एक्स्प्लोर
माऊली..लग्न घटिका आली समीप, भक्त वऱ्हाडींना अक्षता वाटल्या, विठ्ठल - रुक्मिणीच्या विवाह सोहळ्यासाठी हजारो भक्तांची मांदियाळी, पहा PHOTO
परिसरात हजारोंच्या संख्येने भक्त लग्न सोहळा पाहण्यासाठी आले आहेत . हरीनामाच्या गजरात भक्तगण रमले आहेत.

Vitthal Rukminis Wedding eremony
1/8

आज वसंत पंचमी अर्थात श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या विवाह सोहळ्यानिमित्त पंढरपुरात हजारोंच्या संख्येने भक्तांची मांदियाळी आहे
2/8

हरिनामाच्या गजरात लग्नासाठी आलेली भक्त वऱ्हाडी मंडळी डोलू लागली आहेत .
3/8

लग्न घटिका समीप आली आहे .विठ्ठल मंदिराच्या बाहेर हजारोंच्या संख्येने भाविक देवाच्या डोक्यावर अक्षता टाकण्यासाठी एकत्र आले आहेत .
4/8

विवाहासाठी विठ्ठल रुक्मिणीच्या प्रतीकात्मक मूर्ती दाखल करण्यात आल्या आहेत .आषाढी एकादशी सारखे रूप विठ्ठल मंदिराला आले आहे .
5/8

परिसरात हजारोंच्या संख्येने भक्त लग्न सोहळा पाहण्यासाठी आले आहेत .मंदिर परिसरात पाय ठेवायला ही जागा नाही .
6/8

विवाह सोहळ्यापूर्वी भजन कीर्तन करत महिलांनी फेर धरला आहे .फुगड्या घालत मंदिर परिसर जल्लोष आणि गजबजला आहे .
7/8

वसंत पंचमीच्या शुभ मुहूर्तावर आज श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचा शाही विवाह सोहळा दुपारी संपन्न होत आहे.
8/8

श्रींचा गाभारा, विठ्ठल सभामंडप, श्री संत नामदेव महाराज पायरी, उत्तर द्वार , सोळखांबी, रुक्मिणी सभामंडप, मिरवणूक रथ या ठिकाणी सजावट करण्यात आली आहे. याकरिता सुमारे 100 कारागिरांनी रात्रभर परिश्रम घेतले आहेत.
Published at : 02 Feb 2025 01:09 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
बीड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
