एक्स्प्लोर

Satara: शिवकालीन वाघनखांचा सातारा मुक्काम संपला! ऐतिहासिक वारसा नागपूरकडे रवाना, कडेकोट बंदोबस्त

ही वाघनखं सातारा, कोल्हापूर, मुंबई आणि नागपूर या 4 शहरात प्रदर्शित केली जाणार असल्याचं ठरलं असून साताऱ्यातून आता नागपुरात ही वाघनखं जातील.

सातारा : तब्बल 7 महिने शिवभक्तांच्या साक्षीने साताऱ्यात प्रदर्शित करण्यात आलेली ऐतिहासिक शिवकालीन वाघनखं अखेर नागपूरकडे रवाना झाली आहेत. 19 जुलै 2024 रोजी लंडनमधील व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम येथून भारतात परत आणलेली ही अमूल्य ऐतिहासिक वस्तू साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात ठेवण्यात आली होती. या ऐतिहासिक क्षणाला साक्षी राहण्यासाठी 4लाख 30हजारांहून अधिक शिवप्रेमींनी वाघनखांचे (Waghnakhe) दर्शन घेतले. आज सकाळी पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली या वाघनखांना नागपूर येथील मध्यवर्ती संग्रहालयात हलवण्यात आले. ब्रिटिश अधिकारी आणि पुरातत्त्व विभागाच्या विशेष पथकाच्या उपस्थितीत हा ऐतिहासिक हस्तांतरण सोहळा पार पडला. वाघनखांच्या सुरक्षेसाठी विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. (Nagpur)

हिंदुस्थानच्या इतिहासात छत्रपती शिवाजी महाराजांचा (Shivaji Maharaj) इतिहास अजरामर असून कित्येक पिढ्यांसाठी हा प्रेरणादायी ठेवा आहे. महाराष्ट्रातील गड-किल्ले आणि ऐतिहासिक वास्तू आजही 16 व्या शतकातील मराठ्यांच्या शौर्याची आणि किर्तीची साक्ष देत आहेत. त्यापैकीच एक असेलल्या शिवरायांच्या वाघनखांचं लंडनहून भारतात आगमन झालं. गेली सात महिने ऐतिहासिक प्रतापगडावर अफजलखानाचा कोथळा काढलेली छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे आता साताऱ्यात होती. आता वाघनखांचा साताऱ्यातील मुक्काम संपला असून आता नागपुरच्या मध्यवर्ती संग्रहालयात हलवण्यात येत आहेत. 

शिवप्रेमींनी घेतलं ऐतिहासिक दर्शन

गेल्या सात महिन्यांत शिवभक्तांनी मोठ्या संख्येने संग्रहालयाला भेट देत या ऐतिहासिक वाघनखांचं दर्शन घेतलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध करताना वापरलेल्या या वाघनखांचे दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्रभरातून लोकांनी गर्दी केली होती. इतिहासाच्या सुवर्णपानाचा साक्षीदार बनण्यासाठी सर्व वयोगटातील नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेतला.आता ही वाघनखं नागपूरच्या मध्यवर्ती संग्रहालयात शिवभक्तांसाठी प्रदर्शित केली जाणार आहेत. नागपूरमधील नागरिक आणि पर्यटकांना लवकरच या ऐतिहासिक अस्त्राचे दर्शन घेता येणार आहे. 

या 4 शहरांमध्ये वाघनखांचा वारसा

छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं जी राज्यात आली आहे ती सध्या सातारा येथे होती, ही वाघनखं सातारा, कोल्हापूरमुंबई आणि नागपूर या 4 शहरात प्रदर्शित केली जाणार असल्याचं ठरलं असून साताऱ्यातून आता नागपुरात ही वाघनखं जातील. त्यानंतर कोल्हापूर, मुंबईमध्ये वाघनखांचे जतन केले जाईल. पुरातत्व विभाग व राज्य शासनाने तयार केलेल्या वेळापत्रकानुसार ही ऐतिहासिक वाघनखे साताऱ्यातील मुक्कामानंतर 1 फेब्रुवारी ते 2 ऑक्टाेबर 2025पर्यंत नागपूर येथे व त्यानंतर 3 ऑक्टोबर ते 3 मे 2026पर्यंत ती कोल्हापूर येथील संग्रहालयात पाहण्यासाठी ठेवली जाणार आहेत.

हेही वाचा-:

Pandharpur News: वसंत पंचमीनिमित्त विठ्ठल रुक्मिणी मातेचा विवाह सोहळा; आकर्षक फुलांच्या सजावटीने मंदिर सजलं, पाहा PHOTOS

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

स्थगिती द्यायला मी उद्धव ठाकरे नाही; मुख्यमंत्री फडणवीसांचा थेट विधानसभेतून टोला, आमदारांनी बाक वाजवला
स्थगिती द्यायला मी उद्धव ठाकरे नाही; मुख्यमंत्री फडणवीसांचा थेट विधानसभेतून टोला, आमदारांनी बाक वाजवला
KDMC मधील कंत्राटी भरतीत नियमांचे उल्लंघन;अतिरिक्त आयुक्तांच्या पत्नी 24 तासांत थेट MD पॅथॉलॉजी पदावर
KDMC मधील कंत्राटी भरतीत नियमांचे उल्लंघन;अतिरिक्त आयुक्तांच्या पत्नी 24 तासांत थेट MD पॅथॉलॉजी पदावर
'गृह'युद्ध.. MSEB ने पोलिसांची लाईट तोडली, वाहतूक पोलिसांची फौज कार्यालयासमोर उतरवत पावत्या फाडल्या
'गृह'युद्ध.. MSEB ने पोलिसांची लाईट तोडली, वाहतूक पोलिसांची फौज कार्यालयासमोर उतरवत पावत्या फाडल्या
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2025 | शुक्रवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 09 PM TOP Headlines 09PM 07 March 2025ABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 08PM 07 March 2025Jitendra Awhad : निधी द्या हो... जितेंद्र आव्हाडांची हात जोडून नगरविकास विभागाला विनंतीUdayanraje Bhosale PC| महापुरुषांवर बेताल वक्तव्य करणाऱ्यांच्या विरोधात कायदा पास करा-उदयनराजे भोसले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
स्थगिती द्यायला मी उद्धव ठाकरे नाही; मुख्यमंत्री फडणवीसांचा थेट विधानसभेतून टोला, आमदारांनी बाक वाजवला
स्थगिती द्यायला मी उद्धव ठाकरे नाही; मुख्यमंत्री फडणवीसांचा थेट विधानसभेतून टोला, आमदारांनी बाक वाजवला
KDMC मधील कंत्राटी भरतीत नियमांचे उल्लंघन;अतिरिक्त आयुक्तांच्या पत्नी 24 तासांत थेट MD पॅथॉलॉजी पदावर
KDMC मधील कंत्राटी भरतीत नियमांचे उल्लंघन;अतिरिक्त आयुक्तांच्या पत्नी 24 तासांत थेट MD पॅथॉलॉजी पदावर
'गृह'युद्ध.. MSEB ने पोलिसांची लाईट तोडली, वाहतूक पोलिसांची फौज कार्यालयासमोर उतरवत पावत्या फाडल्या
'गृह'युद्ध.. MSEB ने पोलिसांची लाईट तोडली, वाहतूक पोलिसांची फौज कार्यालयासमोर उतरवत पावत्या फाडल्या
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2025 | शुक्रवार
बीडमधील खोक्याच्या मुसक्या आवळणार, वन विभाग स्पॉटवर; हरणाची कवटी अन् हाडकं घेतली ताब्यात
बीडमधील खोक्याच्या मुसक्या आवळणार, वन विभाग स्पॉटवर; हरणाची कवटी अन् हाडकं घेतली ताब्यात
Satish Bhosale : सतीश भोसले उर्फ खोक्या भाईचे आणखी नवंनवीन कारनामे समोर; अंजली दमानियांकडून नवा व्हिडीओ शेयर
सतीश भोसले उर्फ खोक्या भाईचे आणखी नवंनवीन कारनामे समोर; अंजली दमानियांकडून नवा व्हिडीओ शेयर
औरंगजेबाच्या थडग्यासाठी गेल्या 10 वर्षातील सर्वाधिक निधी 2022 मध्ये; जाणून घ्या वर्षाला किती?
औरंगजेबाच्या थडग्यासाठी गेल्या 10 वर्षातील सर्वाधिक निधी 2022 मध्ये; जाणून घ्या वर्षाला किती?
Donald Trump : कॅनडा, मेक्सिकोनं अमेरिकन टोमॅटो खाणं सोडलं, सफरचंद सुद्धा दुसऱ्या देशाची घेतली; डोनाल्ड ट्रम्प यांनी 'टॅरिफ' नाद 30 दिवसांनी पुन्हा पुढे ढकलला!
कॅनडा, मेक्सिकोनं अमेरिकन टोमॅटो खाणं सोडलं, सफरचंद सुद्धा दुसऱ्या देशाची घेतली; डोनाल्ड ट्रम्प यांनी 'टॅरिफ' नाद 30 दिवसांनी पुन्हा पुढे ढकलला!
Embed widget