एक्स्प्लोर

महत्वाच्या पदावरील व्यक्तिंनी अनावश्यक वक्तव्य करु नये, पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत अजित पवारांचा टोला

मोठ्या पदावरील व्यक्तिंनी अनावश्यक वक्तव्य करु नये, असे वक्तव्य करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

Deputy cm Ajit Pawar : मला पंतप्रधान नरेंद्र मोंदीना एक लक्षात आणून द्यायचे आहे, की गेल्या काही दिवसांपासून संवैधानिक पदावर बसलेल्या व्यक्तींकडून अनावश्यक वक्तव्य केली जात आहेत. मोठ्या पदावरील व्यक्तिंनी अनावश्यक वक्तव्य करु नये, असे वक्तव्य करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाव न घेता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना टोला लगावला. शिवछत्रपतींनी राजमाता जिजाऊंच्या संकल्पनेतून स्वराज्य उभारले. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी सत्यशोधक विचारांच्या सहाय्याने समाजकार्य केले. या कोणाबद्दल देखील असुया किंवा द्वेष न ठेवता आपल्याला विकासाचे काम पुढे न्यायचे आहे, असेही अजित पवार यावेळी म्हणाले.

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बहुप्रतीक्षित पुणे मेट्रोला हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करम्यात आला. एकूण 33 किमी लांबीच्या पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या 12 किमी लांब मार्गाचे मोदींच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी मोदींनी पुणे मेट्रो आराखड्याची पाहणी केली. यानंतर मोदींनी मेट्रोचं मोबाईल तिकीट देखील काढले. महामेट्रोच्या नव्या अॅल्युमिनियम निर्मित वजनाने हलक्या कोचमधून गरवारे कॉलेज ते आनंदनगर दरम्यान पुणे मेट्रोतून मोदींनी प्रवास केला. यावेळी शाळकरी विद्यार्थी आणि दिव्यांगांसोबत मोदींनी संवाद साधला. 

यावेळी बोलताना अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोंदी यांचे पुण्यातील जनतेच्या राज्याच्या वतीने स्वागत केले. ही भुमी छत्रपती शिवाजी महाराजांची आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य पुढे नेण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी तुम्ही वेळोवेळी सहकार्य केले त्यासाठी तुमचे आभार मानतो असेही अजित पवार यावेळी म्हणाले. पुणेकरांच्या सहनशिलतेला दाद द्यावी लागेल. कारण बारा वर्षांपुर्वी या मेट्रोला परवानगी मिळाली होती, पण काही कारणांनी काम सुरु झाले नाही. काही लोकप्रतिनिधींकडून मेट्रो इलेव्हेटेड करायची की अंडरग्राऊंड करायची यासाठी वेळ लावण्यात आला. त्यामुले मेट्रोचे काम सुरु होण्यास अवधी लागल्याचे अजित पवार म्हणाले.

दरम्यान, आताच्या मेट्रो मार्गांचे विस्तारीकरण होण्याची गरज आहे. पिंपरी-चिंचवड ते निगडी, स्वारगेट ते कात्रज, वनाझ ते चांदणी चौक, रामवाडी ते वाघोली असा विस्तार होण्याची गरज असल्याचे अजित पवार यावेळी म्हणाले. नदी सुधार प्रकल्पाची अंमलबजावणी करताना नदीची सुरक्षीतता, पर्यवरणाचे रक्षण जैववैविध्य, याचा विचार करावा लागणार असल्याचे अजित पवार यावेळी म्हणाले.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Chhattisgarh Naxal Encounter : छत्तीसगडमध्ये 12 नक्षलींचा खात्मा, चकमकीत 2 जवान शहीद, 2 जखमी; विजापूरच्या नॅशनल पार्क परिसरात चकमक
छत्तीसगडमध्ये 12 नक्षलींचा खात्मा, चकमकीत 2 जवान शहीद, 2 जखमी; विजापूरच्या नॅशनल पार्क परिसरात चकमक
Pankaja Munde : वाल्मिक कराड दिंडोरीच्या आश्रमात आल्याचा तृप्ती देसाईंचा आरोप, आता पंकजा मुंडे त्याच स्वामी समर्थ केंद्राच्या कार्यक्रमाला पोहोचल्या; चर्चांना उधाण
वाल्मिक कराड दिंडोरीच्या आश्रमात आल्याचा तृप्ती देसाईंचा आरोप, आता पंकजा मुंडे त्याच स्वामी समर्थ केंद्राच्या कार्यक्रमाला पोहोचल्या; चर्चांना उधाण
Delhi Election : दिल्लीत आपचे 'पानीपत' अन् महाराष्ट्रात महाविकास आघाडीला कडक संदेश; आता अरविंद केजरीवाल कोणती भूमिका घेणार?
दिल्लीत आपचे 'पानीपत' अन् महाराष्ट्रात महाविकास आघाडीला कडक संदेश; आता अरविंद केजरीवाल कोणती भूमिका घेणार?
Home loan: कर्जदारांना लवकरच मिळणार गिफ्ट, होमलोनचा EMI होणार कमी? लवकरच मोठा निर्णय होण्याची शक्यता
रेपो रेट कमी झाल्याने मध्यवर्गीयांना आनंदाची बातमी मिळणार, होम लोनचा EMI कमी होणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Anjali Damania On Santosh Deshmukh Case : जप्त केलेल्या 2 मोबाईलमधील डेटा अद्याप का मिळाला नाही?Rupali Chakankar On Jat : जत प्रकरणी 15 दिवसांत दोषारोपपत्र दाखल करणार,रुपाली चाकणकरांनी घेतला आढावाSuresh Dhas On Dhananjay Munde : धनंजय मुंडे यांनी एकटं गावात फिरावं : सुरेश धसSuresh Dhas Full PC : धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा की नाही हे पक्षश्रेष्ठींच्या हातात : सुरेश धस

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhattisgarh Naxal Encounter : छत्तीसगडमध्ये 12 नक्षलींचा खात्मा, चकमकीत 2 जवान शहीद, 2 जखमी; विजापूरच्या नॅशनल पार्क परिसरात चकमक
छत्तीसगडमध्ये 12 नक्षलींचा खात्मा, चकमकीत 2 जवान शहीद, 2 जखमी; विजापूरच्या नॅशनल पार्क परिसरात चकमक
Pankaja Munde : वाल्मिक कराड दिंडोरीच्या आश्रमात आल्याचा तृप्ती देसाईंचा आरोप, आता पंकजा मुंडे त्याच स्वामी समर्थ केंद्राच्या कार्यक्रमाला पोहोचल्या; चर्चांना उधाण
वाल्मिक कराड दिंडोरीच्या आश्रमात आल्याचा तृप्ती देसाईंचा आरोप, आता पंकजा मुंडे त्याच स्वामी समर्थ केंद्राच्या कार्यक्रमाला पोहोचल्या; चर्चांना उधाण
Delhi Election : दिल्लीत आपचे 'पानीपत' अन् महाराष्ट्रात महाविकास आघाडीला कडक संदेश; आता अरविंद केजरीवाल कोणती भूमिका घेणार?
दिल्लीत आपचे 'पानीपत' अन् महाराष्ट्रात महाविकास आघाडीला कडक संदेश; आता अरविंद केजरीवाल कोणती भूमिका घेणार?
Home loan: कर्जदारांना लवकरच मिळणार गिफ्ट, होमलोनचा EMI होणार कमी? लवकरच मोठा निर्णय होण्याची शक्यता
रेपो रेट कमी झाल्याने मध्यवर्गीयांना आनंदाची बातमी मिळणार, होम लोनचा EMI कमी होणार?
Bacchu Kadu : मोठी बातमी : बच्चू कडूंच्या अडचणी वाढल्या, आमदारकीच्या पराभवानंतर आता 'या' पदावर अपात्रतेची टांगती तलवार
बच्चू कडूंच्या अडचणी वाढल्या, आमदारकीच्या पराभवानंतर आता 'या' पदावर अपात्रतेची टांगती तलवार
Dhruv Rathee on Arvind Kejriwal : दिल्लीत अरविंद केजरीवालांच्या साम्राज्याला भाजपचा सुरुंग, पण ध्रुव राठीच्या प्रतिक्रियेनं भूवया उंचावल्या! नेमकं म्हणाला तरी काय?
दिल्लीत अरविंद केजरीवालांच्या साम्राज्याला भाजपचा सुरुंग, पण ध्रुव राठीच्या प्रतिक्रियेनं भूवया उंचावल्या! नेमकं म्हणाला तरी काय?
Delhi Assembly Election : अवघ्या काही तासात दिल्ली सीएमसाठी एकावरून तब्बल सात नावांची चर्चा अन् स्मृती इराणींची सुद्धा एन्ट्री! 5 समीकरणे कोणाचा करेक्ट कार्यक्रम करणार?
अवघ्या काही तासात दिल्ली सीएमसाठी एकावरून तब्बल सात नावांची चर्चा अन् स्मृती इराणींची सुद्धा एन्ट्री! 5 समीकरणे कोणाचा करेक्ट कार्यक्रम करणार?
Suresh Dhas : धनंजय मुंडेंनी पोसलेल्या गिधाडांनी आमचा माणूस मारला, मंत्रिपदाच्या राजीनाम्याबाबतही सुरेश धसांचं महत्त्वाचं वक्तव्य
धनंजय मुंडेंनी पोसलेल्या गिधाडांनी आमचा माणूस मारला, मंत्रिपदाच्या राजीनाम्याबाबतही सुरेश धसांचं महत्त्वाचं वक्तव्य
Embed widget