Nashik APMC Election : 'तुम्ही कितीबी लावा शक्ती अन् कितीबी लढवा युक्ती', नाशिक बाजार समितीवर 'महाविकास आघाडी'
Nashik APMC Election : नाशिक बाजार समितीवर (Nashik Bajar Samiti) पुन्हा एकदा महाविकास आघाडीने (Mahavikas Aaghadi) वर्चस्व सिद्ध केले आहे.
Nashik APMC Election : नाशिक बाजार समितीवर (Nashik Bajar Samiti) पुन्हा एकदा महाविकास आघाडीने (Mahavikas Aaghadi) वर्चस्व सिद्ध केले आहे. माजी सभापती देविदास पिंगळे यांच्या नेत्तृत्वाखाली असलेल्या आपलं पॅनलने एकहाथी सत्ता मिळवली आहे. जवळपास नऊ जागांवर विजय मिळवला असून चुंभळे गटाच्या शेतकरी विकास पॅनलला सहा जागांवर समाधान मानावे लागले आहे.
दरम्यान नाशिक (Nashik) जिल्ह्यात सर्वात महत्वाची बाजार समिती म्हणून नाशिक बाजार समिती (Nashik Bajar Samiti) निवडणुकीकडे अवघ्या जिल्ह्याचं लक्ष लागून होतं. गेल्या महिनाभरापासून या निवडणुकीची रणधुमाळी सुरु होती. मात्र निवडणुकीचा लेखाजोखा वर्षभरापासून सुरु होता. दोन्ही गटाकडून जोरदार तयारी झाली होती. मतदानाच्या दिवशी तर चुंभळे गटाकडून मतदारांना फाईव्ह स्टार हॉटेलात मेजवाणी दिल्याचे दिसून आले. मात्र मतदानावर याचा परिणाम जाणवला नसल्याचे आजच्या निकालावरून दिसून आले. आज सकाळपासून मतमोजणी सुरु होती. तर यापूर्वीच आपलं पॅनलच्या तीन जागा या बिनविरोध निवडून आलेल्या आहेत. तर आजच्या निकालानंतर देविदास पिंगळे (Devidas Pingale) गटाच्या आपलं पॅनलला 9 जागा तर शिवाजी चुंभळे गटाच्या पॅनल 6 जागा मिळाल्या आहेत.
दरम्यान नाशिक बाजार समिती निवडणुकीकडे साऱ्यांचे लक्ष लागले होते. गेल्या अनेक वर्षांपासून देविदास पिंगळे हे बाजार समितीवर सभापती म्हणून काम पाहत होते. त्यामुळे बाजार समितीतून पिंगळे यांना पायउतार करण्यासाठी भाजप शिंदे गटाने चांगलीच मोट बांधली होती. शिवाय शेतकरी विकास पॅनलने मतदारांच्या घराघरात जाऊन मतदानाचे आवाहन केले होते. सरतेशेवटी मतदारांना फाईव्ह स्टार हॉटलमध्ये ठेवण्यात आले होते. त्या ठिकाणाहून मतदान केंद्रापर्यंत पोहचविण्यासाठी खास बसेसची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र हे सर्व प्रयत्न फोल झाल्याचे दिसून आले. आजच्या निकालानंतर पुन्हा एकदा देविदास पिंगळे गटाने नाशिक बाजार समितीवर झेंडा फडकविला आहे.
आधीच्या तीन जागा बिनविरोध
दरम्यान सुरवातीला नाशिक बाजार समिती निवडणुकीत तीन जागा बिनविरोध झाल्या. नाशिकच्या व्यापारी व हमाल गटातील तीन उमेदवार बिनविरोध झाल्याने पंधरा जागासाठी मतदान प्रक्रिया पार पडली. यात देविदास पिंगळे यांच्या आपलं पॅनलना नऊ जागा मिळाल्या. तर शिवाजी चुंभळे यांच्या शेतकरी विकास पॅनलला सहा जागा मिळाल्या. तर आधीच्या तीन बिनविरोध जागा या पिंगळे गटाच्या असल्याने जवळपास बारा जागा या देविदास पिंगळे गटाला मिळाल्याने त्यांचा विजय झाला आहे.
असे आहेत विजयी उमेदवार
दरम्यान नाशिक बाजार समिती निवडणुकीत महाविकास आघाडीने एकहाती सत्ता मिळवली आहे. देविदास पिंगळे गटाने बारा जागांवर विजय संपादन केला आहे. आणि शिवाजी चुंभळे गटाला पराभव स्वीकारावा लागला आहे. विजयी उमेदवारांमध्ये भास्कर गावित, निर्मला कड, विनायक मळेकर, जगन्नाथ कटाळे, सविता तुंगार, प्रल्हाद काकड, धनाजी पाटील, कल्पना चुंबळे, युवराज कोठुळे, उत्तम खांडबहाले, देविदास पिंगळे, संपतराव सकाळे तर शेतकरी विकास पॅनलकडून सोसायटी सर्वसाधारण गटात तानाजी करंजकर, शिवाजी चुंभळे, राजाराम धनवटे हे विजयी झाले आहेत.