एक्स्प्लोर
प्रयागराजमध्ये 50 कोटी भारतीयांचं गंगास्नान, न जाऊ शकलेल्यांच्या घरी पवित्र जल; फडणवीसांकडून कौतुक
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुटुंबासमवेत महाकुंभमेळ्यात जाऊन प्रयागराजमध्ये गंगास्नान केलं. आपल्या भारतातील कुंभमेळा पाहून जगभरातील लोकं आश्चर्यचकीत झाल्याचं त्यांनी म्हटलं.
Devendra Fadnavis says 50 crore people in kumbh
1/7

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुटुंबासमवेत महाकुंभमेळ्यात जाऊन प्रयागराजमध्ये गंगास्नान केलं. आपल्या भारतातील कुंभमेळा पाहून जगभरातील लोकं आश्चर्यचकीत झाल्याचं त्यांनी म्हटलं. आत्तापर्यंत महाकुंभमध्ये 50 कोटी भाविकांनी गंगास्नान केल्याचंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं.
2/7

जे लोक महाकुंभला जाऊ शकत नाही, अशा लोकांसाठी तिथले पवित्र जल तुमच्या सेवेसाठी आणलं म्हणून व्हॅल्यूएबल ग्रुप आणि सत्संग फाउंडेशनचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आभार मानले, नागपूर येथील महाकुंभनिमित्त आयोजित कार्यक्रमानंतर ते माध्यमांशीबोलत होते
3/7

मानवी संस्कृती आणि सभ्यतेत हजारो वर्षांपासून हा मानवी संगम कुंभमेळ्याच्या निमित्ताने पाहायला मिळतो. सनातन संस्कृतीला मांनणारे विविध पूजा पद्धती होणारे विविध पंथाची जोडलेले सर्व लोक ज्यादा धर्म पंथ विसरून महाकुंभमध्ये गंगेत स्नान करतात
4/7

50 कोटी पेक्षा जास्त भारतीय गंगा स्नानासाठी प्रयागराजला जाऊन आले आहेत. 90 कोटी भारतीय असे आहेत ज्यांना जाण्याचा योग आला नाही, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले.
5/7

जे लोक प्रयागराजला जाऊ शकले नाहीत, अशाच लोकांसाठी व्हॅल्यूएबल ग्रुपने सत्संग फाउंडेशनसोबत मिळून हा पवित्र जल पोहोचविण्याचा उपक्रम राबविला आहे.
6/7

प्रयागराजमधील संगमाचं पाणी इथं आपल्या अंगावर पडतं आणि दुधात साखर असा योग म्हणजे संतांच्या पादुकांचे दर्शनही आपल्याला मिळते. महाराष्ट्रातील सर्व संतांच्या पादुकाही इथं आपल्या दर्शनासाठी आणण्यात आल्या आहेत.
7/7

या सर्व संतांनी आपल्या समाजाला एक चांगलं वळण दिलं, आमच्या सुख दुःखात धीर दिला, आपल्याला भगवंतांचं दर्शन घडवणाऱ्या संतांच्या पादुकांचे दर्शन आपल्याला लाभत आहे, असेही फडणवीस यांनी म्हटले.
Published at : 16 Feb 2025 01:35 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्राईम
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
























