Tax Regime: 12 लाखांच्या निर्णयानं नव्या कररचनेला अच्छे दिन, जुनी कररचना 'या' उत्पन्न गटाला फायदेशीर, जाणून घ्या
Union Budget 2025: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर सगळीकडे नव्या कररचनेची चर्चा सुरु आहे. त्यामुळं करदात्यांसमोर नवी कररचना की जुनी कररचना निवडायची याबाबत संभ्रमाची स्थिती हे.

Income Tax After Union Budget नवी दिल्ली:केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी केंद्र सरकारचा अर्थसंकल्प सादर करताना नव्या करचनेतील बदल जाहीर केले. या बदलांनुसार 12 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कर भरावा लागणार नाही. नव्या कररचनेत 12 लाखांपर्यंत कर द्यावा लागणार नसल्यानं सगळीकडे जोरदार चर्चा सुरु आहे. नव्या कररचनेची चर्चा होत असताना जुन्या कररचनेचं नेमकं काय होणार याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलं आहे. नवी कररचना कुणासाठी फायदेशीर ठरणार आणि जुनी कररचना कुणासाठी फायदेशीर ठरणार हे जाणून घेऊयात.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या नव्या करचनेतील बदलांसदर्भातील घोषणेनंतर पगारदारांना 12.75 लाखांपर्यंत कर द्यावा लागणार नाही. त्यामुळं पगारदारांसाठी नवी करचना फायदेशीर ठरेल. यामुळं अनेक करदात्यांना आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये कोणती कररचना निवडायची यासंदर्भात प्रश्न आहे.
जुनी कररचना कुणासाठी फायदेशीर?
सर्वसाधारण कॅलक्यूलेशन केलं असता नवी कररचना योग्य वाटते. अनेकांना जुनी कररचना महत्त्वाची राहिली नाही असं वाटतं. मात्र, डेलॉयटनं कॅलक्यूलेशन करुन दोन्ही कररचनेतील फरक स्पष्ट केला आहे. ज्यांचं उत्पन्न 24 लाखांपेक्षा अधिक असेल त्यांच्यासाठी जुनी कररचना योग्य आहे. जर, तुम्ही 8 लाखांपेक्षा अधिक वार्षिक उत्पन्नावर डिडक्शन क्लेम करायचं आहे तर तुम्हाला टॅक्स लायबिलिटी नव्या कररचनेपेक्षा अधिक कमी करता येईल. जाणकारांच्या मते अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 12 लाखांपर्यंत उत्पन्न करमुक्त केल्यानं जुन्या कररचनेची चर्चा अधिक होत नसल्याचं दिसतं. मात्र, अपवादात्मक स्थितीत जुनी कररचना फायेदशीर आहे.
कोणत्या उत्पन्न गटाला किती टॅक्स
0 ते 4 - Nil
4 ते 8 - 5 टक्के
8 ते 12 लाख - 10 टक्के
12 ते 16 लाख - 15 टक्के
16 ते 20 लाख - 20 टक्के
20 ते 24 लाख - 25 टक्के
24 लाखापुढे - 30 टक्के
जुन्या करचनेत किती करदाते?
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिलेल्या माहितीनुसार नव्या कररचनेत एकूण करदात्यांपैकी 75 टक्के करदाते आहेत. तर, जुन्या कररचनेत 25 टक्के करदाते आहेत. ज्या करदात्यांनी जुन्या कररचनेची निवड केली आहे. त्यांनी देखील नव्या कररचनेत यावं अशी अपेक्षा निर्मला सीतारामन यांनी केली आहे. नव्या करचनतेतील करमुक्त उत्पन्न 12 लाख रुपये केल्यानं वाचलेली रक्कम पुन्हा अर्थव्यवस्थेत यावी, अशी अपेक्षा निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केली आहे. सरकारच्या या अपेक्षेची पूर्तता नागरिकांकडून केली जाणार का हे पाहावं लागेल.
इतर बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
