एक्स्प्लोर

Matric Student Shot Dead : इकडं जालन्यात दहावीचा मराठी पेपर फुटला अन् तिकडं काॅपी दाखवली नाही म्हणून एका विद्यार्थ्याने दोन विद्यार्थ्यांना रस्त्यावर गोळ्या घातल्या, एकाचा मृत्यू

Matric Student Shot Dead : अमित आणि संजीत दोघेही परीक्षा देऊन ऑटोने घरी परतत होते. दरम्यान, सायंकाळी उशिरा काही हल्लेखोरांनी एनएच-19 वर ऑटो थांबवून त्यांना घेरले आणि दोघांवर गोळ्या झाडल्या.

Matric Student Shot Dead : महाराष्ट्रात दहावी परीक्षेच्या पहिल्याच दिवशी काॅपीमुक्त परीक्षेचा पुरता फज्जा उडाला असून जालना जिल्ह्यात मराठीचा पेपर फुटून थेट झेराॅक्स सेंटरवर पोहोचला. जालन्यातील बदनापूर येथील या घटनेनं शिक्षण वर्तुळात खळबळ उडाली  असतानाच आणखी एक धक्कादायक प्रकार घडला आहे. दुसरीकडे, दहावी परीक्षा सुरु असतानाच एकमेकांची थेट उत्तर पत्रिका दाखवून काॅपीचा प्रकार सुरु होता. एका विद्यार्थ्याने उत्तरपत्रिका न दाखवल्याने बिहारमधील सासाराममध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. आणखी एका विद्यार्थ्याला गोळी लागली असून, त्याचीही प्रकृती चिंताजनक आहे.

20 फेब्रुवारीला मातृभाषेचा (हिंदी, उर्दू) पेपर होता. अमित कुमार आणि संजीत कुमार हे बुधन मोड येथील संत अण्णा शाळेत परीक्षा देत होते. दरम्यान, हॉलमध्ये बसलेल्या एका विद्यार्थ्याने दोघा विद्यार्थ्यांना उत्तर पत्रिका देण्यास सांगितले. दोघांनीही नकार दिला. यानंतर विद्यार्थ्याने बाहेर येऊन आपल्या मित्रांना बोलावले. अमित आणि संजीत दोघेही परीक्षा देऊन ऑटोने घरी परतत होते. दरम्यान, सायंकाळी उशिरा काही हल्लेखोरांनी एनएच-19 वर ऑटो थांबवून त्यांना घेरले आणि दोघांवर गोळ्या झाडल्या.

ऑटोवर बॉम्ब टाकू, अशी धमकी दिली

अमित आणि संजीतसोबत परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्याने सांगितले की, जर तुम्ही कॉपी देण्यास नकार दिला तर तुमच्या ऑटोवर बॉम्ब टाकू, अशी धमकी दिली. परीक्षा संपवून आम्ही घरी परतत होतो. तो त्याच्या मित्रांसह आला होता. आम्ही भैय्या-भैय्या म्हणत होतो. ऑटोच्या थोडं पुढे पोहोचताच त्यांनी वेगाने गोळीबार सुरू केला. ऑटोचालकाला जीवे मारण्याची धमकीही देत ​​होते.

दुसऱ्या विद्यार्थ्याची प्रकृती चिंताजनक 

गोळी लागल्यानंतर दोघांनाही उपचारासाठी सासाराम ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. यानंतर त्यांना खासगी रुग्णालयात पाठवण्यात आले. उपचारादरम्यान अमितकुमारचा मृत्यू झाला. संजीत कुमार (16) यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती चिंताजनक आहे.

लोकांनी महामार्ग अडवला

या घटनेनंतर मुफसिल पोलीस ठाण्याच्या सुवारामध्ये ग्रामस्थांनी रास्ता रोको केला. पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. दोन्ही विद्यार्थी देहरी मुफसिल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शंभू बिघा गावातील रहिवासी आहेत. ट्रॉमा सेंटरमध्ये तैनात डॉक्टर राजेश कुमार यांनी सांगितले की, एका विद्यार्थ्याच्या पाठीत गोळी लागली आहे. त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला उच्च केंद्रात पाठवण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास धाडदंड पोलीस करत आहेत. सहायक पोलीस ठाण्याचे प्रमुख सुनील कुमार म्हणाले की, घटनास्थळाची पाहणी करण्यात आली आहे. एका गुन्हेगाराला अटक करण्यात आली आहे. उर्वरितांच्या अटकेसाठी छापे टाकण्यात येत आहेत.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लव्ह मॅरेज, मर्चंट नेव्हीत लंडनला नोकरी; बायकोच्या बर्थडेसाठी सौरभ भारतात आला; बायकोनं प्रियकराच्या मदतीनं 15 तुकडे करत ड्रममध्ये टाकले
लव्ह मॅरेज, मर्चंट नेव्हीत लंडनला नोकरी; बायकोच्या बर्थडेसाठी सौरभ भारतात आला; बायकोनं प्रियकराच्या मदतीनं 15 तुकडे करत ड्रममध्ये टाकले
वादळ नाही तर त्सुनामी, वनडे सामन्यात 770 धावा, 50 चौकार अन् 22 षटकारांची बरसात; एकानेच 404 धावांचा पाऊस पाडला, 732 धावांनी दणदणीत विजय
वादळ नाही तर त्सुनामी, वनडे सामन्यात 770 धावा, 50 चौकार अन् 22 षटकारांची बरसात; एकानेच 404 धावांचा पाऊस पाडला, 732 धावांनी दणदणीत विजय
Kalpana Chawla : सुनिता विल्यम्स यांची तब्बल नऊ महिन्यांनी मोहीम फत्ते, पण कल्पना चावला परतल्याच नाहीत; अवघ्या 16 मिनिटात काय घडलं होतं 22 वर्षांपूर्वी?
सुनिता विल्यम्स यांची तब्बल नऊ महिन्यांनी मोहीम फत्ते, पण कल्पना चावला परतल्याच नाहीत; अवघ्या 16 मिनिटात काय घडलं होतं 22 वर्षांपूर्वी?
MPSC परीक्षा आता UPSC प्रमाणेच होणार, मुख्यमंत्र्‍यांची मोठी घोषणा; कुठलाही विरोध ग्राह्य धरणार नाही
MPSC परीक्षा आता UPSC प्रमाणेच होणार, मुख्यमंत्र्‍यांची मोठी घोषणा; कुठलाही विरोध ग्राह्य धरणार नाही
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 3 PM TOP Headlines 3PM 19 March 2025 दुपारी ३ च्या हेडलाईन्सRSS On Aurangzeb :औरंगजेबचा मुद्दा सध्या संयुक्तिक नाही, संघाने कान टोचले: Majha Special DiscussionNagpur Aurangzeb Solgan Video : हिंसेपूर्वी जमावाकडून काही धार्मिक घोषणाबाजीही झाल्याची माहितीABP Majha Marathi News Headlines 2 PM TOP Headlines 2PM 19 March 2025 दुपारी २ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लव्ह मॅरेज, मर्चंट नेव्हीत लंडनला नोकरी; बायकोच्या बर्थडेसाठी सौरभ भारतात आला; बायकोनं प्रियकराच्या मदतीनं 15 तुकडे करत ड्रममध्ये टाकले
लव्ह मॅरेज, मर्चंट नेव्हीत लंडनला नोकरी; बायकोच्या बर्थडेसाठी सौरभ भारतात आला; बायकोनं प्रियकराच्या मदतीनं 15 तुकडे करत ड्रममध्ये टाकले
वादळ नाही तर त्सुनामी, वनडे सामन्यात 770 धावा, 50 चौकार अन् 22 षटकारांची बरसात; एकानेच 404 धावांचा पाऊस पाडला, 732 धावांनी दणदणीत विजय
वादळ नाही तर त्सुनामी, वनडे सामन्यात 770 धावा, 50 चौकार अन् 22 षटकारांची बरसात; एकानेच 404 धावांचा पाऊस पाडला, 732 धावांनी दणदणीत विजय
Kalpana Chawla : सुनिता विल्यम्स यांची तब्बल नऊ महिन्यांनी मोहीम फत्ते, पण कल्पना चावला परतल्याच नाहीत; अवघ्या 16 मिनिटात काय घडलं होतं 22 वर्षांपूर्वी?
सुनिता विल्यम्स यांची तब्बल नऊ महिन्यांनी मोहीम फत्ते, पण कल्पना चावला परतल्याच नाहीत; अवघ्या 16 मिनिटात काय घडलं होतं 22 वर्षांपूर्वी?
MPSC परीक्षा आता UPSC प्रमाणेच होणार, मुख्यमंत्र्‍यांची मोठी घोषणा; कुठलाही विरोध ग्राह्य धरणार नाही
MPSC परीक्षा आता UPSC प्रमाणेच होणार, मुख्यमंत्र्‍यांची मोठी घोषणा; कुठलाही विरोध ग्राह्य धरणार नाही
औरंगजेब हा सध्या संयुक्तिक मुद्दा नाही; नागपूरच्या घटनेनंतर संघाचं मोठं वक्तव्य, काँग्रेसकडूनही भूमिकेचं स्वागत
औरंगजेब हा सध्या संयुक्तिक मुद्दा नाही; नागपूरच्या घटनेनंतर संघाचं मोठं वक्तव्य, काँग्रेसकडूनही भूमिकेचं स्वागत
Hardik Pandya : 'अडीच महिन्यात सर्वकाही बदललं' आयपीएलच्या तोंडावर हार्दिक पांड्या काय काय म्हणाला?
'अडीच महिन्यात सर्वकाही बदललं' आयपीएलच्या तोंडावर हार्दिक पांड्या काय काय म्हणाला?
रेशनचा माल काळ्या बाजारात विकला, महसूल विभागाची कारवाई; 5 दुकाने सील, परवाना रद्द
रेशनचा माल काळ्या बाजारात विकला, महसूल विभागाची कारवाई; 5 दुकाने सील, परवाना रद्द
40 वर्षानंतर महिला गर्भवती होऊ शकते का? जाणून घ्या गरोदरपणाबाबत तुमच्या प्रश्नांची उत्तरे!
40 वर्षानंतर महिला गर्भवती होऊ शकते का? जाणून घ्या गरोदरपणाबाबत तुमच्या प्रश्नांची उत्तरे!
Embed widget