एक्स्प्लोर

Pope Francis Health Update : कॅथलिक ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांची न्यूमोनिया आणि फुफ्फुसाच्या संसर्गामुळे प्रकृती चिंताजनक

पोप फ्रान्सिस हे गेल्या 1000 वर्षांतील पहिले व्यक्ती आहेत जे नॉन-युरोपियन असूनही कॅथलिक धर्मातील सर्वोच्च पदावर पोहोचले आहेत. पोप यांचा जन्म 17 डिसेंबर 1936 रोजी अर्जेंटिनातील फ्लोरेस शहरात झाला.

Pope Francis Health Update : कॅथलिक ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्या अंत्यसंस्काराची रिहर्सल सुरू झाल्याचा दावा करण्यात येत आहे. रोमन कॅथलिक चर्चचे मुख्यालय असलेल्या व्हॅटिकनच्या म्हणण्यानुसार, पोप यांनी स्वतः सांगितले आहे की न्यूमोनियापासून वाचण्याची कोणतीही आशा नाही. स्विस वृत्तपत्र ब्लिकने हा दावा केला आहे. हे वृत्त समोर आल्यानंतर स्विस गार्डच्या प्रवक्त्याने याला अफवा ठरवत ते त्यांच्या नेहमीच्या नित्यक्रमानुसार काम करत असल्याचे सांगितले. 88 वर्षीय पोप फ्रान्सिस यांना न्यूमोनिया आणि फुफ्फुसाच्या संसर्गामुळे गेल्या आठवड्यापासून रोमच्या जेमेली रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. व्हॅटिकनमधील सध्याची परिस्थिती गांभीर्याने घेतली जात आहे.

व्हॅटिकन म्हणाले, पोप यांची प्रकृती स्थिर

पोप यांची प्रकृती स्थिर असल्याचे व्हॅटिकनने गुरुवारी सांगितले. त्यांच्यात किंचित सुधारणा झाली आहे. सीएनएनने व्हॅटिकनच्या एका स्रोताचा हवाला देत म्हटले आहे की पोप आपल्या पलंगावरून उठून हॉस्पिटलच्या खोलीत खुर्चीवर बसू शकले. यापूर्वी सोमवारी व्हॅटिकनने सांगितले होते की पोप फ्रान्सिस यांना श्वसनमार्गामध्ये पॉलिमायक्रोबियल इन्फेक्शन आहे, त्यामुळे त्यांचे वैद्यकीय उपचार बदलावे लागले. यानंतर मंगळवारी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दोन्ही फुफ्फुसांमध्ये न्यूमोनिया असूनही पोप फ्रान्सिस यांचा मूड चांगला आहे. तर बुधवारी पोप यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे वृत्त आहे. व्हॅटिकनचे प्रवक्ते मॅटेओ ब्रुनी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारपर्यंत पोप फ्रान्सिस यांना त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांशिवाय कोणीही भेटायला आले नाही.  

मेलोनी पोप यांच्या भेटीसाठी पोहोचल्या

बुधवारी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी पोप यांना भेटण्यासाठी पोहोचल्या. दोघांमध्ये सुमारे 20 मिनिटे भेट झाली. भेटीनंतर मेलोनी यांनी सांगितले की, पोप यांच्या प्रकृतीत थोडी सुधारणा होत असून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य आहे. मेलोनी म्हणाल्या की, 'पोप आणि मी नेहमीप्रमाणे विनोद केला. पोप यांनी आपली विनोदबुद्धी गमावलेली नाही. पोप यांना भेटणाऱ्या मेलोनी या पहिल्या नेत्या आहेत.

एक हजार वर्षांत पोप बनणारे पहिला गैर-युरोपियन

पोप फ्रान्सिस हे अर्जेंटिनाचे जेसुइट धर्मगुरू आहेत जे 2013 मध्ये रोमन कॅथोलिक चर्चचे 266 वे पोप बनले. ते पोप बेनेडिक्ट यांचे उत्तराधिकारी म्हणून निवडले गेले. पोप फ्रान्सिस हे गेल्या 1000 वर्षांतील पहिले व्यक्ती आहेत जे नॉन-युरोपियन असूनही कॅथलिक धर्मातील सर्वोच्च पदावर पोहोचले आहेत. पोप यांचा जन्म 17 डिसेंबर 1936 रोजी अर्जेंटिनातील फ्लोरेस शहरात झाला. पोप यांनी आपले बहुतेक आयुष्य अर्जेंटिनाची राजधानी ब्युनोस आयर्समध्ये व्यतीत केले आहे. सोसायटी ऑफ जीझस (जेसुइट्स) चे सदस्य असणारे आणि अमेरिकन खंडातून आलेले ते पहिले पोप आहेत. त्यांनी ब्युनोस आयर्स विद्यापीठातून तत्त्वज्ञान आणि धर्मशास्त्रात पदव्युत्तर पदवी मिळवली होती.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gold Rates: शेअर मार्केट कोसळलं, गुंतवणुकीसाठी सोन्यातील गुंतवणुकीचा पर्याय सर्वात सेफ, जाणून घ्या सोन्याचे भाव कसे वाढले?
गुंतवणुकीचा सर्वात सेफ ऑप्शन, एक तोळा सोन्याचा दर 7000 ते 90000 पर्यंत कसा वाढला?
Matric Student Shot Dead : इकडं जालन्यात दहावीचा मराठी पेपर फुटला अन् तिकडं काॅपी दाखवली नाही म्हणून एका विद्यार्थ्याने दोन विद्यार्थ्यांना रस्त्यावर गोळ्या घातल्या, एकाचा मृत्यू
इकडं जालन्यात दहावीचा मराठी पेपर फुटला अन् तिकडं काॅपी दाखवली नाही म्हणून एका विद्यार्थ्याने दोन विद्यार्थ्यांना रस्त्यावर गोळ्या घातल्या, एकाचा मृत्यू
Raigad & Nashik Guardian Minister : भरत गोगावलेंना पालकमंत्रिपद द्यायचं की नाही, आता अमित शाह निर्णय घेणार, नाशिकचा तिढाही सोडवणार!
भरत गोगावलेंना पालकमंत्रिपद द्यायचं की नाही, आता अमित शाह निर्णय घेणार, नाशिकचा तिढाही सोडवणार!
मला हलक्यात घेऊ नका, ज्यांना हा संकेत समजून घ्यायचा त्यांनी समजून घ्यावा; एकनाथ शिंदेंचा इशारा कोणाला?
मला हलक्यात घेऊ नका, ज्यांना हा संकेत समजून घ्यायचा त्यांनी समजून घ्यावा; एकनाथ शिंदेंचा इशारा कोणाला?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sharad Pawar Speech Delhi : 'माझ्यामुळेच १९९९ ला वाजपेयींचं सरकार एका मतानं पडलं' शरद पवारांचं भाषणJalana Copy Case : जालन्यात दहावीचा मराठीचा पेपर फुटला, कॉपीमुक्त परिक्षेचा फज्जाMahesh Zagade Pune : धनंजय मुंडेंनी प्रस्ताव न मांडता मंजुरी दिल्याचा आरोप, नियम नेमका काय?Vijay Kumbhar Pune : अब्दुल सत्तांनी शासकीय अनुदान लाटल्याचा विजय कुंभार यांचा आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Rates: शेअर मार्केट कोसळलं, गुंतवणुकीसाठी सोन्यातील गुंतवणुकीचा पर्याय सर्वात सेफ, जाणून घ्या सोन्याचे भाव कसे वाढले?
गुंतवणुकीचा सर्वात सेफ ऑप्शन, एक तोळा सोन्याचा दर 7000 ते 90000 पर्यंत कसा वाढला?
Matric Student Shot Dead : इकडं जालन्यात दहावीचा मराठी पेपर फुटला अन् तिकडं काॅपी दाखवली नाही म्हणून एका विद्यार्थ्याने दोन विद्यार्थ्यांना रस्त्यावर गोळ्या घातल्या, एकाचा मृत्यू
इकडं जालन्यात दहावीचा मराठी पेपर फुटला अन् तिकडं काॅपी दाखवली नाही म्हणून एका विद्यार्थ्याने दोन विद्यार्थ्यांना रस्त्यावर गोळ्या घातल्या, एकाचा मृत्यू
Raigad & Nashik Guardian Minister : भरत गोगावलेंना पालकमंत्रिपद द्यायचं की नाही, आता अमित शाह निर्णय घेणार, नाशिकचा तिढाही सोडवणार!
भरत गोगावलेंना पालकमंत्रिपद द्यायचं की नाही, आता अमित शाह निर्णय घेणार, नाशिकचा तिढाही सोडवणार!
मला हलक्यात घेऊ नका, ज्यांना हा संकेत समजून घ्यायचा त्यांनी समजून घ्यावा; एकनाथ शिंदेंचा इशारा कोणाला?
मला हलक्यात घेऊ नका, ज्यांना हा संकेत समजून घ्यायचा त्यांनी समजून घ्यावा; एकनाथ शिंदेंचा इशारा कोणाला?
विद्यार्थ्यांना कॉपी पुरवण्यासाठी गर्दी, जालन्यात परीक्षा केंद्राबाहेर तरुणांची हुल्लडबाजी
विद्यार्थ्यांना कॉपी पुरवण्यासाठी गर्दी, जालन्यात परीक्षा केंद्राबाहेर तरुणांची हुल्लडबाजी
PM Kisan Yojana : पीएम किसानचे 2000 रुपये महाराष्ट्रातील किती शेतकऱ्यांना मिळतात? 19 व्या हप्त्यापूर्वी करावं लागेल महत्त्वाचं काम
पीएम किसानच्या 19 व्या हप्त्याचे 2000 लवकरच खात्यात येणार, ई केवायसी अपडेट कशी करायची?
Anna Hazare: आता धनंजय मुंडेंचा राजीनामा अटळ? भ्रष्टाचारविरोधी लढ्याचे मेरुमणी अण्णा हजारे पहिल्यांदाच बोलले, म्हणाले....
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी आता अण्णा हजारे मैदानात, म्हणाले, राजीनामा द्यायला पाहिजे!
तुमच्या आपत्कालीन खर्चांसाठी पर्सनल लोनचा वापर कसा कराल?  
तुमच्या आपत्कालीन खर्चांसाठी पर्सनल लोनचा वापर कसा कराल?  
Embed widget