Pune Crime News : पुणं हादरलं! भरसस्त्यात कोयत्याचे वार, 2 तरुण रक्तबंबाळ, पुण्यात नेमकं चाललंय काय?
कोयत्याने वार करुन दोन तरुणांना रक्तबंबाळ करण्यात आल्याची घटना घडली आहे. पुण्यात भरदिवसा हा थरार घडला आहे.
पुणे : पुण्यात कोयला वॉर तर संपायचं नाव घेत (Pune Crime news) नाही आहे. त्यातच पुन्हा कोयत्याने वार करुन दोन तरुणांना रक्तबंबाळ करण्यात आल्याची घटना घडली आहे. पुण्यात भरदिवसा हा थरार घडला आहे. पूर्ववैमनस्य आणि अनैतिक संबंधाच्या संशावरून एकमेकांवर वार केले आहेत. पुण्यात भर दिवसा घडलेल्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, शंकर मिरेकर आणि किशोर धोत्रे असे दोघे ही जणं या घटनेत जखमी झाले असून हे सगळं कृत्य पूर्ववैमनस्य आणि एका महिलेशी असलेल्या अनैतिक संबंधातून घडल्याचे प्राथमिक तपासातून निष्पन्न झाले आहे. मिरेकर आणि धोत्रे हे दोघे ही नातेवाईक आहेत. मिरेकर याला धोत्रे यावर राग होता आणि त्याचे एका महिलेशी अनैतिक संबंध असल्याचा संशय असल्याने त्याने मिरेकर याच्यावर कोयत्याने वार केले. त्यानंतर धोत्रे याने सुद्धा त्याच्या साथीदारांना बोलवून मिरेकर याच्यावर हल्ला चढवला. याप्रकरणी चतुशृंगी पोलिसांकडून तपास आणि गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
कालदेखील पुण्यात दोन ठिकाणी कोयता हल्ल्याच्या घटना समोर आल्या. नमाज पाठण करण्यासाठी गेलेल्या तरुणावर हल्ला करण्यात आला आणि दुसऱ्या घटनेत केबल टाकण्यासाठी गेलेल्या तरुणावरदेखील हल्ला करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतलं आहे. प्रकाश राठोड यांनी तक्रार दाखल केली आहे. औंध परिसरातील ड्रॅगन चायनिज समोर ही घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार केबल टाकण्यासाठी तरुण आला होता. त्यावेळी त्याला काही तरुणांनी शिवीगाळ केली.
पुण्यात मागील काही दिवसांपासून कोयता हल्ल्यांच्या घटनेत वाढ झाली आहे. पुण्यातील विविध परिसरात कोयता गॅंगने दहशत माजवली आहे. ही दहशत रोखण्याचे प्रयत्न पुणे पोलिसांकडून सातत्याने सुरु आहेत. मात्र तरीही प्रकार संपत नसल्याचं समोर येत आहे. पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी अनेक उपाययोजना राबवायला सुरुवात केली आहे. या टवाळ गुन्हेगारांना रोखण्यासाठी रोज नव्या शक्कल लढवत आहेत. अल्पवयीन गुन्हेगार असेल तर त्यांच्या पालकांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचा इशारादेखील दिला आहे. या टवाळखोरांना रोखण्याचं पुणे पोलिसांसमोर मोठं आव्हान आहे.
इतर महत्वाची बातमी-