रेसचा 'हात'भार; केजरीवाल, सिसोदियांसह 'आप'च्या 12 जागांवर पराभवाचे कारण काँग्रेस
हरियाणा, महाराष्ट्रानंतर दिल्लीतही अहंकाराने माती केली; दिल्लीत भाजपचा वनवास संपवण्यास काँग्रेसचा 'हात'भार; केजरीवाल, सिसोदियांसह 'आप'च्या 12 जागांवर पराभवाचे कारण काँग्रेस
हिंमत असेल तर राहुल गांधींनी माझ्याविरोधात लढावं, त्यांना चितपट केल्याशिवाय राहणार नाही चंद्रशेखर बावनकुळेचं खुलं आव्हान
हिंमत असेल तर राहुल गांधींनी माझ्याविरोधात लढावं, त्यांना चितपट केल्याशिवाय राहणार नाही चंद्रशेखर बावनकुळेचं खुलं आव्हान
Kiran Samant : मोठी बातमी : राजन साळवींना पक्षप्रवेश देताना एकनाथ शिंदे मला आणि उदय सामंताना विश्वासात घेतील : किरण सामंत
मोठी बातमी : राजन साळवींना पक्षप्रवेश देताना एकनाथ शिंदे मला आणि उदय सामंताना विश्वासात घेतील : किरण सामंत
Delhi Election : 'गर्व आणि अहंकाराचा चक्काचूर झाला, केजरीवाल रागाच्या भरात वस्तू फोडतात, शिवीगाळ करतात, मला हाकलून लावण्याचा प्रयत्न, पण..' सत्ता जाताच 'आप' खासदाराचा गंभीर आरोप
'गर्व आणि अहंकाराचा चक्काचूर झाला, केजरीवाल रागाच्या भरात वस्तू फोडतात, शिवीगाळ करतात, मला हाकलून लावण्याचा प्रयत्न, पण..' सत्ता जाताच 'आप' खासदाराचा गंभीर आरोप
Delhi Election Result 2025 : कुंभमेळ्याला न मानणाऱ्या काँग्रेसचं खातंही उघडलं नाही; नवनीत राणांचा प्रहार, केजरीवालांवरही हल्लाबोल
कुंभमेळ्याला न मानणाऱ्या काँग्रेसचं खातंही उघडलं नाही; नवनीत राणांचा प्रहार, केजरीवालांवरही हल्लाबोल
Embed widget