एक्स्प्लोर

Delhi Election Result 2025 : कुंभमेळ्याला न मानणाऱ्या काँग्रेसचं खातंही उघडलं नाही; नवनीत राणांचा प्रहार, केजरीवालांवरही हल्लाबोल

Delhi Election Result 2025 : दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि 'आप'ला मोठा धक्का बसलाय. यावरून नवनीत राणा यांनी राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधलाय.

Delhi Election Result 2025 : दिल्ली विधानसभा निवडणुकीची मतमोजणी आज शनिवारी (दि. 08) सकाळी आठ वाजेपासून सुरु झाली आहे. दिल्लीत एकूण 70 विधानसभेच्या जागा असून भाजपने (BJP) मोठी मुसंडी मारली आहे. भाजप 48 जागांवर आघाडीवर असून स्पष्ट बहुमताच्या दिशेने वाटचाल करत आहे. तर आम आदमी पार्टीला दिल्लीत मोठा धक्का बसला आहे.  आम आदमी पक्षाचे मुख्य नेते आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांचा पराभव झाला आहे. तर काँग्रेस दिल्लीत एकाही जागेवर आघाडीवर नाही. आता यावरून माजी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि अरविंद केजरीवाल यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. 

नेमकं काय म्हणाल्या नवनीत राणा? 

नवनीत राणा म्हणाल्या की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि दिल्लीच्या मतदारांचे अभिनंदन. कारण जे काँग्रेसवाले कुंभ मेळ्याला मानत नाही, जे कुंभमेळ्याच्या स्नानाला मानत नाहीत. सनातन धर्माला मानत नाहीत. हिंदुस्थानच्या हिंदू लोकांना मानत नाही. राम भगवानांना मानत नाही, असे काँग्रेसचे राहुल गांधी यांच्या पक्षाचे खाते सुद्धा दिल्लीत उघडलं नाही. तसेच जे खोट्याची राजनीती करतात, असे केजरीवाल ज्यांना स्वतःलाही निवडून आणता शकले नाही. त्यांच्या पक्षाची आज दयनीय परिस्थिती झाली आहे. राहुल गांधी आणि खोटी राजनीती करणारे केजरीवाल या दोघांना दिल्लीतील मतदारांनी चोख उत्तर दिल्याचा हल्लाबोल त्यांनी केलाय. 

भ्रष्टाचाराला खतपाणी देणाऱ्यांना जनतेने नाकारलं : अमोल मिटकरी

दरम्यान, दिल्लीच्या निकालावर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटलंय की,  आज दिल्लीच्या भ्रष्टाचारी चेहऱ्याला जनतेने नाकारलं आणि भारतीय जनता पार्टीकडे कौल दिला आहे. गेल्या दहा वर्षापासून आपची सत्ता ही दिल्लीत होती. पण जनतेलाही त्या ठिकाणी परिवर्तन पाहिजे होतं. भ्रष्टाचाराला खतपाणी देणाऱ्या आपला जनतेने नाकारलय. लोकशाहीमध्ये जनतेने दिलेला कौल मान्य केला पाहिजे. नाहीतर पुन्हा EVM वर खापर फोडून आपचे नेते मोकळे होतील. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेते 23 जागा दिल्लीत उभ्या केल्या होत्या. त्या ठिकाणी तीन टक्के मतदान आम्हाला मिळालं. मात्र, एक गोष्ट लक्षात घ्यावी त्या ठिकाणी राष्ट्रवादी शून्य होती. पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी पक्षाच्या मतांची टक्केवारी तीन टक्क्यांवर आणून त्या स्टेटसला मानलं पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पाय  रोवण्याची सुरुवात आता दिल्लीतून झालीय, असे अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे.  

आणखी वाचा 

Anna Hazare VIDEO : एवढं प्रेम केलं तुमच्यावरती... केजरीवालांच्या पराभवानंतर अण्णा हजारे रडले

एबीपी माझाच्या स्थापनेपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Narendra Modi Donald Trump : एकीकडे भारत आणि अमेरिकेची ट्रेड डीलवर चर्चा सुरु, नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले
नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले..
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
Umar Khalid : उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
Amit Shah: मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?

व्हिडीओ

Uddhav Thackeray On Amit Shah : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा अमित शाहांवर वार
Uddhav Thackeray PC FULL : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा Amit Shah यांच्यावर वार
Mahapalikecha Mahasangram Bhiwandi : पाणी, रस्ते,आरोग्य... मूलभूत सुविधांची वानवा ; भिवंडीकर आक्रमक
Mahapalikecha Mahasangram Amravati : भावी नगरसेवकांकडून अमरावतीकरांच्या अपेक्षा काय?
Sushma Andhare PC : पालखी मार्गाचा चौदाशे कोटींचा गैरव्यवहार, अंधारेंनी महामार्गाचा नकाशाच मांडला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Narendra Modi Donald Trump : एकीकडे भारत आणि अमेरिकेची ट्रेड डीलवर चर्चा सुरु, नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले
नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले..
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
Umar Khalid : उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
Amit Shah: मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
Eknath Shinde: मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मोठी बातमी! केंद्रीय कृषिमंत्र्यांविरुद्ध हक्कभंग ; ओमराजेंसह महाराष्ट्रातील 25 खासदारांच्या सह्या
मोठी बातमी! केंद्रीय कृषिमंत्र्यांविरुद्ध हक्कभंग ; ओमराजेंसह महाराष्ट्रातील 25 खासदारांच्या सह्या
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई
Embed widget