एक्स्प्लोर
Champions Trophy: भारत चॅम्पियन होणार की पाकिस्तान पुन्हा बाजी मारणार? कोणता संघ चॅम्पियन्स ट्रॉफी उंचावणार?
Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफीत जगभरातील 8 प्रमुख संघ सहभागी होणार आहेत. या स्पर्धेला आज सुरुवात होत असून 9 मार्चला फायनल होणार आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफी
1/6

चॅम्पियन्स ट्रॉफी 19 फेब्रुवारी ते 9 मार्च या कालावधीत होणार आहेत. या स्पर्धेतील सामने कराची, लाहोर, रावळपिंडी आणि दुबईत हणार आहेत. स्पर्धेत एकूण 8 संघ सहभागी होणार आहेत.
2/6

वनडे वर्ल्ड कप 2023 मध्ये पहिल्या आठ स्थानांवर असलेल्या संघांना चॅम्पियन्स ट्रॉफीत प्रवेश मिळाला आहे. यामध्ये भारत, पाकिस्तान, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, अफगाणिस्तान आणि बांग्लादेश या संघांचा समावेश आहे.
3/6

भारत, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांचे संघ मजबूत आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफीचे प्रबळ दावेदार म्हणून भारतीय संघांकडे पाहिलं जातंय.
4/6

भारतानं नुकत्याच पार पडलेल्या इंग्लंड विरूद्धच्या एकदिवसीय मालिकेत 3-0 असा पराभव केला. भारताजवळ फलंदाजी, गोलंदाजी आणि अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा भरणार आहे. दुबईतील भारताची कामगिरी देखील चांगली आहे. दुबईत भारतानं 6 सामने खेळले आहेत. यामध्ये भारतानं प्रत्येक सामन्यात विजय मिळवला आहे. हे रेकॉर्ड पाहता रोहित शर्मा आणि टीमला पराभूत करणं अवघड असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळं भारत अंतिम फेरीत धडक देईल, अशी आशा आहे.
5/6

भारत आणि पाकिस्तान यांच्यात अंतिम फेरीची लढत होईल असा अंदाज वर्तवला जातोय. मोहम्मद रिजवान कॅप्टन झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाला त्यांच्या होम ग्राऊंडवर पाकनं पराभूत केलंय. दक्षिण आफ्रिकेला त्यांच्या देशात 3-0 असं पराभूत केलं आहे. त्यामुळं पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत पोहोचेल, अशी शक्यता आहे.
6/6

भारत आणि पाकिस्तान यांच्यात चॅम्पियन्स ट्रॉफीची अंतिम फेरीची लढत होईल, अशी शक्यता आहे. 2017 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत झालेल्या पराभवाचा वचपा काढण्याच्या इराद्यानं टीम इंडिया मैदानात उतरेल.
Published at : 19 Feb 2025 08:36 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
करमणूक
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
