Pune News : नमाज पठणासाठी आलेल्या तरुणावर कोयता हल्ला; सीसीटीव्ही फुटेज समोर, पूर्ववैमनस्यातून हल्ल्याचा संशय
नमाज पठण करण्यासाठी गेलेल्या तरुणावर कोयत्याने हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा सीसीटीव्ही फुटेजदेखील समोर आलं आहे.
पुणे : पुण्यात येरवडा परिसरात पुन्हा कोयता गॅंगने (Koyta Gang) दहशत माजवल्याचे (Pune Crime news) प्रकार संपायचं नाव घेत नाही आहेत. त्यातच नमाज पठण करण्यासाठी गेलेल्या तरुणावर कोयत्याने हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा सीसीटीव्ही फुटेजदेखील समोर आलं आहे. येरवडा येथे कामगार नगरमध्ये बजरे मज्जित येथे नमाज पठण करण्याकरिता एक जण आला होता. त्यावेळी त्याच्यावर कोयता हल्ला करण्यात आला.
पूर्ववैमनस्यातून हा हल्ला करण्यात आल्याचे समजत आहे. दोन गटात भांडण होते एक जण कोयत्याने मारहाण करिता त्याच्या अंगावर धावून गेला होता तो मज्जिदमध्ये पळ घेतल्यामुळे त्याचा जीव वाचला. आरोपी त्या ठिकाणी फिरत होते. सीसीटीव्ही फुटेटमध्ये पाच सहा जणांच्या हातामध्ये कोयता दिसत आहे. पोलीस CCTV च्या मदतीने आरोपींचा शोध घेत आहेत.
केबल टाकणाऱ्या तरुणावर हल्ला
यासोबतच पुण्यातील औंध परिसरातदेखील असाच प्रकार समोर आला आहे. टवाळखोरांनी थेट केबल टाकणाऱ्या तरुणावर कोयत्याने हल्ला केला आहे. यात दोन अल्पवयीन मुलांचादेखील समावेश आहे. या प्रकरणी पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतलं आहे. प्रकाश राठोड यांनी तक्रार दाखल केली आहे. औंध परिसरातील ड्रॅगन चायनिज समोर ही घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार केबल टाकण्यासाठी तरुण आला होता. त्यावेळी त्याला काही तरुणांनी शिवीगाळ केली. त्यानंतर लाथाबुक्यांनी मारहाण केली आणि कोयत्याने हल्ला केला. यात तरुण जखमी झाला.
पुणे पोलिसांसमोर मोठं आव्हान
पुण्यात मागील काही दिवसांपासून कोयता हल्ल्यांच्या घटनेत वाढ झाली आहे. पुण्यातील विविध परिसरात कोयता गॅंगने दहशत माजवली आहे. ही दहशत रोखण्याचे प्रयत्न पुणे पोलिसांकडून सातत्याने सुरु आहेत. मात्र तरीही प्रकार संपत नसल्याचं समोर येत आहे. पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी अनेक उपाययोजना राबवायला सुरुवात केली आहे. या टवाळ गुन्हेगारांना रोखण्यासाठी रोज नव्या शक्कल लढवत आहेत. अल्पवयीन गुन्हेगार असेल तर त्यांच्या पालकांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचा इशारादेखील दिला आहे. या टवाळखोरांना रोखण्याचं पुणे पोलिसांसमोर मोठं आव्हान आहे.
इतर महत्वाची बातमी-
इतर महत्वाची बातमी-