एक्स्प्लोर
Pandharpur News: राज ठाकरेंच्या नेत्याने पंढरपूरजवळ बांधलं मुंबईच्या थाटाला लाजवणारं हॉटेल, पाहा PHOTO
Solapur News: राज ठाकरे यांच्या हस्ते शुक्रवारी मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या हॉटेल ग्रँड रेसिडेन्सीचे होणार उद्घाटन होणार आहे. पंढरपूरपासून काही अंतरावर हे प्रशस्त हॉटेल उभारण्यात आले आहे.
hotel grand residency Solapur
1/6

राज ठाकरे यांच्या हस्ते शुक्रवारी मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या हॉटेल ग्रँड रेसिडेन्सीचे होणार उद्घाटन होणार आहे. पंढरपूरपासून पंधरा ते वीस मिनिट अंतरावर असलेल्या करकंब नजीक उभारण्यात आलेल्या हॉटेल ग्रँड रेसिडेन्सी या हॉटेलचे उद्घाटन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते शुक्रवार दिनांक 7 फेब्रुवारी रोजी होणार असून या कार्यक्रमासाठी माजी गृहमंत्री बाळ नांदगावकर, भाजपाचे पक्षनेते प्रवीण दरेकर हे उपस्थित राहणार आहेत.
2/6

या कार्यक्रमाला माढ्याचे आमदार अभिजीत पाटील, मोहोळचेआमदार राजू खरे, शिवसेनेचे संपर्कप्रमुख शिवाजी सावंत, मनसेचे अनिल शिदोरे, अविनाश अभ्यंकर, सहकार शिरोमणीचे चेअरमन कल्याणराव काळे, माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले हे मान्यवर ही उपस्थित राहणार असल्याची माहिती मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी दिली.
3/6

देशभरातून वर्षभर लाखो भाविक पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्मिणीमातेच्या दर्शनासाठी येत असतात. या येणाऱ्या भाविकांची सोय व्हावी. या उद्देशाने पंढरपूर पासून पंधरा ते वीस मिनिटांच्या अंतरावर असलेल्या करकंबनजीक मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी हॉटेल ग्रँड या पंचतारांकित हॉटेलची उभारणी केली आहे.
4/6

जवळपास १ लाख ४ हजार स्क्वेअर फुट जागेत असणाऱ्या या हॉटेलमध्ये 50 रुम, तीन हजार स्क्वेअर फुटचा हॉल, 25 हजार स्क्वेअर फुट लॉन, स्विमिंग पूल, प्रशस्त पार्किंगची सोय करण्यात आली आहे.
5/6

याचबरोबर हॉटेल श्रीयश रेस्टॉरंटची मुंबईच्या धर्तीवर निर्मिती करण्यात आली आहे. यामध्ये पंचतारांकित हॉटेल प्रमाणे विविध प्रकारच्या जेवणाचे मेन्यू मिळणार आहेत. याद्वारे हॉटेलच्या माध्यमातून 100 तरुणांना रोजगार मिळणार असल्याची माहिती दिलीप धोत्रे यांनी दिली.
6/6

दिलीप धोत्रे हे राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आहेत. त्यांनी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती.
Published at : 05 Feb 2025 01:59 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























