डबेवाला भवनच्या उद्घाटनावेळी महापौर गहिवरल्या तर आदित्य ठाकरे म्हणाले, लाईफलाईन जगवायला हव्यात
आज मुंबईतील वांद्रे येथील डबेवाला भवनाचे (Dabewala Bhavan) उद्घाटन शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या हस्ते झालं.
आज मुंबईतील वांद्रे येथील डबेवाला भवनाचे (Dabewala Bhavan) उद्घाटन शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या हस्ते झालं. या कार्यक्रमात मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर आणि राज्याचे परिवहन मंत्र अनिल परब देखील उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलताना महापौर किशोरी पेडणेकर या भावनिक झाल्याचं पाहायला मिळालं.
यावेळी बोलताना पेडणेकर म्हणल्या की, ज्यावेळी आम्ही शाळेत होतो. त्यावेळी 1982 साली संप झाला. वडील आणि सहा भाऊ सखे-चुलत घरी बसले. फक्त एकच भाऊ माझा कामाला जात होता. त्यावेळी तो घरात असतानाच आमच्या घरी डबेवाला येत होता. त्यावेळी बाबांना माहित होतं, घरी आम्ही दोन बहिणी आणि एक भाऊ होता. म्हणून त्यांनी डबेवाल्याला सहा चपाती द्यायला सांगितलं होतं. ज्यातील तीन चपाती तो खायचा आणि तीन डब्यात ठेवून द्यायचा, असं बोलताना त्यांना अश्रू अनावर झाले. लहान असताना आम्ही आम्ही खान्यासाठी डबेवाल्यांची वाट बघत असायचो, असं ही त्या म्हणाल्या आहेत.
या कार्यक्रमात बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले आहेत की, मुंबईकरांची सेवा करणारी आपली जशी ही चौथी पिढी आहे (डबेवाल्यांनी), तशीच आमची ही चौथी पिढी आहे. किशोरी पेडणेकर यांनी डबेवाला यांच्या विषयाची आपली आठवण सांगितली. त्यावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, महापौर तुम्ही डबेवाल्यांच्या आणि तुमच्या कुटुंबीयांचा किस्सा सांगितला. आज त्याच कुटुंबातील मुलगी महापौर झाली असून या कार्यक्रमाची फित कापली आहे. यावेळी बोलताना, डबेवाले हे मुंबईची लाईफलाईन असून लाईफलाईन जगवायला हव्यात असंही आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.
दरम्यान, मुंबई डबेवाल्यांचा 130 वर्षाचा गौरवशाली इतिहास आहे. चोख व्यवस्थापनामुळे जगभरात नावलौकिक मिळाल्यामुळे जगभरातून अनेक पर्यटक व महाविद्यालयीन विद्यार्थी डबेवाल्यांचे व्यवस्थापन जाणून घेण्यासाठी मुंबईमध्ये डबेवाल्यांना भेटण्यासाठी येत असतात. अश्या पर्यटकांना व विद्यार्थ्यांना व्यवस्थापणेचे धडे शिकवण्यासाठी व डबेवाला कामगारांच्या कल्याणासाठी डबेवाल्यांच्या सन्मानार्थ मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून बांद्रा- पश्चिम येथे मुंबई डबेवाला भवन तयार करण्यात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
- PM Modi in Pune : आधी भूमिपूजन व्हायचं मात्र उद्घाटन कधी होणार हे माहिती पडायचं नाही; मेट्रो लोकार्पणानंतर पंतप्रधानांचा टोला
- महत्वाच्या पदावरील व्यक्तिंनी अनावश्यक वक्तव्य करु नये, पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत अजित पवारांचा टोला
-
पंतप्रधानांनी मेट्रोचं तिकीट काढून प्रवास केला, आम्ही विनातिकीट! आमच्याकडूनही पैसे वसूल करा : देवेंद्र फडणवीस