Nashik APMC Election : मनमाड बाजार समितीच्या बारा जागांवर 'महाविकास'चा झेंडा, सुहास कांदे गटाला केवळ 3 जागा
Nashik APMC Election : मनमाड बाजार समिती निवडणुकीत 'महाविकास आघाडीकडून सुहास कांदे गटाचा दारुण पराभव झाला आहे

Nashik APMC Election : नांदगाव बाजार समितीमध्ये (Nandgaon Bajar Samiti) आमदार सुहास कांदे गटाने (Suhas Kande) भुजबळ गटाला धूळ चारल्यानंतर मात्र मनमाड बाजार समिती निवडणुकीत सुहास कांदे गटाचा दारुण पराभव झाला आहे. अत्यंत चुरशीच्या झालेल्या लढाईत आ. सुहास कांदे यांना 'धोबी पछाड' देत महाविकास आघाडीने मोठा विजय संपादन केला. एकूण 18 जागांपैकी 12 जागांवर महाविकास आघाडीने विजय मिळवत बाजार समितीची एक हाती सत्ता मिळवली.
गेल्या महिनाभरापासून नाशिकसह (Nashik) जिल्ह्यातील चौदा बाजार समिती निवडणुकांची (Bajar Samiti) रणधुमाळी सुरु होती. तेरा समित्यांचा निकाल लागल्यानंतर मनमाड बाजार समिती (Manmad Bajar Samiti) निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून होते. या ठिकाणी आमदार सुहास कांदे यांचा गट तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीने कंबर कसली होती. भाजप शिंदे गटाचा छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी विकास पॅनल तर महाविकास आघाडी गटाचा परिवर्तन पॅनल या दोघांमध्ये सरळ लढत होती. तर अर्ज माघारीच्या दिवशी झालेल्या राड्यामुळे ही निवडणूक चर्चेत होती. मात्र आज सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर महाविकास आघाडीने एकहाती विजय मिळवत दुसऱ्या गटाला धूळ चारली.
नाशिकच्या मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अत्यंत चुरशीच्या झालेल्या लढाईत आ. सुहास कांदे यांना 'धोबी पछाड' देत महाविकास आघाडीने मोठा विजय संपादन केला. एकूण 18 जागांपैकी 12 जागांवर महाविकास आघाडीने विजय मिळवत बाजार समितीची एक हाती सत्ता मिळवली. शिवसेना (ठाकरे गट) जिल्हाप्रमुख गणेश धात्रक आणि माजी आमदार संजय पवार यांनी बाजी मारली असून आ. सुहास कांदे विरुद्ध महाविकास आघाडीच्या पाच माजी आमदारांमध्ये लढत होती. यात शिवसेना (शिंदे गट) सुहास कांदे यांच्या गटाला केवळ 3 जागा मिळाल्या आहेत. इतर तीन जागा या अपक्ष उमेदवाराला मिळाल्या आहेत.
महाविकास आघाडीला 12 जागा
आ. कांदे विरुद्ध पाच माजी आमदार यांनी निवडणूक लढवल्याने या निवडणुकीत मोठी चुरस पहायला मिळाली होती. मात्र महाविकास आघाडीच्या सूक्ष्म नियोजनाने सुहास कांदे गटाला या निवडणुकीत मोठा पराभव पत्करावा लागला. सत्ताधारी आमदार सुहास कांदे यांच्या विरुद्ध माजी खासदार समीर भुजबळ यांच्यासह माजी आमदार पंकज भुजबळ, संजय पवार, अनिल आहेर जगन्नाथ धात्रक, राजाभाऊ देशमुख या पाच माजी आमदारांनी लढत प्रतिष्ठेची केली होती. दरम्यान, या निकालानंतर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष साजरा केला. दरम्यान महाविकास आघाडीला 12 जागा, शिवसेना (शिंदे गट) 3 जागा, व्यापारी विकासला 2 तर अपक्ष 1 निवडून आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
