एक्स्प्लोर
Devendra Fadnavis-Eknath Shinde: देवेंद्र फडणवीस- एकनाथ शिंदेंचं कोल्ड वॉर, 'या' 8 घटनांनी महायुतीच्या एकीला लागला सुरुंग, नेमकं काय घडलं?
Devendra Fadnavis Eknath Shinde: आता एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये नाराजीचा नवा अंक सुरु होण्याची शक्यता आहे.

Devendra Fadnavis-Eknath Shinde
1/11

Devendra Fadnavis Eknath Shinde: राज्याच्या राजकारणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामधल्या नाराजीची चर्चा रंगलेली असतानाच, शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे आता शिंदे आणि फडणवीस यांच्यामध्ये नाराजीचा नवा अंक सुरु होण्याची शक्यता आहे.
2/11

शिवसेनेच्या आमदार आणि नेत्यांना वाय दर्जाची सुरक्षा होती. पण सुरक्षेत कपात झाल्यानं शिवसेना नेत्यांनी संताप व्यक्त केला आहे. पण महत्त्वाचं म्हणजे शिवसेना नेत्यांसोबतच भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या काही नेत्यांचीही सुरक्षा कमी करण्यात आलीय.. ज्या नेत्यांच्या जीवाला कोणताही धोका नाही, त्या नेत्यांची सुरक्षा कमी करण्यात आल्याची माहिती आहे.
3/11

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून आतापर्यंत काय काय घडलं?, जाणून घ्या...
4/11

1. 18 जानेवारी- शिंदेंच्या आक्षेपानंतर रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदाच्या नियुक्तीला स्थगिती
5/11

2. 6 फेब्रुवारी- मुख्यमंत्र्यांकडून एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी प्रताप सरनाईकांऐवजी वाहतूक सचिवांची नियुक्ती
6/11

3. 7 फेब्रुवारी- ठाण्यातल्या समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेण्याचा गणेश नाईकांचं वक्तव्य
7/11

4. 9 फेब्रुवारी- आपत्ती व्यवस्थापन समितीतून शिंदेंना वगळले, चर्चा रंगताच नियम बदलून शिंदेंची नियुक्ती
8/11

5. 10 फेब्रुवारी- धिकारी न विचारताच धोरणात्मक निर्णय घेत असल्याचा उदय सामंतांचा आरोप
9/11

6. 14 फेब्रुवारी-'दाढीवाल्याला हलक्यात घेऊ नका' असे शिंदेंचे उद्गार, वक्तव्य ठाकरेंना उद्देशून असं भाजपचं स्पष्टीकरण
10/11

7. 16 फेब्रुवारी- मुख्यमंत्र्याच्या कक्ष असताना शिंदेंकडून उपमुख्यमंत्री 'वैद्यकीय सहाय्यता कक्षा'ची घोषणा
11/11

8. 17 फेब्रुवारी- मंत्री नसलेल्या 20 शिवसेना आमदारांची वाय प्लस दर्जाची सुरक्षा काढली
Published at : 18 Feb 2025 09:25 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
पुणे
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
