हे पाकिट, व्यक्तीला शुभेच्छा किंवा आशीर्वाद म्हणून देतात.
या पाकिटात 100, 250, 500, 1000 रुपयांबरोबर नेहमी 1 रुपयाचं नाणं देखील देतो. तेव्हा ते पाकिट शुभ शगुन मानलं जातं.
धार्मिक मान्यतेनुसार, 1 रुपयाचं नाणं फार खास मानलं जातं.
1 ही संख्या अविभाज्य आहे, याचं विभाजन होत नाही.
याकरीता पाकिटात एक रुपयाचं नाणं दिलं जातं.
तसेच, नातं दिर्घकाळ टिकावं, नात्यातील संबंध टिकून राहावा यासाठी देखील हे नाणं दिलं जातं.
1 रुपयाचं नाणं थेट देवी लक्ष्मीशी संबंधीत आहे.
मान्यतेनुसार जेव्हा पाकिटात 1 रुपयाचं नाणं देतात तेव्हा त्याचा संबंध सुख-समृद्धीशी जोडण्यात येतो.
तसेच मान्यतेनुसार, देवी लक्ष्मीला धातूशी देखील जोडण्यात आलं आहे.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.