Manoj Jarange Vs Devendra Fadnavis : आता रस्त्याची लढाई, 15 फेब्रुवारीपासून साखळी उपोषण
Manoj Jarange Vs Devendra Fadnavis : आता रस्त्याची लढाई, 15 फेब्रुवारीपासून साखळी उपोषण
आता रस्त्यावर लढाई करणार, 15 तारखेपासून साखळी उपोषणाची घोषणा; मनोज जरांगे यांचा पुन्हा इशारा देवेंद्र फडणवीस हा माणूस म्हणजे फक्त चाल टाकणारा माणूस आहे. तू इतका बेईमान होऊ नको, मला आणि मराठ्यांना हलक्यात घेऊ नको. आम्हाला चॅलेंज देऊ नको. वेळ पडली तर 4 कोटी मराठे रस्त्यावर येतील, असा इशाराही त्यांनी दिला आहे. मात्र आता आपण रस्त्यावरची लढाई लढणार आहोत. सरकारच्या समोरासमोर लढू आणि ती जिंकू, त्यांनी साखळी उपोषणाची दखल नाही घेतली तर बेमुदत आमरण उपोषण करण्याची वेळ येईल. इथे सत्ता आणि दरारा फक्त मराठ्यांचा आहेत. एकदा जर आम्ही राज्य जाम करायला सुरुवात केली तर आम्ही उठणार नाही जातीवादने पछाडलेला माणूस जर कोणी असेल तर ते म्हणजे देवेंद्र फडणवीस आहे. आधी जनतेची इज्जत करायला शिका, तेव्हा तुम्ही राजा व्हाल...मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या






















