Nagpur Railway Station : रेल्वेची चेन ओढणाऱ्यांवर रेल्वेची करडी नजर, आता होणार 'ही' कारवाई
प्रवासी स्थानकावर उशीरा पोहोचतात त्यामुळे गाडी पकडण्याच्या नादात त्यांचे सहकारी किंवा रेल्वेमधील प्रवासी चेन ओढत (passengers arriving late) असल्याची बाब रेल्वे प्रशासनाच्या निदर्शनास आली आहे.

नागपूरः गेल्या काही महिन्यात नागपूर रेल्वे स्थानकावर (Nagpur Junction railway station) चेन पुलिंगच्या घटना वाढल्या असून यामध्ये किरकोळ कारणावरुनही चेन पुलिंग होत असल्याचे रेल्वे प्रशासनाच्या निदर्शनात आले आहे. नागपूर रेल्वे स्थानकावर दुरांतो एक्स्प्रेसमध्ये सर्वाधिक चेन पुलिंग होत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे रेल्वे सुरक्षा दलाने आता चेन ओढणाऱ्यांवर नजर ठेवून अनावश्यक पुलिंगवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
नागपूर विभागात 70 प्रकरणे उघडकीस
मध्ये रेल्वेच्या नागपूर विभागात 70 अशी प्रकरणे घडली. तर दक्षिण-पूर्व-मध्ये रेल्वेच्या नागपूर विभागात 21 प्रकरणे उघडकीस आली आहे. रेल्वे प्रशासनाने नुकतेच चेन (साखळी) ओढण्याच्या (Pulling of Alarm Chain) नियमात बदल केले तरी हे प्रकार थांबण्याचे नाव नाहीत. त्यामुळे इतर प्रवाशांसोबतच रेल्वे प्रशासनाचेही मनस्ताप वाढले आहेत. चेन ओढल्याने गाडीची गती कमी होऊ रेल्वे रुळावर घसरण्याचीही भीती असते. त्यासोबतच गाड्यांना विलंब होतो.
'या' कारणांसाठी ओढतात चेन
अनेक घटनांमध्ये प्रवासी स्थानकावर उशीरा पोहोचतात त्यामुळे गाडी पकडण्याच्या नादात त्यांचे सहकारी किंवा रेल्वेमधील प्रवासी चेन ओढत (passengers arriving late) असल्याचीही बाब रेल्वे प्रशासनाच्या निदर्शनास आली आहे. यासोबतच गावात मध्येच उतरण्यासाठी आणि गंमत म्हणूनही काही प्रवासी चेन ओढत असतात. त्यामुळे इतर प्रवाशांची गैरसोय होते.
या कारणांसाठी चेन ओढणे वैध
रेल्वे गाडीत आग लागल्यास, जर एखादी वृद्ध किंवा अपंग व्यक्ती गाडीत चढू शकत नसेल, प्रवाशाची अचानक प्रकृती खालविल्यास किंवा गाडीत दरोडा पडल्यास या कारणासाठी चेन पुलिंग (valid reasons for chain pulling) आवश्यक मानले जाते.
महिन्याभरात 90 घटनांची नोंद
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात महिन्याभरात सुमारे 70 घटना अनावश्यक चेन पुलींगच्या घडल्या आहेत. तर दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात सुमारे 21 घटना घडल्या आहेत. असे दोन्ही विभाग मिळून 90च्यावर घटनांची नोंद करण्यात आली आहे. रेल्वे प्रशासन प्रवाशांच्या सुरक्षेसाठी विविध उपाययोजना करत असले तरी या अनावश्यक पुलींगचा त्रासही प्रशासनाला सहन करावा लागत आहे.
अनावश्यक चेन पुलिंगच्या नियमात बदल
- अनावश्यक पुलिंग केल्यास आता रेल्वे अॅक्ट 141नुसार 500 ते 1000 रुपयांपर्यंतचा दंड भरावा लागणार
- चेन पुलिंगचा प्रकार पाहून मोठी कारवाई करण्याचीही तरतूद करण्यात आली आहे.
- अनावश्यक चेन पुलिंग केलेले असल्याचे आढळल्यास 3 महिने ते वर्षभरासाठी तुरुंगवासही भोगावा लागू शकतो.
- एकदा गुन्हा नोंदविण्यास आल्यास तरुणांना शासकीय नोकरीमध्येही अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
Nagpur News : प्रथम सत्र तोंडावर, विद्यार्थ्यांना मात्र पुस्तकांची प्रतीक्षा, 23 हजाराहून अधिक पुस्तकांची मागणी
Mission 30 Vidarbha : वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीसाठी 'मिशन थर्टी' चळवळ; प्रशांत किशोर यांचे विदर्भवाद्यांशी संवाद
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
