एक्स्प्लोर

Gadchiroli: धक्कादायक! नक्षलवाद्यांनी घरात घुसूत फरफटत बाहेर नेलं, गडचिरोलीत माजी पंचायत समितीच्या सभापतीला निर्दयीपणे संपवलं

घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले असून, अधिक तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांमध्ये भीती पसरली आहे.

Gadchiroli: गडचिरोली जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांपासून नक्षलवाद्यांनी अनेक राजकीय नेते, कार्यकर्ते आणि नागरिकांना लक्ष्य केले जात असल्याच्या घटना वारंवार घडताना दिसून येत आहेत. गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी पुन्हा एकदा थरार माजवत भामरागड पंचायत समितीचे माजी सभापती सुकराम महागु मडावी (वय 46) यांची शनिवारी रात्री हत्या केली. घरातून उचलून गावालगत असणाऱ्या मैदानावर त्यांची हत्या केल्याचे उघड झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान,मागील काही दिवसांपासून शांत बसलेल्या नक्षलवाद्यांनी पुन्हा एकदा माजी सभापतीची हत्या करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.  मृतदेहाजवळ पत्रक देखील टाकले असून पोलीस अधिक तपास करीत आहेत. शनिवारी (1 फेब्रुवारी) रात्री सशस्त्र नक्षलवाद्यांनी गावात घुसून मडावी यांना त्यांच्या घरातून जबरदस्तीने बाहेर ओढून नेले. गावाच्या सीमेजवळ असलेल्या मैदानावर त्यांची निर्दयीपणे हत्या करण्यात आली. घटनास्थळी रक्ताच्या थारोळ्यात त्यांचा मृतदेह सापडला. विशेष म्हणजे नक्षलवाद्यांनी मृतदेहाजवळ पत्रक सोडले असून त्यात हत्या करण्याचे कारण नमूद असल्याची शक्यता आहे. (Gadchiroli Crime)

घरातून उचलून नेत हत्या

शनिवारी रात्री नक्षलवाद्यांनी मडावी यांना त्यांच्या घरातून जबरदस्तीने उचलून नेले आणि गावालगतच्या मैदानावर निर्घृण हत्या केली. घटनास्थळी पत्रक फेकून त्यांनी या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे.गेल्या काही दिवसांपासून नक्षलवादी हालचाली कमी झाल्या होत्या, मात्र या हत्येने नक्षलवादी पुन्हा सक्रिय होत असल्याची गावात चर्चा आहे.घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले असून, अधिक तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. (Naxalites Terror)

नक्षलवादी पुन्हा ॲक्टीव्ह?

नक्षलवादी गेल्या काही दिवसांपासून थंड होते. मात्र, या हत्येने त्यांचा गडचिरोलीतील प्रभाव पुन्हा दिसून येतोय.  राजकीय नेत्यांच्या हत्यांमुळे गडचिरोलीतील परिस्थिती अधिक गंभीर बनली असून, प्रशासनासमोर आता नक्षल प्रभाव रोखण्याचं मोठं आव्हान उभं राहिलं आहे. गेल्या काही दिवसांपासून नक्षल चळवळ काहीशी शांत होती, मात्र या घटनेनंतर गडचिरोलीत पुन्हा भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. माजी सभापतींच्या हत्येमुळे गावकऱ्यांमध्ये प्रचंड दहशतीचं वातावरण असून, कुणीही यावर उघडपणे बोलण्यास तयार नाही. एकीकडे नक्षली हिंसाचाराने लक्ष्य होत असलेल्या गडचिरोलीत नवे प्रकल्प, गुंतवणूक, रोजगार निर्मितीची वचनं दिली जात असताना भामरागडच्या पंचायत समितीच्या माजी सभापतीची निर्घृण हत्या करण्यात आल्याने नक्षलवाद्यांची दहशत कशी थांबवणार असा सवाल उपस्थित केला जातोय.

हेही वाचा:

Dhananjay Deshmukh : नामदेवशास्त्रींकडून धनंजय मुंडेंची पाठराखण; संतोष देशमुखांचे भाऊ आज भगवानगड गाठणार, थेट पुरावे करणार सादर

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Tilak Varma : ते दोघे सोडून सर्वजण कोणत्याही क्रमावर फलंदाजी करण्यास तयार, टीमसाठी नेमकं काय महत्त्वाचं? तिलक वर्मा म्हणाला...
Tilak Varma : मी 3,4,5,6 कोणत्याही स्थानावर फलंदाजीला तयार, टीमसाठी काय महत्त्वाचं? तिलक वर्मानं थेट सांगितलं....
Lionel Messi : कोलकात्यात फ्लॉप, हैदराबादमध्ये सुपरहिट! लियोनेल मेस्सीने जिंकली मने; राहुल गांधींना जर्सी भेट
कोलकात्यात फ्लॉप, हैदराबादमध्ये सुपरहिट! लियोनेल मेस्सीने जिंकली मने; राहुल गांधींना जर्सी भेट
Pune Book Festival : 800 स्टॉल, 50 लाख पुस्तकं,अंतराळवीर कॅप्टन शुभांशू शुक्लांचं व्याख्यान ,पुणे बुक फेस्टीव्हल ठरणार वाचकांसाठी पर्वणी
800 स्टॉल, 50 लाख पुस्तकं, पुणे बुक फेस्टीव्हल ठरणार वाचकांसाठी पर्वणी
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 डिसेंबर 2025 | शनिवार

व्हिडीओ

Kalyan Dombivali Rapido captain : कल्याणमध्ये रॅपिडो चालकाकडून तरुणीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न
Eknath Shinde On CIDCO : नवी मुंबईत सर्वसामान्यांसाठी घर घेणं झालं स्वस्त, सिडकोच्या घरांमध्ये सूट
Dombivli Pollution :  गुलाबी रस्ता आणि डोंबिवलीकर रागाने लाले लाल Special Report
Rural Area Students Studies : अभ्यासाचा भोंगा, मोबाईलला ठेंगा, सकाळ-संध्याकाळ फक्त अभ्यास Special Report
Mahapalikecha Mahasangram Pimpri Chinchwad : वाहतूक कोंडीवर काय म्हणतातयेत पिंपरी-चिंचवडकर?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tilak Varma : ते दोघे सोडून सर्वजण कोणत्याही क्रमावर फलंदाजी करण्यास तयार, टीमसाठी नेमकं काय महत्त्वाचं? तिलक वर्मा म्हणाला...
Tilak Varma : मी 3,4,5,6 कोणत्याही स्थानावर फलंदाजीला तयार, टीमसाठी काय महत्त्वाचं? तिलक वर्मानं थेट सांगितलं....
Lionel Messi : कोलकात्यात फ्लॉप, हैदराबादमध्ये सुपरहिट! लियोनेल मेस्सीने जिंकली मने; राहुल गांधींना जर्सी भेट
कोलकात्यात फ्लॉप, हैदराबादमध्ये सुपरहिट! लियोनेल मेस्सीने जिंकली मने; राहुल गांधींना जर्सी भेट
Pune Book Festival : 800 स्टॉल, 50 लाख पुस्तकं,अंतराळवीर कॅप्टन शुभांशू शुक्लांचं व्याख्यान ,पुणे बुक फेस्टीव्हल ठरणार वाचकांसाठी पर्वणी
800 स्टॉल, 50 लाख पुस्तकं, पुणे बुक फेस्टीव्हल ठरणार वाचकांसाठी पर्वणी
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 डिसेंबर 2025 | शनिवार
leonel Messi India Tour: कोलकातामधील मेस्सीच्या कार्यक्रमात अभूतपूर्व राडा; थेट आयोजकांना बेड्या ठोकल्या, प्रेक्षकांचे पैसे सुद्धा परत करणार!
कोलकातामधील मेस्सीच्या कार्यक्रमात अभूतपूर्व राडा; थेट आयोजकांना बेड्या ठोकल्या, प्रेक्षकांचे पैसे सुद्धा परत करणार!
भेटवस्तूमुळे उठणार वादळ! शिवा-जगदंबाच्या नात्यात मोठा ट्विस्ट; गैरसमज दूर होणार की वाढणार?
भेटवस्तूमुळे उठणार वादळ! शिवा-जगदंबाच्या नात्यात मोठा ट्विस्ट; गैरसमज दूर होणार की वाढणार?
Share Market Holidays 2026 : पुढील वर्षी शेअर बाजार किती दिवस बंद राहणार? NSE कडून सुट्ट्यांची यादी जाहीर
2026 मध्ये शेअर बाजार किती दिवस बंद राहणार? नॅशनल स्टॉक एक्सचेंजकडून सुट्ट्यांची यादी जाहीर
कोल्हापुरात आयटीपार्क निर्मितीचा मार्ग मोकळा, जागा उपलब्धतेस शासनाची मंजुरी; आमदार राजेश क्षीरसागरांची माहिती
कोल्हापुरात आयटीपार्क निर्मितीचा मार्ग मोकळा, जागा उपलब्धतेस शासनाची मंजुरी; आमदार राजेश क्षीरसागरांची माहिती
Embed widget