PM Kisan Yojana : पीएम किसानचे 2000 रुपये महाराष्ट्रातील किती शेतकऱ्यांना मिळतात? 19 व्या हप्त्यापूर्वी करावं लागेल महत्त्वाचं काम
PM Kisan Yojana : पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 19 व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात 24 फेब्रुवारी रोजी वर्ग करण्यात येणार आहे.

PM Kisan Samman Nidhi Yojana नवी दिल्ली : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 19 वा हप्ता शेतकऱ्यांना येत्या 24 फेब्रुवारीला मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी किसान सन्मान निधीचं हस्तांतरण 24 फेब्रुवारी रोजी बिहारच्या भागलपूर येथून केलं जाणार आहे. पीएस किसान सन्मान निधी योजनेतून आतापर्यंत शेतकऱ्यांना 18 हप्त्यांचे 36000 रुपये देण्यात आले आहेत. पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 19 व्या हप्त्याची रक्कम मिळवायची असल्यास शेतकऱ्यांना ई-केवायसी पूर्ण करावी लागणार आहे.
पीएम किसान सन्मान निधीचे महाराष्ट्रात किती लाभार्थी ?
पीएम किसान सन्मान निधी योजनेचे महाराष्ट्रात पात्र लाभार्थी 91 लाख 51 हजार 365 इतके आहेत.यापैकी 91 लाख 41 हजार 980 शेतकऱ्यांना ऑक्टोबर महिन्यातील 18 व्या हप्त्याची रक्कम मिळाली आहे. तर, सर्वाधिक लाभार्थी शेतकरी उत्तर प्रदेशात असून ती 2 कोटी 25 लाख 94147 लाभार्थी शेतकरी आहेत. यापैकी 2 कोटी 25 लाभ 72533 शेतकऱ्यांना ऑक्टोबरमध्येजारी करण्यात आलेल्या 18 व्या हप्त्याची रक्कम दिली गेली आहे.
पीएम किसान सन्मान निधीचा लाभ कायम ठेवण्यासाठी काय करावं लागेल?
पीएम किसान सन्मान निधी योजनेचे 2000 रुपये एप्रिल 2019 पासून शेतकऱ्यांना दिले जात आहेत. पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना आतापर्यंत 18 हप्त्यांची रक्कम देण्यात आली आहे. म्हणजेच जे शेतकरी पहिल्यापासून या योजनेचे लाभार्थी आहेत. त्यांना आतापर्यंत 36000 रुपये मिळाले आहेत. आता ज्या शेतकऱ्यांना असं वाटतं की आपल्याला मिळणारा पीएम किसानचा लाभ सुरु राहावा. यासाठी शेतकऱ्यांनी तीन काम पूर्ण करणं आवश्यक आहे. यामध्ये शेतकऱ्यांना तीन कामं करावी लागतील. ई केवायसी पूर्ण करणे, जमीन पडताळणी आणि बँक खातं डीबीटीसाठी सक्रीय करण आवश्यक आहे.
ईकेवायसी पूर्ण करावी लागणार
पीएम किसानचे 2000 रुपये मिळवण्यासाठी शेतकर्यांना ई केवायसी पूर्ण करावी लागेल. यासाठी गुगल प्ले स्टोअरवरुन पीएम किसान मोबाईल अॅप डाऊनलोड करा. यामध्ये आधार क्रमांक आणि बेनिफिशरी आयडी नोंदवून लॉगीन करा. यानंतर तुम्हाला ओटीपी क्रमांक प्राप्त होईल. यानंतर फेस ऑथेंटिकेशन फीचरचा उपयोग करुन निर्देशांचं पालन करुन आपली ई केवायसी पूर्ण करा. याशिवाय सीएससी केंद्रावर जाऊन ई केवायसी पूर्ण करता येईल.
19 व्या हप्त्याची रक्कम किती शेतकऱ्यांना मिळणार?
पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 19 व्या हप्त्याची रक्कम 24 फेब्रुवारीला शेतकऱ्यांना मिळेल. पीएम किसान सन्मानच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरील घोषणांनुसार 9 कोटी 70 लाख शेतकऱ्यांना 2000 रुपये मिळतील.
इतर बातम्या :
























