Jalana Copy Case : जालन्यात दहावीचा मराठीचा पेपर फुटला, कॉपीमुक्त परिक्षेचा फज्जा
Jalana Copy Case : जालन्यात दहावीचा मराठीचा पेपर फुटला, कॉपीमुक्त परिक्षेचा फज्जा
जालना- जालन्यातील मंठा तालुक्यातील तळणी येथे कॉपी पुरवण्यासाठी विद्यार्थ्यांची गर्दी.. परीक्षा केंद्राबाहेर बाहेर तरुणांची हुल्लडबाजी.. जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातल्या तळणी येथे दहावी परीक्षेच्या पहिल्याच दिवशी कॉप्या पुरवणाऱ्यांची गर्दी केंद्राबाहेर पाहायला मिळाली, मराठीच्या पहिल्याच पेपरला, केंद्राबाहेर कॉपी पुरवण्यासाठी गर्दी आणि हुल्लडबाजी पाहायला मिळाली. तळणी गावातील जिल्हा परिषदेच्या परीक्षा केंद्रावरचा हा प्रकार आहे, त्यामुळे आत मध्ये परीक्षा देणाऱ्या परीक्षार्थींना बाहेरील गोंधळाचा परीक्षेदरम्यान त्रास सहन करावा लागला.
हे ही वाचा..
राज्यातील 10 वी (SSC Exam) आणि 12 वीच्या परीक्षामध्ये कुठेही कॉपीचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून राज्य शासन कठोर पाऊले उचलत आहे. सध्या सुरू असलेल्या दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेदरम्यान ज्या परीक्षा केंद्रावर गैरमार्गाचे प्रकरण आढळून येतील त्या परीक्षा केंद्राची केंद्र मान्यता पुढील वर्षापासून रद्द करण्यात येणार आहे, याबाबतचा निर्णय बोर्डाकडून घेण्यात आला आहे. तसेच, कॉपीमुक्त अभियान जोरदारपणे राबविण्यात येत आहे. विशेष म्हणजे भरारी पथक बनून चक्क राज्याचे शिक्षणमंत्री देखील परीक्षा केंद्रावर धडक देत आहेत. शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर (Pankaj Bhoyar) यांनी आज पिंपरी चिंचवड (Pune) शहरातील कै.अण्णासाहेब मगर माध्यमिक विद्यालयात दहावीच्या परीक्षा केंद्राला भेट देत कॉपीमुक्त अभियाना संदर्भात आढावा घेतला. यावेळी, त्यांनी थेट परीक्षा केंद्रावरील वर्गात जाऊन विद्यार्थ्यांची पाहणी केली. परीक्षा केंद्रावर कुठलाही गैरप्रकार होता कामा नये, कॉपीमुक्त परीक्षा अभियान काटेकोरपणे राबवले जाते की नाही, याची पाहणी करत केंद्र प्रमुखांना सूचना केल्या.























