Metro construction collapses : मोठी बातमी : चेंबूरमध्ये मेट्रोच्या अर्धवट बांधकामाचा काही भाग राहिवासी सोसायटीवर कोसळला Video
Metro construction collapses : मोठी बातमी : चेंबूरमध्ये मेट्रोच्या अर्धवट बांधकामाचा काही भाग राहिवासी सोसायटीवर कोसळला

Metro construction collapses : चेंबूरमध्ये मेट्रोचे बांधकाम सुरु असताना अर्धवट बांधकामाचा काही भाग राहिवासी सोसायटीवर कोसळल्यामुळे खळबळ उडाली आहे. वडाळ्याकडे जाणाऱ्या मेट्रोचे काम सुरु सध्या सुरु आहे. याच मेट्रोच्या सळ्याच काम थेट चेंबूरमधील सुमन नगर सोसाइटी वर कोसळले आहे. दरम्यान मेट्रोचे अर्धवट बांधकाम कोसळल्यामुळे सोसायटीतील राहिवाश्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे. ही घटना सायन ट्रॉम्ब रोडच्या दिशेने जाणाऱ्या रोडवर घडली आहे. 20 फूट सळ्या टाकून उभे केलेले काम थेट रहिवाशी सोसायटी परिसरात पडले आहे.
सुरक्षा रक्षकाच्या रुमवर हा अर्धवट बांधकामाचा काही भाग कोसळला
अधिकची माहिती अशी की, अर्ध्या तासापूर्वी चेंबरच्या सायन परिसरात ही घटना घडलीये. मेट्रोचे सळ्या टाकून उभे केलेले पिलर राहिवासी सोसायटीवर कोसळले आहेत. सोसायटी सुरक्षा रक्षकाच्या रुमवर हा अर्धवट बांधकामाचा काही भाग कोसळलाय. त्यामुळे राहिवासी सोसायटीमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालाय. पनवेलकडून सायककडे जाणाऱ्या महत्त्वाच्या मार्गावर हे काम सुरु आहे. सुमननगरच्या सिग्नलवर ही घटना घडल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झालीये. स्थानिक नेतेही या ठिकाणी येण्यास सुरुवात झाली आहे. प्रशासनही घटनास्थळी दाखल झाले आहे.
कोणताही सपोर्ट न देता या वीस फुटांच्या सळ्या उभ्या करण्यात आल्या
कोणताही सपोर्ट न देता या वीस फुटांच्या सळ्या उभ्या करण्यात आल्या होत्या. हे पिलरचे काम डाव्या बाजूला पडलं. हे चुकून उजव्या साईडला पडलं असतं तर मोठी जीवितहानी होण्याची शक्यता होती. राहिवासी सोसायटीतील लोकांनी आता मेट्रोच्या कामावर प्रश्न चिन्ह उपस्थित केलं आहे. त्यामुळे आता भितीचं वातावरण निर्माण झालंय.
इतर महत्त्वाच्या बातम्या
Raksha Khadse : नाथाभाऊ अन् गिरीश महाजनांचे मनोमिलन घडवून आणणार म्हणणाऱ्या रक्षा खडसेंनी हात झटकले
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
